
दिवाळीत वसई-विरारमध्ये अग्नितांडव! ( सौजन्य - सोशल मीडिया )
आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन अधिकारी विशाल शिर्के यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. कंत्राटदाराचे काम पूर्ण होऊनही महापालिकेच्या जागेवरच हे जुने पीव्हीसी पाईप टाकून ठेवण्यात आले होते. वाढती उष्णता, सुकलेले गवत आणि फटाके किंवा रॉकेटची ठिणगी पडल्याने ही आग भडकल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या घटनेनंतर भाजप नगरसेवक विशाल जाधव यांनी महापालिका आणि पोलिस ढिसाळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. महापालिकेच्या जागेत खासगी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र संताप कंत्राटदाराचा माल ठेवण्याबाबत गटनेते अशोक शेळके यांनी तीन-चार दिवसांपूर्वीच तक्रार केली होती. महासभेतही रस्त्यावरील पाईप आणि बेवारस वाहनांचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, पाच वर्षांच्या प्रशासकीय राजवटीची सवय लागलेल्या अधिकाऱ्यांकडून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या तक्रारींची दखल घेतली जात नसल्याचा आरोप जाधव यांनी केला.
आचोळे पोलिस स्टेशनबाहेर जप्त केलेल्या गाड्या आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या महापालिकेच्या कचरा गाड्यांजवळ गर्दुल्ल्यांचा वावर वाढल्याने आगीचे प्रकार घडत आहेत. सकाळी अकराच्या सुमारास वीणा डायनेस्टीबाहेर एका गाडीला, तर इम्पेरियल इमारतीजवळही आगीची घटना घडल्याचे त्यांनी सांगितले.
वाढत्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी २१ मजली इमारतींच्या आवारात उंच जाणारे ‘फॅन्सी शॉट्स’ किंवा रॉकेट न फोडता मोकळ्या मैदानातच फटाके फोडावेत, जेणेकरून इतरांची दिवाळी खराब होणार नाही आणि जीवितहानी टळेल, असे आवाहन अग्निशमन अधिकारी विशाल शिर्के व नगरसेवक विशाल जाधव यांनी केले आहे.
दुपारी सव्वाचारच्या सुमारास स्मशानभूमीजवळ पीव्हीसी पाईपला आग लागल्याचा कॉल आला होता. ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या उष्णतेमुळे सर्वत्र गवत सुकलेले आहे. दिवाळीत आतापर्यंत शहरात २५ ते ३० आगीच्या घटना घडल्या असून, नागरिकांनी गर्दीच्या व इमारतींच्या परिसरात फटाके न फोडता मोकळ्या मैदानातच सुरक्षितपणे फटाके फोडावेत. – विशाल शिर्के, अग्निशमन अधिकारी
महापालिकेच्या जागेत कंत्राटदारांचे पाईप आणि रस्त्यांवर कचऱ्याच्या गाड्या डम्प केल्या जात आहेत. याबाबत वारंवार तक्रार करूनही अधिकारी गांभीर्याने घेत नाहीत. नागरिकांनीही उंच टॉवर्सच्या आवारात फॅन्सी फटाके न फोडता मोकळ्या मैदानात दिवाळी साजरी करावी.
– विशाल जाधव, नगरसेवक
Ans: गेल्या दोन दिवसांत वसई-विरार शहर परिसरात लहान-मोठ्या मिळून तब्बल २५ ते ३० आगीच्या घटना घडल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.
Ans: महापालिकेच्या जागेवर कंत्राटदाराने निष्काळजीपणे टाकून ठेवलेले पीव्हीसी पाईप, ऑक्टोबर-नोव्हेंबरची वाढती उष्णता, सुकलेले गवत आणि फटाके किंवा रॉकेटची ठिणगी पडल्यामुळे ही भीषण आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
Ans: उंच इमारतींच्या (टॉवर्स) आवारात किंवा गजबजलेल्या भागात 'फॅन्सी शॉट्स' व रॉकेट न फोडता नागरिकांनी मोकळ्या मैदानातच सुरक्षितपणे फटाके फोडावेत, असे आवाहन अग्निशमन अधिकारी विशाल शिर्के यांनी केले आहे.