Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai Virar News : ED कारवाईनंतर वसई पालिकेचा मोठा दणका! 80 पुनर्विकास प्रकल्प अडचणीत! अतिरिक्त बांधकामाला स्थगिती

Vasai Virar News : वसई-विरार शहरात २०२२ ते २०२५ या कालावधीत मंजूर झालेल्या ८० हून अधिक पुनर्विकास प्रकल्पांमध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त FSI दिल्याचा धक्कादायक प्रकार महापालिकेच्या फेरतपासणीत उघडकीस आला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 12, 2026 | 10:48 AM
वसईत ८० पुनर्विकास प्रकल्प अडचणीत ( सौजन्य - सोशल मीडिया )

वसईत ८० पुनर्विकास प्रकल्प अडचणीत ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • वसईत ८० पुनर्विकास प्रकल्प अडचणीत
  • अतिरिक्त बांधकामाला स्थगिती;
  • घरे-दुकानांच्या खरेदी-विक्री दस्त नोंदणीला मनाई
Vasai Virar News : वसई-विरार शहरातील पुनर्विकासाच्या नावाखाली मंजूर करण्यात आलेल्या बांधकाम परवानग्यांची फेरतपासणीमुळे आता विकासकांसह घरखरेदीदारांही अडचणीत येण्याची शक्यता आहे. २०२२ ते २०२५ या काळात मंजूर झालेल्या ८० हून अधिक पुनर्विकास प्रकल्पांमध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक एफएसआय मंजूर झाल्याचे महापालिकेच्या फेरतपासणीत उघडकीस आले आहे. त्यामुळे या प्रकल्पांतील अतिरिक्त बांधकामाला स्थगिती देण्यात आली असून, सदनिका आणि दुकानांच्या खरेदी-विक्रीच्या दस्तांची नोंदणीही थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ( Vasai Virar News )

Dahanu Road : खासदार-आमदारांचे ऐकेना प्रशासन? 2 वर्षांपासून रस्त्याची वाट लागल्याने डहाणूत नागरिक रस्त्यावर

या प्रकल्पांना भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) द्यायचे की नाही, यासाठी आता राज्य शासनाच्या मार्गदर्शनाची प्रतीक्षा आहे. २०२० मध्ये यूडीसीपीआर लागू झाल्यानंतर जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाला शहरात मोठी चालना मिळाली. मात्र, पुनर्विकासाला मिळणाऱ्या विविध सवलती, इन्सेंटिव्ह एफएसआय आणि वाढीव बांधकाम क्षेत्राच्या मंजुरीत नियमांचे पालन झाले का, याबाबत प्रश्न उपस्थित झाले. त्यानंतर संबंधित फायलींची फेरतपासणी सुरू करण्यात आली.

या तपासणीत ८० हून अधिक प्रकल्पांमध्ये मंजूर बांधकाम क्षेत्र निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. ही प्रकरणे केवळ ८० प्रकल्पांपुरती मर्यादित राहतील का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. नगररचना विभागाकडून अन्य पुनर्विकास फायलींचीही तपासणी सुरू आहे. त्यामुळे तपासणी पूर्ण झाल्यानंतर अशा प्रकल्पांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जुनी परवानगी रद्द होण्याची शक्यता

फेरतपासणीत नियमबाह्य मंजुरी स्पष्ट झाल्यास काही प्रकल्पांच्या जुन्या बांधकाम परवानग्या रद्द करून विकासकांना नव्याने बांधकाम परवानगी (सीसी) घेण्यास सांगितले जाऊ शकते. त्यामुळे या प्रकल्पांची पुढील कायदेशीर व प्रशासकीय स्थिती सुनावणी आणि शासनाच्या मार्गदर्शनानंतरच स्पष्ट होणार आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकल्पांमध्ये घर किंवा दुकान खरेदी केलेल्या नागरिकांसमोरही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दस्त नोंदणी झाली असली तरी प्रकल्पाला अंतिम ओसी मिळणार का, मंजूर बांधकाम वैध ठरणार का आणि भविष्यात कोणती प्रशासकीय कारवाई होणार, याकडे घरखरेदीदारांचे लक्ष लागले आहे. महापालिकेने त्यामुळे अंतिम निर्णय होईपर्यंत संबंधित प्रकल्पांमध्ये नवीन आर्थिक व्यवहार अथवा खरेदी-विक्री करताना नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

बांधकामांच्या ओसीचा निर्णय अडकला

अतिरिक्त एफएसआय मंजुरीचा प्रश्न निर्माण झाल्याने या प्रकल्पांना ओसी देता येईल का, हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत महापालिकेने राज्य शासनाकडे मार्गदर्शन मागितले आहे. शासनाचा निर्णय होईपर्यंत संबंधित प्रकल्पांतील अतिरिक्त बांधकामावर स्थगिती कायम राहणार आहे. महापालिकेने विकासकांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यासाठी सुनावर्णी सुरू केली आहे. प्रत्यक्ष बांधकाम किती झाले, मंजूर क्षेत्र किती आहे आणि प्रत्यक्षात किती क्षेत्राचा वापर झाला, याची तांत्रिक पडताळणी केली जाणार आहे.

ईडी कारवाईची पार्श्वभूमीही चर्चेत

२०२२ ते २०२५ या कालखंडात महापालिकेचे प्रशासक म्हणून कार्यरत असलेले माजी आयुक्त अनिलकुमार पवार आणि तत्कालीन नगररचना उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांच्या कार्यकाळात पुनर्विकास प्रकल्पांना अतिरिक्त एफएसआय मंजूर केल्याच्या तक्रारी यापूर्वी करण्यात आल्या होत्या. बांधकाम गैरप्रकाराच्या प्रकरणात ईडीकडून दोन्ही अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याने या काळातील नगररचना विभागाच्या फायलीची फेरतपासणी विशेष महत्त्वाची ठरली आहे.

एकाच आर्क्टिटेक्टच्या निम्याहून जास्त फाईली

यात एका आटिंटेक्टच्या निम्याहून अधिक फाईली असून त्यांच्यावर ईडीनेही कारवाई केली होती. इतकेच नाही तर सध्या ईडीच्या कारवाईतील सर्वच आर्किटेक्टची अँटिकरप्शनकडून पुन्हा चौकशी करण्यात आली असून त्यात याही आर्किटेक्टचाही समावेश होता.

Ganeshotsav 2026 : Mira Bhayandar मध्ये गणेशमूर्ती विसर्जनासाठी 24 ठिकाणी व्यवस्था; 19 कृत्रिम अन् ५ नैसर्गिक जलस्रोतांचा समावेश

Web Title: Vasai virar 80 redevelopment projects in trouble over excess fsi marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 10:48 AM

Topics:  

  • Vasai-Virar Municipal Corporation

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.