
इंदापूर, बारामतीसह अनेक भागांत मुसळधार पावसाची हजेरी; पुण्यात तापमानाचा पारा 29 अंशांवर
सध्या पुणे शहरात तापमान 29 अंश सेल्सिअसवर गेल्याचे दिसून येत आहे. सोमवारी सकाळी शहराच्या विविध भागांत पावसाने हजेरी लावली, तर दिवसभर आकाश ढगाळ राहिल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. पुढील दोन दिवस शहर आणि परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली. या पार्श्वभूमीवर पुण्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोमवारी शहरात कमाल तापमान २४ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २१.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
बंगालच्या उपसागरातील तीव्र चक्रीवादळ मुरासू आणि अरबी समुद्रातील चक्रीय स्थितीमुळे पुण्यासह राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. शहर आणि परिसरात सोमवारी (ता.2) रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे कमाल तापमानात आठ ते नऊ अंश सेल्सिअसने घट झाली.
हडपसरला पाऊस
हडपसर हडपसरसह पूर्व पुण्यातील विविध भागांत रात्री झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळ पावसामुळे रस्ते जलमय झाले. मध्यरात्रीच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर पहाटे आणि सकाळी सात ते आठच्या सुमारास पावसाचा जोर वाढल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. मगरपट्टा सिटी, मुंढवा, केशवनगर, हडपसर, शिंदेवस्ती, रामटेकडी, महंमदवाडी, वानवडी, फातिमानगर, घोरपडी आणि कॅम्प परिसरात जोरदार पाऊस झाला.
धरणसाखळीत 80.52 टक्के पाणीसाठा
खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांमध्ये मिळून २३.४७ टीएमसी (८०.५२ टक्के) पाणीसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत २८.४० टीएमसी (९७.४१ टक्के) पाणीसाठा होता. त्यामुळे यंदा गतवर्षीच्या तुलनेत सुमारे पाच टीएमसीने साठा कमी आहे. सोमवारी चारही धरणांमध्ये नव्याने पाण्याची आवक झाली.
1. बारामती शहरात किती पावसाची नोंद झाली?
सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत बारामती शहरात १५८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
2. त्यानंतर पावसाची स्थिती काय होती?
सकाळी सव्वादहा वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे पावसाची एकूण नोंद १७० मिलिमीटरच्या पुढे गेल्याची शक्यता आहे.
3. कोणत्या भागांना मुसळधार पावसाचा फटका बसला?
बारामती शहर, परिसरातील जिरायती पट्टा आणि इंदापूर तालुक्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला.