Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai Road Terminus : पश्चिम रेल्वेचा महत्त्वाकांक्षी विस्तार! वसई रोड टर्मिनसच्या कामाला वेग, कधीपर्यंत पूर्ण होणार काम

Vasai Road Terminus : मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवाशांचा वाढता ताण आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचे नियोजन सुलभ करण्यासाठी पश्चिम रेल्वेने हाती घेतलेल्या वसई रोड टर्मिनस प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला मोठा वेग आला आहे. सुमारे १५० कोटी रुपयांच्या या बहुद्देशीय प्रकल्पांतर्गत जोगेश्वरी येथील मालधक्का वसईत स्थलांतरित केला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 12, 2026 | 11:44 AM
वसई रोड टर्मिनस प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात ( सौजन्य - सोशल मीडिया )

वसई रोड टर्मिनस प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • पश्चिम रेल्वेचा महत्त्वाकांक्षी विस्तार
  • उपनगरीय प्रवाशांचा ताण कमी होणार
  • वसई रोड टर्मिनस प्रकल्पाच्या कामाला वेग
Vasai Road Terminus : मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कवरील वाढता प्रवासी ताण कमी करण्यासाठी आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या संचालनाला नवा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी पश्चिम रेल्वेने हाती घेतलेल्या वसई रोड टर्मिनस प्रकल्पाने आता प्रत्यक्ष वेग घेतला आहे. सुमारे १०५ ते १५० कोटी रुपयांच्या घरात खर्च अपेक्षित असलेल्या या बहुद्देशीय प्रकल्पासाठी कंत्राटदारांची नियुक्ती पूर्ण झाली असून मार्च २०२८ पर्यंत हा संपूर्ण प्रकल्प प्रवाशांच्या सेवेत आणण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यामुळे वसई-विरार, पालघर आणि ठाणे-नवी मुंबई परिसरातील लाखो प्रवाशांना थेट कनेक्टिव्हिटी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. ( Vasai Road Terminus ) 

Vasai Virar मध्ये नालेसफाईच्या नावाखाली कोट्यवधींची उधळपट्टी? विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांचा पालिका आयुक्तांना इशारा

जोगेश्वरी गुड्स यार्डचे वसईत स्थलांतर

जोगेश्वरी येथील मालधक्क्याचे वसई परिसरात स्थलांतर हा याप्रकल्पाचा मुख्य भग आहे. सध्या जोगेश्वरी यार्डमधून सिमेट, ऑटोमोबाईल्स आणि इतर अवजड वस्तूंची वाहतूक होते, ज्यातून रेल्वेला वार्षिक सुमारे १०० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. आता है यार्ड वसई रोड-दिवा विद्यमान कॉर्ड लाईन आणि नायगाव-जुचंद्र प्रस्तावित कॉर्ड लाईनदरम्यान विकसित केले जात आहे. ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर’शी जोडणी मिळण्याच्या शक्यतेमुळे भविष्यात या मालवाहतुकीतून रेल्वेचा महसूल आणखी वाढणार आहे. मालवाहतूक स्वतंत्र ट्रॅकवर वळवल्यामुळे मुख्य मार्गावरील लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांचा खोळंबा कायमस्वरूपी टळेल.

जुने ट्रॅक हटवण्याचे काम वेगाने सुरू

सध्या जागेवर कॉक्रीट अॅप्रन, भूमिगत ड्रेनेज व्यवस्था आणि जुने अनावश्यक ट्रॅक हटवण्याचे काम वेगाने सुरू आहे. स्वापत्य कामांसोबतच ट्रॅक लिंकिंग, ओव्हरहेड वायर, सिग्नलिंग आणि टेलिकॉम यंत्रणांच्या आधुनिकीकरणाचे कंत्राट अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. मार्च २०२८ पर्यंत हे टर्मिनस पूर्ण झाल्यास मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनसवरील लांब पल्ल्याच्या गाड्यांचा भार हलका होऊन वसई रोड हे उपनगरातील एक प्रमुख केंद्र ठरेल.

अत्याधुनिक पायाभूत संरचना अन् कामाची प्रगती

सुमारे ४.५ हेक्टर रेल्वे जागेवर १.८ मार्ग किलोमीटर आणि ५.१ ट्रॅक किलोमीटरचे जाळे विणले जात आहे.
नव्या वसई रोड टर्मिनसवर एकाच वेळी १२ प्रवासी ट्रेन्स हाताळण्याची अद्ययावत क्षमता असेल.
सुमारे ८५० मीटर लांब आणि २७ मीटर रुंद आकाराच्या सुसज्ज प्लॅटफॉर्मच्या १,२०० मीटर लांबीच्या संरक्षण भिंतीपैकी ५०० मीटरहून अधिक काम पूर्ण झाले आहे.
यार्डमध्ये प्रत्येकी ८०० मीटर लांबीच्या दोन मालवाहतूक लाईन तयार केल्या जात आहेत. दक्षिण दिशेला मालवाहू वाहनासाठी रॅम्प, तसेच रेल्वेचे दैनंदिन कामकाज व व्यावसायिक सुविधांसाठी स्वतंत्र बहुमजली इमारत उभारण्यात येत आहे.

Palghar Kotwal Bharti 2026 : सरकारी नोकरीची मोठी संधी! महसूल विभागात 122 जागांसाठी कोतवाल भरती; अर्ज कसा करायचा? पाहा सविस्तर

Web Title: Vasai road terminus project western railway expansion marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 11:44 AM

Topics:  

  • Local train Mumbai
  • vasai

संबंधित बातम्या

Vasai Police : क्रिकेट-फुटबॉलवर चालत होता कोटींचा सट्टा! वसई पोलिसांनी आवळल्या गोव्यातील मास्टरमाइंड्सच्या मुसक्या
1

Vasai Police : क्रिकेट-फुटबॉलवर चालत होता कोटींचा सट्टा! वसई पोलिसांनी आवळल्या गोव्यातील मास्टरमाइंड्सच्या मुसक्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.