Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांना श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या शासकीय महापूजेचे निमंत्रण

मुख्यमंत्री फडणवीस यांना मंदिर समितीमार्फत आषाढी यात्रेच्या नियोजनाची करण्यात आलेली तयारी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धन कामाची माहिती देण्यात आली.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 18, 2025 | 02:35 AM
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांना श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या शासकीय महापूजेचे निमंत्रण
Follow Us
Close
Follow Us:
मुंबई /पंढरपूर:  आषाढी शुध्द एकादशी रविवार दि. 06 जुलै, 2025 रोजी आहे. या दिवशी पहाटे मुख्यमंत्री महोदय व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची शासकीय महापूजा करण्यात येणार असून, महापूजेचे निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आज दिनांक 17 जून रोजी वर्षा निवासस्थान, मुंबई येथे मंदिर समितीकडून देण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगावकर), ॲड. माधवी निगडे, अतुलशास्त्री भगरे गुरुजी, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, ह.भ.प. शिवाजीराव मोरे व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा मंदिर समितीच्या वतीने सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते विणा, वारकरी पटका, श्रींची मूर्ती, उपरणे, चिपळ्या देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांना मंदिर समितीमार्फत आषाढी यात्रेच्या नियोजनाची करण्यात आलेली तयारी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धन कामाची तसेच विठ्ठल रुक्मिणी मातेचे जलद व सुलभ दर्शन होण्याच्या दृष्टीने राबवण्यात आलेल्या टोकन दर्शन प्रणालीची माहिती मंदिर समितीचे सह.अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी यावेळी दिली.

आषाढी वारीबाबत सरकारचा मोठा निर्णय

आषाढी एकादशी यात्रा २०२५ करिता मानाच्या १० पालख्यांसोबतच्या १ हजार १०९ दिंड्यांना प्रती दिंडी २० हजार रुपये अनुदान वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. गतवर्षी आषाढी एकादशी यात्रा सन २०२४ करिता मानाच्या १० पालख्यांसोबत येणाऱ्या प्रत्येक दिंडीला २० हजार रुपये इतके अनुदान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्याबाबत प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार २०२३-२४ मध्ये विभागीय आयुक्त, पुणे यांच्याकडून एकूण १ हजार १०९ दिंड्यांची यादी प्राप्त झाली होती. यावर्षीदेखील दिंड्यांना प्रतिदिंडी २० हजार रुपये याप्रमाणे एकूण २ कोटी २१ लाख ८० हजार रुपये अनुदान वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Ashadhi Wari 2025 : आषाढी वारीबाबत सरकारचा मोठा निर्णय, प्रत्येक दिंडीला…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे बैठक घेऊन पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांना उत्तम सुविधा देण्याचे निर्देश दिले आहेत. उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनीदेखील आवश्यक सुविधांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही दिली आहे. प्रशासनातर्फे व्यापक स्तरावर नियोजन करण्यात येत आहे. मागील वर्षाप्रमाणे यावर्षीदेखील प्रत्येक दिंडीला २० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार असल्याने दिंडीतील वारकऱ्यांसाठी अधिक सुविधा उपलब्ध होऊ शकतील.

Web Title: Pandharpur temple invitation to cm devendra fadnavis about vitthal rukmini mahapuja

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • Ashadhi Wari
  • DCM Devendra Fadnavis
  • pandharpur

संबंधित बातम्या

विठ्ठलाचा ‘श्वास’ प्रदूषणाच्या विळख्यात; लाखो भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर, ‘नमामि चंद्रभागा’…
1

विठ्ठलाचा ‘श्वास’ प्रदूषणाच्या विळख्यात; लाखो भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर, ‘नमामि चंद्रभागा’…

Maharashtra Politics: “अहमदनगर नव्हे अहिल्यानगरचा महापौर…”; CM फडणवीसांची तोफ धडाडली
2

Maharashtra Politics: “अहमदनगर नव्हे अहिल्यानगरचा महापौर…”; CM फडणवीसांची तोफ धडाडली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.