Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai Fake Currency : वसईत मोठा पर्दाफाश, 1 कोटींच्या बनावट नोटा जप्त, 30 लाखांत विक्रीचा होता डाव

Vasai Fake Currency : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून मुंबईच्या दिशेने नेला जाणारा १ कोटी रुपये दर्शनी मूल्याचा बनावट नोटांचा साठा वसई क्राईम ब्रँच युनिट-२ ने जप्त केला आहे. शिरसाट फाटा पुलाखाली केलेल्या या धडक कारवाईत ५०० रुपयांच्या तब्बल २० हजार बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 12, 2026 | 12:11 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • गुजरातहून मुंबईकडे चालला होता १ कोटींच्या बनावट नोटांचा साठा!
  • वसईत पोलिसांनी सापळा रचून पकडले
  • ५०० च्या नोटा पाहून पोलीसही चक्रावले
Vasai Fake Currency : वसईत मोठा पर्दाफाश करण्यात आला. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून बनावट नोटांचा ( Vasai Fake Currency ) मोठा साठा मुंबईच्या दिशेने नेला जात होता. त्यावेळी वसई क्राईम बँच युनिट-रने कारवाई करत तब्बल एक कोटी रुपये दर्शनी मूल्याच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. शिरसाट फाटा पुलाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत ५०० रुपयांच्च्या तब्बल २० हजार बनावट नोटा आढळून आल्या. या नोटांची सुमारे ३० लाख रुपयांत विक्री करण्याचा डाव असल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे.

Vasai Virar Mangrove Scam : हव्यासापोटी कांदळवनांची कत्तल सुरूच! 200 हून अधिक गुन्हे दाखल, पण तपासावर मोठं प्रश्नचिन्ह

दर्शनी किंमत तब्बल एक कोटी रुपये

गुजरातहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या संशयित कारची झडती घेतली असता एका बॅगेमध्ये ५०० रुपयांच्या मोठ्या प्रमाणात बनावट नोटा आढळल्या. नोटांची मोजणी केल्यानंतर त्यांची दर्शनी किंमत तब्बल एक कोटी रुपये असल्याचे स्पष्ट झाले. या कारवाईत पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे या नोटांचा साठा कुठून आला, याची चौकशी सुरू आहे.

मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता

एक कोटींच्या बनावट नोटा ३० लाख रुपयांत विकण्याचा व्यवहार ठरला होता. या व्यवहारामागे आणखी कोण व्यक्ती आहेत, याचा तपास क्राईम ब्रँचकडून करण्यात येत आहे. दरम्यान, जप्त नोटांची गुणवत्ता, त्यावरील सुरक्षा वैशिष्ट्ये आणि त्या नेमक्या कुठे तयार करण्यात आल्या याबाबत तांत्रिक तपास केला जाणार आहे. संशयिताकडून मिळणाऱ्या माहितीतून बनावट नोटांच्या पुरवठ्याची साखळी आणि या रॅकेटचा मुख्य सूत्रधार पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. या कारवाईमुळे परिसरात बनावट चलनी नोटांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गुजरात कनेक्शनचा पोलिसांकडून तपास

बनावट नोटांचा साठा गुजरातमधून मुंबईच्या दिशेने आणला जात असल्याने या प्रकरणात गुजरात कनेक्शन आहे का, याचीही पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे. नोटा तयार करणारे, पुरवठा करणारे आणि त्या बाजारात चलनात आणणारे वेगवेगळे घटक कार्यरत आहेत का, याचा शोध घेण्यात येत आहे.

Palghar News : डहाणूतील चिमुरडीवर अत्याचार अन् हत्येप्रकरणी ऐतिहासिक निकाल! आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा

Web Title: Vasai fake currency crime branch seizes one crore rupees notes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 12:11 PM

Topics:  

  • Crime Police
  • Fake Currency
  • Gujrat
  • Marathi News
  • Vasai news
  • VASAI POLICE
  • Vasai Virar Police

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.