मोखाड्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न
दीपक गायकवाड/मोखाडा: जव्हार-मोखाडा तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा मोखाडा येथे उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन शिवसेना संपर्कप्रमुख व उपनेते आमदार रवींद्र फाटक यांनी कार्यकर्त्यांना दिले. मेळाव्याला कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाला शिवसेना उपनेते निलेश सांबरे, जिल्हा प्रमुख वंसत चव्हाण, तसेच इतर वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. आपल्या भाषणात आमदार रवींद्र फाटक म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे आणि दिघे साहेब यांच्या विचारांनी प्रेरित होऊन जनसेवा करत आहेत आणि त्याच विचारांचे शिवसैनिक जव्हार-मोखाडा तालुक्यात कार्यरत आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आणि संघटन अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले.
पालघर जिल्हा शोकाकुल! आंबिस्ते आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या
उपनेते निलेश सांबरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना दोन्ही तालुक्यात शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे आव्हान दिले. ते म्हणाले की, “पक्ष सोडून गेलेल्यांकडे दुर्लक्ष करा आणि आपल्या कार्यावर लक्ष केंद्रित करा.”
जिल्हा प्रमुख वंसत चव्हाण यांनी नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत त्यांना पक्षात बळ दिले जाईल असे आश्वासन दिले. महिला संघटिका वैष्णवी रहाणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी सुरू केलेल्या लाडकी बहिण योजनासह अनेक उपक्रमांचा उल्लेख केला.
तालुका प्रमुख अमोल पाटील यांनी मोखाडा तालुक्यातील संघटना आणखी मजबूत करण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने नगरपंचायतीसाठी भरघोस निधी मिळवून अनेक विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत.
शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का ! बडे नेते भाजपच्या वाटेवर; पक्षप्रवेशाची तारीखही ठरली
जव्हार तालुक्याचे सरपंच कल्पेश राऊत यांनी पक्षाची भूमिका मांडली. माजी सभापती युवराज गिरंधले, नवसु थेतले आणि निलेश झुगरे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
मेळाव्यात प्रमुख उपस्थितांमध्ये आमदार रवींद्र फाटक, निलेश सांबरे, जिल्हा प्रमुख वंसत चव्हाण, वैष्णवी रहाणे, प्रल्हाद कदम, रविंद्र शिवदे, प्रदीप वाघ, अमोल पाटील, विनायक राऊत, नवसु दिघा, युवराज गिरंधले, भास्कर थेतले, गणेश रजपूत, असिफ लुलानिया तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक, सरपंच, उपसरपंच आणि पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत शिंगाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन रवि मुकणे यांनी मानले.