मोखाडा/ दिपक गायकवाड : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक लवकरच जाहीर होणार असून सर्व पक्ष आपापल्या पद्धतीने कामाला लागले आहेत. मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार डॉ.हेमंत सवरा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भाजपाकडे सध्या मोठ्या प्रमाणात विविध पक्षातील कार्यकर्ते , पदाधिकारी आकर्षित होत आहेत.
याचपार्श्वभूमीवर आता भारतीय जनता पार्टी मोखाडा तालुक्यात भाजपा पालघर जिल्हाध्यक्ष भरतभाई रजपूत व विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिश्चंद्र भोये सर यांच्या हस्ते डहाणू येथील भाजपा कार्यालयात भाजपा नेते संतोष चोथे, भाजपा पालघर जिल्हा चिटणीस विठ्ठल पाटील, भाजपा मोखाडा तालुका अध्यक्ष मिलिंद झोले यांच्या माध्यमातून व इतर प्रमुख नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध पक्षातील सरपंच, उपसरपंच व सदस्य, व पक्षीय पदाधिकारी यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
‘अशी’ आहे पक्षप्रवेश झालेल्या कार्यकर्त्यांची यादी
मो-हांडा ग्रामपंचायत क्षेत्रातील शिवसेना विभाग प्रमुख मधुकर आचारी, माजी सरपंच मोरांडा ग्रामपंचायत प्रकाश राऊत, माजी सदस्य ग्रामपंचायत मोरांडा पांडुरंग लहारे, माजी सदस्य ग्रामपंचायत मोरांडा बाळा प्रकाश भोये, विश्राम झावरे, शिवराम बाळू डंबाळे, मोखाडा शहरातून संदेश भाडमुखे उबाठा तालुका युवा प्रमुख, नकुल गणेश ठाकरे उबाठा उपसंघटक मोखाडा तालुका, आकाश कुंभार जिजाऊ शाखाप्रमुख, धर्मा रामदास भोये खोच, अक्षय आनंता सालकर सातुर्ली, योगेश बोढरे पवारपाडा, सुरज मसरे, पोशेरा येथील सुफियान शेख, प्रवीण वळवी, तुषार रडे, विजय राम सवरा, रतन वळवी, सागर वळवी, किरण खानजोडे, चंदर पादीर, मधुकर खादे, विजय चौधरी तुळ्याचापाडा विकी भाडमुखे मोखाडा, किशोर पवार पवारपाडा, सौरभ वाघ पवारपाडा, अरविंद म्हसरे मोखाडा, सचिन दत्तात्रय पाटील पोशेरा, अमित सालकर सातुर्ली, वारघडपाडा येथील क्रांतिवीर भांगरे, भालचंद्र गव्हाणे, सुमित गबाले, राहुल गभाले,सिताराम खुताडे पवारपाडा, तुषार दिवे, प्रकाश दिवे, हर्षल मसरे, गणेश बुधर मोखाडा, बोटोशी ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच तुकाराम पवार, भाऊ दोरे माजी सरपंच बोटोशी व शिवसेना कार्यकर्ता, अनंता नावळे शिवसेना कार्यकर्ता, जिजाऊ संघटनेचे माजी सरपंच सोमा दोरे, व इतर प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांनी प्रवेश केला. यामुळे भारतीय जनता पार्टीचे संघटन मजबूत होत असून त्याचा फायदा येणाऱ्या निवडणुकीमध्ये दिसून येईल असे एकंदरीत चित्र तालुक्यात तयार झाले आहे.