Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai Virar Heavy Rain : बाप्पाच्या स्वागताला पावसाचे विघ्न! वसई-विरारमध्ये गुडघाभर पाणी; पुढील काही दिवस…

Vasai Virar Heavy Rain : वसई-विरार, नालासोपारा आणि नायगाव परिसरात रविवारी पहाटेपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने मोठी दाणादाण उडवली आहे. मुसळधार पावसामुळे मुख्य रस्ते, सखल भाग आणि काही गणेशोत्सव मंडपांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून उत्सवाच्या तयारीत मोठे विघ्न निर्माण झाले आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 14, 2026 | 03:34 PM
वसई-नालासोपाऱ्यात मुसळधार पाऊस! ( सौजन्य - सोशल मीडिया )

वसई-नालासोपाऱ्यात मुसळधार पाऊस! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • वसई-नालासोपाऱ्यात मुसळधार पाऊस!
  • रस्ते अन् रेल्वे स्थानक परिसरात साचले पाणी
  • वाहतूक कोंडीमुळे चाकरमानी त्रस्त
Vasai Virar Heavy Rain : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही तास उरले असतानाच, वसई-विरार आणि नालासोपारा पट्टयात रविवारी पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने पुरती दाणादाण उडवून दिली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील मुख्य रस्ते, सखल भाग आणि काही गणेशोत्सव मंडपांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून उत्सवाच्या तयारीत विघ्न निर्माण झाले आहे. त्यामुळे उत्सवाच्या सुरुवातीलाच पावसाचा ओघ वाढतोय का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. ( Vasai Virar Heavy Rain ) 

Palghar Ganeshotsav 2026 : बाप्पांच्या स्वागतासाठी पालघर जिल्हा सज्ज! 12564 मूर्तींची होणार प्रतिष्ठापना; कडेकोट पोलीस बंदोबस्त

नाले व गटारे तुडुंब

रविवारी पहाटे तीनपासून विजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या पावसाने शहरातील नाले व गटारे तुडुंब भरून वाहत आहेत. नालासोपारा पूर्वेकडील रेल्वे स्थानक परिसर, सेंट्रल पार्क, तुळींज रोड, गालानगर, विरार पश्चिमेकडील रस्ते आणि नायगाव परिसरातील अनेक भाग जलमय झाले.

प्रवाशांचे हाल, वाहतूक मंदावली

नालासोपारा रेल्वे स्थानक परिसरात गुडघाभर पाणी साचल्याने लोकल प्रवाशांना पाण्यातून कसरत करत स्थानक गाठावे लागले. दुसरीकडे विरारहून मुंबईअहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहनांची गती मंदावली असून चाकरमानी आणि कोकणात जाणाऱ्या भाविकांची प्रचंड वाहतूक कोंडीत अडकून मोठी गैरसोय झाली.

सलग पावसाने पाण्याचा निचरा होण्यास अडथळा

महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने पाणी साचलेल्या ठिकाणी सक्शन पंप लावून पाण्याचा निचरा करण्याचे काम हाती घेतले आहे. तरीही पावसाचा जोर कायम असल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडथळा येत आहे. सलग पडणाऱ्या पावसामुळे ऐन सणाच्या तोंडावर शहरात भीतीचे वातावरण असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नागरिक व्यापाऱ्यांची उडाली तारांबळ

गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला खरेदीसाठी बाहेर पडलेले नागरिक आणि व्यापाऱ्यांची या अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ उडाली. अनेक मंडळांनी शनिवारीच वाजतगाजत बाप्पाच्या मूर्ती मंडपात आणल्या होत्या. मात्र, रविवारी पहाटेपासून काही गणेश मंडपांमध्ये पाणी शिरल्याने सजावटीचे साहित्य, विद्युत रोषणाई आणि देखावे सुरक्षित ठेवण्यासाठी कार्यकत्यांची एकच धावपळ उडाली. अनेक ठिकाणी कार्यकर्ते पंपांच्या साहाय्याने मंडपातील पाणी बाहेर काढताना दिसत होते.

Vasai Virar News : ED कारवाईनंतर वसई पालिकेचा मोठा दणका! 80 पुनर्विकास प्रकल्प अडचणीत! अतिरिक्त बांधकामाला स्थगिती

Web Title: Heavy rain in vasai virar naigaon waterlogging disrupts ganeshotsav preparations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 02:36 PM

Topics:  

  • ganesh charuthi
  • Ganesh Chaturthi 2026
  • Heavy Rain
  • Vasai Virar

संबंधित बातम्या

Ganesh Chaturthi: गणेश चतुर्थीला बाप्पाची भक्ती अन् धर्माच्या पलीकडचं नातं; मुस्लिम सेलिब्रिटींची श्रद्धा पाहून व्हाल थक्क
1

Ganesh Chaturthi: गणेश चतुर्थीला बाप्पाची भक्ती अन् धर्माच्या पलीकडचं नातं; मुस्लिम सेलिब्रिटींची श्रद्धा पाहून व्हाल थक्क

Ganesh Chaturthi Songs: गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ‘ही’ 10 सुपरहिट गाणी लावाच; या गाण्यांशिवाय अधुरा वाटेल गणेशोत्सव!
2

Ganesh Chaturthi Songs: गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ‘ही’ 10 सुपरहिट गाणी लावाच; या गाण्यांशिवाय अधुरा वाटेल गणेशोत्सव!

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीला बाप्पा आणि मोरिया का म्हटले जाते? जाणून घ्या यामागील 600 वर्षे जुनी रंजक कथा आणि इतिहास
3

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीला बाप्पा आणि मोरिया का म्हटले जाते? जाणून घ्या यामागील 600 वर्षे जुनी रंजक कथा आणि इतिहास

Abhijeet Sawant Song: अभिजीत सावंतने बाप्पासाठी गायलं ‘गणा धाव रे’; लेकींच्या सुरेल साथीने गाणं झालं खास
4

Abhijeet Sawant Song: अभिजीत सावंतने बाप्पासाठी गायलं ‘गणा धाव रे’; लेकींच्या सुरेल साथीने गाणं झालं खास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.