
विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांची करडी नजर! ( सौजन्य - सोशल मीडिया )
Palghar Accident : स्टोर रुमची भिंत कोसळली… अन् होत्याचं नव्हतं झालं, तिघांचा मृत्यू
पर्यावरणपूरक विसर्जनाला प्राधान्य देत महापालिकेने शहरात १२८ कृत्रिम तलाव, १८ फिरते हौद आणि दोन खदानींच्या ठिकाणी कन्वेअर बेल्टची व्यवस्था केली आहे. मोठ्या मूर्तीच्या सुरक्षित विसर्जनासाठी ६ प्रमुख जेट्टींवर तराफे व बोटी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, यंदा वसई व विरार मारंबळपाडा जेट्टी येथे ‘रो-रो’ सेवा उपलब्ध करण्यात आली असून भाविकांना मदत करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी उपस्थित राहतील. विसर्जन घाटांवर जलप्रदूषण रोखण्यासाठी जागोजागी निर्माल्य कलश बसवण्यात आले आहेत.
भाविकांना विसर्जन स्थळांची अचूक माहिती सहज मिळावी म्हणून प्रशासनाने ‘क्यूआर कोड’ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अग्निशामक दलाचे जवान, जीवरक्षक, लाइफ जॅकेट्स, रेस्क्यू बोटी आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साहाय्याने विसर्जन स्थळांवर चोख नजर ठेवली जाईल, असे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी दिली.
मिरवणुकीत गर्दीचा गैरफायदा घेऊन होणाऱ्या चोऱ्या आणि महिलांची छेडछाड रोखण्यासाठी साध्या वेशातील गस्ती पथके कार्यरत राहतील. नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी आणि ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र पथके लक्ष ठेवतील. मंडळांनी भरती-ओहोटीच्या वेळा पाळून विसर्जन वेळेत पूर्ण करावे आणि वाहतूक सुरळीत राहण्यासाठी अवजड वाहनांवर घालण्यात आलेल्या निर्बंधांचे पालन करावे, असे आवाहन अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय शिंत्रे यांनी केले आहे.
आयुक्तालय क्षेत्रात ६४३ सार्वजनिक आणि ५ हजार ३३० घरगुती अशा एकूण ५ हजार ९७३ गणेशमूर्तीचे विसर्जन होणार आहे. यासाठी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ६ पोलिस उपायुक्त, ९ सहाय्यक पोलिस आयुक्त, २०४ अधिकारी, १ हजार ३८१ अंमलदार, ३०० होमगार्ड आणि १९२ महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान रस्त्यावर उतरणार आहेत. याशिवाय एसआरपीएफच्या ३ प्लाटून, आरसीपीची १ प्लाटून आणि २ स्ट्रायकिंग फोर्स तैनात करण्यात आल्या आहेत.
५९७३ – मूर्तीचे होणार विसर्जन
५३३० – घरगुती मूर्ती
६४३ – सार्वजनिक मूर्ती
पोलिस उपायुक्त ०६
सहाय्यक पोलिस आयुक्त ०९
अधिकारी २०४
अंमलदार १३८१
होमगार्ड ३००
महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान १९२
एसआरपीएफच्या प्लाटून ०३
आरसीपीची प्लाटून ०१
स्ट्रायकिंग फोर्स ०२