Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Virar Illegal Construction Scam : बनावट परवानग्यांवर अनधिकृत इमारतींचा गोरखधंदा; महारेरा नोंदणीशिवाय सदनिकांची विक्री, दस्तनोंदणी!

Virar Illegal Construction Scam : विरार पूर्वेकडील नारंगी परिसरात बनावट बांधकाम परवानग्यांच्या आधारे बेकायदेशीर इमारती उभारून सदनिकांची सर्रास विक्री केल्याचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 17, 2026 | 09:45 AM
विरारमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीर फ्लॅट्सची विक्री ( सौजन्य - सोशल मीडिया )

विरारमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीर फ्लॅट्सची विक्री ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • सर्वसामान्यांची आयुष्यभराची पुंजी धोक्यात!
  • बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीर फ्लॅट्सची विक्री
  • मोठे रॅकेट उघड
Virar Illegal Construction Scam :  बनावट बांधकाम परवानग्यांचा वापर केल्याप्रकरणी स्वतः महापालिकेने पोलिसात गुन्हे दाखल केलेले असतानाही, विरार पूर्वेकडील नारंगी परिसरात सर्रास इमारती उभ्या राहिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे, या प्रकल्पांची महारेराकडे कोणतीही नोंदणी नसताना, ग्राहकांना या इमारती अधिकृत असल्याचा भास निर्माण करून सदनिकांची विक्री व दस्तनोंदणी करण्यात आली आहे. याप्रकरणी त्रिरुपती बालाजी कन्स्ट्रक्शन आणि व्ही. व्ही. कन्स्ट्रक्शन यांच्यासह महापालिका अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, महापालिका आयुक्तांकडे ४०० पानांच्या पुराव्यांसह उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली आहे. ( Virar Illegal Construction Scam ) 

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय! 6 फुटांपर्यंतच्या POP Ganpati Visarjan कृत्रिम तलावातच; मोठ्या मूर्तींना सशर्त मुभा

बांधकामे न थांबता पूर्णत्वास कशी गेली?

नारंगी येथील सव्र्व्हे नं. २२५ (हिस्सा नं. ५ व ८) तसेच सर्व्हे नं. २३२ (हिस्सा नं. ५) या जागेवर ‘शिवशक्ती अपार्टमेंट’ (विंग ए, बी), ‘शिवशक्ती अपार्टमेंट-२’ (विंग ए, बी, सी) तसेच ‘ध्रुवी हाइट्स’ आणि ‘ध्रुवी हाइट्स ०२’ या इमारती या उभारण्यात आल्या आहेत. बांधकामांच्या परवानग्या बनावट असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तत्कालीन सहाय्यक आयुक्तांनी विरार पोलिस ठाण्यात २०२३ मध्ये गुन्हे दाखल केले होते. तरीही ही बांधकामे न थांबता पूर्णत्वास कशी गेली आणि त्यातील सदनिकांची विक्री कशी झाली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

स्वतंत्र चौकशी करावी

या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करून मूळ डिजिटल अभिलेख सुरक्षित करावेत आणि दोषी विकासक, अधिकारी यांच्यावर कठोर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्वतः बनावट बांधकाम परवानग्यांविरोधात गुन्हे दाखल केले असतानाही इमारती पूर्ण कशा झाल्या? महारेरा नोंदणी नसताना दस्तनोंदणी आणि सदनिकांची विक्री कशी झाली? सर्वसामान्य नागरिकांनी आयुष्यभराची कमाई खर्च करून घरे घेतली आहेत. यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे.

नागरिकांची फसवणूक

माहितीच्या अधिकारात नगररचना विभागाने दिलेल्या लेखी उत्तरात स्पष्ट केले आहे की, संबंधित सव्हें क्रमांकांवरील बांधकाम परवानगी क्रमांकांची महापालिकेच्या संगणकीय प्रणालीत कोणतीही अधिकृत नोंद नाही. सहदुय्यम निबंधकांना अशा इमारतींची दस्तनोंदणी करू नये असे पत्र दिले असतानाही सदनिकांची दस्तनोंदणी व मालमत्ता कर आकारणी सर्रासपणे करण्यात आली. महारेराची सक्तीची नोंदणी नसतानाही सर्वसामान्य नागरिकांची आयुष्यभराची पुंजी लाटून त्यांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. अनधिकृत बांधकामांची दस्तनोंदणी करू नये, असे निर्देश असताना सहनिबंधक कार्यालयात सर्रासपणे दस्त नोंदणी केली जात असल्याचे अनेकदा उजेडात आले आहे.

Vasai Virar Heavy Rain : बाप्पाच्या स्वागताला पावसाचे विघ्न! वसई-विरारमध्ये गुडघाभर पाणी; पुढील काही दिवस…

Web Title: Virar illegal construction racket fake permission flat sale scam marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 09:45 AM

Topics:  

  • illegal construction
  • scam
  • Vasai Virar

संबंधित बातम्या

Vasai Virar Heavy Rain : बाप्पाच्या स्वागताला पावसाचे विघ्न! वसई-विरारमध्ये गुडघाभर पाणी; पुढील काही दिवस…
1

Vasai Virar Heavy Rain : बाप्पाच्या स्वागताला पावसाचे विघ्न! वसई-विरारमध्ये गुडघाभर पाणी; पुढील काही दिवस…

Vasai Virar Bus Strike : गणेशोत्सवातच बस सेवा ठप्प! वसई-विरारच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; हजारो प्रवाशांचे हाल
2

Vasai Virar Bus Strike : गणेशोत्सवातच बस सेवा ठप्प! वसई-विरारच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; हजारो प्रवाशांचे हाल

२१ लाखांचा मुद्देमाल जप्त; मेहकर, सिंदखेडराजा अन् बुलढाणा तालुक्यात कारवाई, अवैध बायोडिझेल विक्रीचा पर्दाफाश
3

२१ लाखांचा मुद्देमाल जप्त; मेहकर, सिंदखेडराजा अन् बुलढाणा तालुक्यात कारवाई, अवैध बायोडिझेल विक्रीचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.