
क्रिकेट-फुटबॉलवर चालत होता कोटींचा सट्टा! ( सौजन्य - सोशल मीडिया )
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी धाड टाकून मुख्य आरोपी फुरकान अहमद जसीमुद्दीन अन्सारी (वय २१) याला ताब्यात घेतले. तपासात धक्कादायक माहिती समोर आली की, आरोपी’ रेडी बुक’ आणि’ रेडी ६६ या पॅनलद्वारे क्रिकेट, रमी, फुटबॉलवर सट्टा चालवत होते. लोकांची दिशाभूल करून त्यांच्या नावावर सिमकार्ड आणि बैंक खाती उघडून त्याचा वापर आर्थिक व्यवहारांसाठी ‘म्युल अकाउंट म्हणून केला जात होता. या ठिकाणाहून पोलिसांनी ५ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नायगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
पोलिस आयुक्त निकेत कौशिक, पोलिस आयुक्त, अपर पोलिस आयुक्त संजय शिंत्रे, उपायुक्त संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलिस आयुक्त गोंडूराम बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-२चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन पाटील, पोलिस निरीक्षक अविराज कुराडे, सहायक पोलिस निरीक्षक सुनील पवार, पोलिस उपनिरीक्षक अजित गिते, संतोष घाडगे, सफौज मुकेश पवार, रवींद्र पवार, मनोज मोरे, चंदन मोरे, प्रफुल्ल पाटील, पोहवा सचिन पाटील, जगदीश गोवारी, दादा आडके, राहुल कर्पे, पोलिस अंमलदार अनिल साबळे, पोलिस शिपाई अक्षय बांगर, मसुब आकाश जाधव, मसुब मंगेश भगत, सफौज संतोष चव्हाण यांनी ही कारवाई केली.
पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे भारतीय, आंतरराष्ट्रीय मोबाईल क्रमांकांचा माग काढला. अंतिम सामन्यादरम्यान नितिन ऑनलाइन बुक पॅनलवरून थेट बेटिंग सुरू असताना पोलिसांनी उत्तर गोव्यातील पोरवोरीम येथे छापा टाकला. तेथून नितीन माखिजानी (वय ४५), करण तनवानी (वय २१), दीपक बत्रा (वय २६), हृतिक खूबचंदानी (वय २६), राकेश वाधवानी (वय ३०) आणि मोहित पोपटानी (वय २४) या ६ जणांना रंगेहाथ पकडण्यात आले.