Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MSEDCL Scam : वादग्रस्त जागा महावितरणच्या गळ्यात! बिल्डरांवर गुन्हा; नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमण करुन फसवणूक

MSEDCL Scam : पालघर जिल्ह्यातील वसई येथील पोमण येथे महावितरणची फसवणूक केल्याचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मेसर्स रॉयल इंडस्ट्रियल हबच्या बिल्डरांनी नैसर्गिक पाण्याच्या नाल्यावर अतिक्रमण करून बनावट मोजणी नकाशाच्या आधारे ४ कोटी ८१ लाख रुपयांची जमीन महावितरणला भाडेपट्ट्याने दिली.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Nov 01, 2026 | 11:18 AM
वादग्रस्त जागा महावितरणच्या गळ्यात! ( सौजन्य - सोशल मीडिया )

वादग्रस्त जागा महावितरणच्या गळ्यात! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • वादग्रस्त जागा महावितरणच्या गळ्यात!
  • बिल्डरांवर गुन्हा
  • नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमण करुन फसवणूक
MSEDCL Scam : महावितरणच्या डोळ्यात धूळ फेकत नैसर्गिक पाण्याच्या नाल्यावर अतिक्रमण करून तीच वादग्रस्त जागा महावितरणच्या गळ्यात मारण्याचा आणि शासनाला तब्बल ४ कोटी ८१ लाख रुपयांचा गंडा घालण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मेसर्स रॉयल इंडस्ट्रियल हबचे भागीदार पदमशी कल्याणजी गजरा आणि हरेश रामजी भानुशाली यांनी बनावट खासगी मोजणी नकाशाच्या आधारे महावितरण कंपनीची ही महाफसवणूक केली आहे. याप्रकरणी महावितरणच्या फिर्यादीवरून नायगाव पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ( MSEDCL Scam ) 

Mira Bhayander School Shoes Scam : 160 रुपयांचा बूट 500 रुपयांना; महापालिका शाळांतील सहित्यांत गैरव्यवहार, खळबळजनक माहिती समोर

अधिकृत नोंदीमधून महाघोटाळ्याचा पर्दाफाश

पोमण (ता. वसई) येथील सव्हें क्र. १२६/१/१ मधील एकूण १८५८ चौरस मीटर जागा मे. रॉयल इंडस्ट्रियल डब कंपनीने सन २०१५ मध्ये महावितरणला नवीन वीज वितरण उपकेंद्र उभारणीसाठी भाडेपट्ट्याने दिली होती. या जागेवर महावितरणने ४ कोटी ८१ लाख ४१ हजार ३४० रुपये खर्च करून २० मेगावॅट (२२/२२ केव्ही) क्षमतेचे वीज उपकेंद्र (स्विचिग स्टेशन) उभारले. तर माहिती फलकानुसार संपूर्ण प्रकल्पाचा खर्च ८ कोटी ३५ लाख रुपये नमूद आहे. मात्र, माहिती अधिकार कार्यकर्ते चंदू विजय पाटील यांनी सह दुय्यम निबंधक कार्यालय आणि उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडून अधिकृत नौदी मिळवल्या असता महाघोटाळ्याचा पर्दाफाश झाला.

तत्कालीन अधिकाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता

अपर जिल्हाधिकारी दत्तात्रेय कवितके यांनी याप्रकरणी कडक कारवाईचे निर्देश दिल्यानंतर महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रवीण उद्धवराव सुटे यांनी नायगाव पोलिस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली. पोलिसांनी पदमशी कल्याणजी गजरा (वय ६०) आणि हरेश रामजी भानुशाली (वय ५०, दोघे रा. पोमण) यांच्याविरुद्ध गुन्हा गुन्हा नोंदवला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रणजित नलवडे पुढील तपास करत असून, विकासकांवर आता अटकेची टांगती तलवार आहे. याप्रकरणात महावितरणच्या तत्कालीन अधिकाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता आहे.

शासकीय मोजणीत गैरव्यवहार चव्हाट्यावर

भूमी अभिलेख विभागामार्फत झालेल्या अधिकृत शासकीय मोजणीत धक्कादायक वास्तव समोर आले. महावितरणला दिलेल्या एकूण जागेपैकी तब्चल ६२४.४८ चौरस मीटर क्षेत्र नैसर्गिक पाण्याचा नाला असल्याचे स्पष्ट झाले. पदमशी गजरा आणि हरेश भानुशाली यांनी या नाल्यावरील अतिक्रमण स्वतःच्या मालकीचे असल्याचे भासवले. त्यांनी जागेचा खोटा खासगी मोजणी नकाशा तयार करून ती महावितरण कंपनीला भाडेपट्ट्याने दिली. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केल्याचे कोकण विभागीय आयुक्तांकडे सादर झालेल्या चौकशी अहवालातही सिद्ध झाले.

Mumbai Air Pollution : दिल्ली मागे पडली, मुंबईत श्वास घेणंही कठीण! प्रदूषणाची पातळी वाढल्याने वाहतूक पोलिसांचे आरोग्य धोक्यात

💡

Frequently Asked Questions

  • Que: महावितरणची फसवणूक करण्याचे प्रकरण नेमके काय आहे?

    Ans: बिल्डरांनी नैसर्गिक पाण्याच्या नाल्याची ६२४ चौरस मीटर जागा स्वतःच्या मालकीची असल्याचे भासवून बनावट नकाशाच्या आधारे महावितरणला वीज उपकेंद्र उभारण्यासाठी भाडेपट्ट्याने दिली होती.

  • Que: प्रकरणामुळे शासनाचे किती रुपयांचे नुकसान झाले आहे?

    Ans: या बनावट प्रक्रियेमुळे महावितरण आणि शासनाची ४ कोटी ८१ लाख ४१ हजार ३४० रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे.

  • Que: याप्रकरणी कोणाविरुद्ध आणि कुठे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत?

    Ans: मेसर्स रॉयल इंडस्ट्रियल हबचे भागीदार पदमशी कल्याणजी गजरा आणि हरेश रामजी भानुशाली यांच्याविरुद्ध नायगाव पोलिस ठाण्यात अधिकृत फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Web Title: Msedcl scam natural nalla encroachment vasai poman marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 11:18 AM

Topics:  

  • scam

संबंधित बातम्या

Mira Bhayander  School Shoes Scam : 160 रुपयांचा बूट 500 रुपयांना; महापालिका शाळांतील सहित्यांत गैरव्यवहार, खळबळजनक माहिती समोर
1

Mira Bhayander School Shoes Scam : 160 रुपयांचा बूट 500 रुपयांना; महापालिका शाळांतील सहित्यांत गैरव्यवहार, खळबळजनक माहिती समोर

बँकिंग आणि वैयक्तिक डेटा कसा ठेवाल सुरक्षित? सायबर फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आजच करा हे उपाय
2

बँकिंग आणि वैयक्तिक डेटा कसा ठेवाल सुरक्षित? सायबर फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आजच करा हे उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.