Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: मतदार यादीतून नाव वगळलं गेलंय? चंद्रपुरातील पात्र मतदारांना पुन्हा संधी; तातडीने करा ही प्रक्रिया

प्रारूप मतदार यादीत नावे समाविष्ट होऊ न शकलेल्या पात्र मतदारांना अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट करून घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने पुन्हा एक संधी उपलब्ध करून दिली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 08, 2026 | 01:37 PM
Chandrapur News: मतदार यादीतून नाव वगळलं गेलंय? चंद्रपुरातील पात्र मतदारांना पुन्हा संधी; तातडीने करा ही प्रक्रिया

Chandrapur News: मतदार यादीतून नाव वगळलं गेलंय? चंद्रपुरातील पात्र मतदारांना पुन्हा संधी; तातडीने करा ही प्रक्रिया

Follow Us
Follow Us:
  • पात्र मतदारांना अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट करून घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने पुन्हा एक संधी
  • ज्या मतदारांचे वास्तव्य पूर्वीच्या पत्त्यावरच आहे, त्यांनी गणना प्रपत्रासोबत परिशिष्ट-बी मधील निवेदन सादर करावे
  • पात्र मतदारांनी निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या संधीचा लाभ घ्यावा
चंद्रपूर: विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा दुबार म्हणून नोंद झाल्यामुळे प्रारूप मतदार यादीत नावे समाविष्ट होऊ न शकलेल्या पात्र मतदारांना अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट करून घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने पुन्हा एक संधी उपलब्ध करून दिली आहे. संबंधित मतदारांनी आवश्यक गणना प्रपत्र व निवेदन सादर करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.

Mumbai Fire: “आगीचे लोळ अन् लोकांमध्ये प्रचंड दहशत!” प्रभादेवी परिसरात भीषण दुर्घटनेने उडाली खळबळ; अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल!

भारत निवडणूक आयोगाच्या ६ नोव्हेंबर रोजीच्या निर्देशानुसार, विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत ज्या मतदारांना गणना प्रपत्र वितरित करण्यात आले होते, मात्र विविध कारणांमुळे त्यांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होऊ शकली नाहीत, अशा मतदारांची मतदान केंद्रनिहाय यादी पुन्हा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

ही यादी संबंधित मतदान केंद्रांचे सूचना फलक, ग्रामपंचायत कार्यालये, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये तसेच संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. याशिवाय मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावरही ही यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या संबंधित मतदारांनी भरलेले व स्वाक्षरी केलेले गणना प्रपत्र मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे सादर करावे.

ज्या मतदारांचे वास्तव्य पूर्वीच्या पत्त्यावरच आहे, त्यांनी गणना प्रपत्रासोबत परिशिष्ट-बी मधील निवेदन सादर करावे. या निवेदनात यापूर्वी गणना प्रपत्र सादर न करण्याचे कारण नमूद करणे आवश्यक आहे. संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत अशा मतदारांशी संपर्क साधून त्यांना आवश्यक मार्गदर्शन व गणना प्रपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

आनंदाची बातमी ! आता जमीन नावावर नसली तरी शेतकऱ्यांना मिळणार फार्मर आयडी; सन्मान निधीचा मार्ग मोकळा

कागदपत्रांसह गणना प्रपत्र सादर करण्याचे आवाहन

प्राप्त अर्जाची नियमानुसार तपासणी व पडताळणी केल्यानंतर पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्याची कार्यवाही करण्यात येईल. कोणताही पात्र मतदार आपल्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये हे सुनिश्चित करण्यासाठी, आपले नाव प्रारूप मतदार यादीत समाविष्ट आहे की नाही, हे तपासून पाहावे. नाव समाविष्ट नसल्यास आवश्यक कागदपत्रांसह गणना प्रपत्र विहित पद्धतीने सादर करावे. जिल्ह्यातील सर्व संबंधित पात्र मतदारांनी निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Chandrapur news election commission offers another chance to add missing names to final voter list hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 01:37 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Divyanka Tripathi: T1-T2 चा सस्पेन्स अखेर संपला! दिव्यांका त्रिपाठी-विवेक दहियाने जाहीर केली जुळ्यांची नावं
1

Divyanka Tripathi: T1-T2 चा सस्पेन्स अखेर संपला! दिव्यांका त्रिपाठी-विवेक दहियाने जाहीर केली जुळ्यांची नावं

Hindustan Coca-Cola IPO 2026: गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! कोका-कोला आणणार मेगा IPO
2

Hindustan Coca-Cola IPO 2026: गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! कोका-कोला आणणार मेगा IPO

Board Exam Topper Habits: दहावी-बारावीच्या परीक्षा जवळ आल्यात? पारंपरिक सल्ल्यांना फाटा देऊन ‘असा’ करा स्मार्ट स्टडी
3

Board Exam Topper Habits: दहावी-बारावीच्या परीक्षा जवळ आल्यात? पारंपरिक सल्ल्यांना फाटा देऊन ‘असा’ करा स्मार्ट स्टडी

Siddharth Chandekar and Mitali New House: सिद्धार्थ-मितालीच्या ‘द टेराकोटा हाऊस’ची पहिली झलक
4

Siddharth Chandekar and Mitali New House: सिद्धार्थ-मितालीच्या ‘द टेराकोटा हाऊस’ची पहिली झलक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.