Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विरार स्थानक होणार हायटेक! चौपदरीकरण प्रकल्पाला वेग, पुनर्विकास अंतिम टप्प्यात; प्रवाशांना मिळणार ‘या’ सुविधा

विरार-डहाणू रोड चौपदरीकरण प्रकल्पामुळे विरार रेल्वे स्थानकाचा कायापालट वेगाने सुरू आहे. पुनर्विकासाची अनेक महत्त्वाची कामे अंतिम टप्प्यात असून प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 04, 2026 | 12:34 PM
विरार स्थानक होणार हायटेक! चौपदरीकरण प्रकल्पाला वेग, पुनर्विकास अंतिम टप्प्यात; प्रवाशांना मिळणार 'या' सुविधा

विरार स्थानक होणार हायटेक! चौपदरीकरण प्रकल्पाला वेग, पुनर्विकास अंतिम टप्प्यात; प्रवाशांना मिळणार 'या' सुविधा

Follow Us
Follow Us:
  • विरार स्थानकाच्या पुनर्विकासातील अनेक महत्त्वाची कामे अंतिम टप्प्यात.
  • नवीन स्थानक इमारत, एलिव्हेटेड डेक आणि प्रवासी सुविधांची उभारणी वेगाने सुरू.
  • विस्तीर्ण प्लॅटफॉर्म आणि नव्या सुविधांमुळे गर्दीचे व्यवस्थापन अधिक प्रभावी होणार.
विरार-डहाणू रोड चौपदरीकरण प्रकल्पामुळे विरार स्थानकाचा चेहरामोहरा वेगाने बदलत आहे. स्थानकाच्या पुनर्विकासाची अनेक महत्त्वाची कामे अंतिम टप्प्यात असून, नवीन स्थानक इमारत, एलिव्हेटेड डेक, विस्तीर्ण प्लॅटफॉर्म, तिकीट कार्यालये आणि पादचारी पुलामुळे भविष्यात प्रवाशांना अधिक आधुनिक आणि सोयीस्कर सुविधा उपलब्ध होणार आहेत.

Palghar News : बंदी काळात पर्ससीन मासेमारीस मुभा, पारंपरिक मच्छीमार आक्रमक; संघटनांकडून आंदोलनाचा पवित्रा

मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) दिलेल्या माहितीनुसार, पुनर्विकास प्रकल्पांतर्गत आरपीएफ-जीआरपी इमारत, आरआरआय इमारत, विरार-वैतरणा दरम्यानची मिड-सेक्शन आरआरआय इमारत, उंच पाण्याची टाकी, गैंग टूल रूम, इनडोअर सबस्टेशन तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक ८ जवळील दोन नाल्यांवरील पुलांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे प्रकल्पाच्या पुढील टप्प्यातील कामांना गती मिळाली आहे. नवीन स्थानक इमारत आणि सुमारे ८ हजार चौरस मीटरच्या एलिव्हेटेड डेकचे काम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत ३६ खांब उभारण्यात आले असून १६० गर्डर बसविण्यात आले आहेत. सुमारे २ हजार चौरस मीटर क्षेत्रातील डेकचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. स्थानक इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील स्लॅबचे काम पूर्ण झाले असून आता आतील बांधकाम आणि इतर पूरक कामे सुरू आहेत.

या कामांचा समावेश

  • आरपीएफ जीआरपी इमारतीची कामे पूर्ण आरआरआय
  • ८ हजार चौ. मी. एलिव्हेटेड डेकचे काम सुरू
  • ३६ खांब उभारले, १६० गर्डर बसविले
  • २ हजार चौ. मी. डेकचे कॉक्रीटीकरण पूर्ण
  • प्लॅटफॉर्म ५-बी १५ डब्यांच्या लोकलसाठी खुला
  • नवीन बुकिंग कार्यालय सुरू
  • नारंगी गेटजवळ नवीन पादचारी पूल सुरू
  • प्लॅटफॉर्म ३-अ व ४-अची रुंदी १०.५ मीटरपर्यंत वाढविली
  • दोन्ही प्लॅटफॉर्मची लांबी ६० मीटरने वाढविली
अद्ययावत प्रवाशांच्या सोयी पुरवण्यावर भर

एलिव्हेटेड डेकच्या कामामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक ३ आणि ४ वरील तिकीट कार्यालय नवीन इमारतीत स्थलांतरित करण्यात आले आहे. स्थानकाच्या पूर्व बाजूस तीन तिकीट खिडक्यांसह नवीन बुकिंग कार्यालय सुरू करण्यात आले आहे.
प्लॅटफॉर्म क्रमांक ५-बीचे काम पूर्ण इाल्यानंतर तो १५ डब्याच्या लोकल गाड्यांसाठी खुला करण्यात आला आहे. विरार-वैतरणा दरम्यान नारंगी गेटजवळील नवीन पादवारी पूलही प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला आहे.

Vasai News : कचऱ्यात अडकलं शहराचं सौंदर्य, कोट्यवधींच्या शिल्पांची दुरवस्था; देखभालीसाठी पुन्हा 3 कोटींचा खर्च

गर्दीचे व्यवस्थापन होणार अधिक प्रभावी

वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून प्लॅटफॉर्म क्रमांक ३-अ आणि ४-अ यांची रुंदी ६.५ मीटरवरून १०.५ मीटर करण्यात आली आहे. तसेच दोन्ही प्लॅटफॉर्म ६० मीटरने वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे गर्दीच्या वेळी प्रवाशांची ये-जा अधिक सुलभ होणार असून स्थानकाची प्रवासी हाताळण्याची क्षमता वाढण्यास मदत होईल.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Virar railway station redevelopment virar dahanu fourth line project update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • development
  • NAVARASHTRA
  • virar

संबंधित बातम्या

Buldhana News : दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन; ‘भीक मांगो’ करत सरकारविरोधात आक्रोश
1

Buldhana News : दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन; ‘भीक मांगो’ करत सरकारविरोधात आक्रोश

अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ट्रॅफिक अलर्ट; वरळीसह दादरमधील वाहतुकीत बदल
2

अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ट्रॅफिक अलर्ट; वरळीसह दादरमधील वाहतुकीत बदल

Virar News: ‘हिंदूंच्या सणांना बंदी का?’ विरारच्या कोपरीत गणेश विसर्जनावरून ग्रामस्थ आक्रमक, तणावाचे वातावरण
3

Virar News: ‘हिंदूंच्या सणांना बंदी का?’ विरारच्या कोपरीत गणेश विसर्जनावरून ग्रामस्थ आक्रमक, तणावाचे वातावरण

बुटांमधून येणाऱ्या दुर्गंधीने वैतागलायत? ‘या’ ३ सोप्या टिप्स वापरा आणि कायमची सुटका मिळवा
4

बुटांमधून येणाऱ्या दुर्गंधीने वैतागलायत? ‘या’ ३ सोप्या टिप्स वापरा आणि कायमची सुटका मिळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.