पंढरपूर : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला भोंग्याबाबतच्या निर्णयाचा फटका बसणार आहे. मंदिरातून होणारी काकड आरती आणि धुपारती आता स्पीकरवरुन लावता येणार नाही. त्यामुळे विठ्ठल मंदिर प्रशासनाने आता पोलिसांकडे स्पीकर वापरासाठी परवानगी घेण्याची तयारी सुरु केली आहे.
भोंग्यावरुन सध्या राज्यात मोठा गोंधळ सुरू आहे. याचा फटका शिर्डीच्या साई मंदिराला बसला होता. त्यानंतर आता पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला बसणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, विठ्ठल मंदिरात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्पीकर वापरला जाईल, असे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले आहे. याबाबत भाविकांच्या भावना मात्र अतिशय टोकाच्या असून, कोणत्याही परिस्थितीत विठ्ठल मंदिरावरील स्पीकर बंद करु नये, अशी भूमिका विठ्ठलभक्त घेत आहेत.
सर्वच धर्माला सारखा नियम असल्याचं त्यांच्या निदर्शनास आणताच मंदिर आणि मशिद या कशावरही भोंगे काढू नयेत. फक्त आवाजाची अट पालन करण्याची सक्ती करावी. मात्र, मंदिर आणि मशिदीवरील भोंगे तसेच ठेवण्याचा आग्रह विठ्ठलभक्तांचा आहे.