सातारा नगरपालिकेने गणेश विसर्जनाच्या मार्गावरील असणाऱ्या धोकादायक इमारती व अन्य शहरातील इमारतींवर डेंजर झोन म्हणून घोषित केले. तरी त्या-त्या इमारतीमध्ये राहणारे नागरिक अजून सजग झाले नसल्याचे दिसून येत आहे.
MNS : प्रस्तावित जामदा प्रकल्प क्षेत्रात अनधिकृत बांधकाम होत असल्याचे समोर आले आहे. या अनधिकृत बांधकामांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांनी या निर्देशांची अंमलबजावणी करताना प्रचलित कायदे, नियम व शासन निर्णयांचे पालन करावे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचा कोणत्याही परिस्थितीत अवमान होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही नमूद करण्यात…
Virar Illegal Construction Scam : विरार पूर्वेकडील नारंगी परिसरात बनावट बांधकाम परवानग्यांच्या आधारे बेकायदेशीर इमारती उभारून सदनिकांची सर्रास विक्री केल्याचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे.
अगदी पूर्वीपासून या रस्त्यावरून वाहनांची ये-जा व पायवाट सुरू आहे. सध्या येथे अचानक बेकायदेशीरपणे बांधकाम सुरू केल्याने नागरिकांना, शेतकऱ्यांना, शाळकरी विद्यार्थ्यांना इतर वाहनांना ये-जा करण्यास मोठा अडथळा निर्माण होत आहे.
Vasai Illegal Construction: मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घोडबंदर परिसरातील अनधिकृत व्यावसायिक बांधकामावर तोडक कारवाई करण्यासाठी गेलेल्या वसई-विरार महापालिकेच्या पथकाने ऐनवेळी माघार घेतल्याने पालिका प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
एकीकडे महापालिका प्रशासन कारवाईचा दावा करत असतानाच, दुसरीकडे नागरिकांनी या कारवाईच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शहरातील अनेक भागांत केवळ दिखाऊ स्वरूपाची कारवाई केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
पाचगणीत 270 अनधिकृत बांधकामांपैकी केवळ एका बांधकामावर बुलडोझर कारवाई झाल्याने निवडक कारवाईचा आरोप होत आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि महसूल दलालांच्या संगनमतातून काही बांधकामांना संरक्षण दिले जात असल्याचा संशय व्यक्त केला…
महापालिकेच्या अतिक्रमण व बांधकाम निर्मूलन विभागाने खराडी भागातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत सुमारे 80 हजार चौरस फूट बांधकाम पाडले. यावेळी काही रहिवाशांनी विरोध केला, तर एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न…
वसई परिसरात अनधिकृत बांधकामांना यापुढे थारा मिळणार नाही आणि शहराच्या सौंदर्यात बाधा आणणाऱ्या गोष्टींवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा महापौर अजीव पाटील यांनी दिला.
पीएमआरडीएच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने १ डिसेंबर २०२५ रोजी या अनधिकृत प्लॅन्टवर कारवाई करताना पोकलेन मशीनच्या सहाय्याने प्लॅन्टचे लोखंडी पत्राशेड व आरसीसी वॉल तोडले.
मुंबई शहरातल्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात सरकारी जमिनींवर आणि कांदळवनावर अतिक्रमण होत आहे. प्रामुख्याने शासनाच्या मोकळ्या जमिनींवर हे अतिक्रमण होत असून याला आळा घालणे गरजेचे झाले आहे.
Hinjewadi News: गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे हिंजवडी परिसरातील रस्त्यांवर पाणी साचले होते. काही रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. परिणामी, अनेक वाहने पाण्यात अडकली होती
पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी संबंधित परिसराची (दि. १ जुलै) पाहणी करून अतिक्रमण, अडथळा आणि प्रवाह बदललेल्या ओढ्यांविरोधात त्वरित कारवाईचा इशारा दिला होता.
कल्याण डोंबिवली महापालिकेत ६५ बेकायदा इमारतीचा विषय सुरु आहे. केडीएमसीचा दावा आहे की अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कारवाई केली जाते. सध्या केडीएमसीच्या आयुक्त पदाचा पदभार अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांच्याकडे आहे.