Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashadhi Wari: चंद्रभागेच्या तिरावर सुरक्षेसाठी हायॲलर्ट! आराखडा तयार; वारीसाठी १७ रेस्क्यू बोटींसह यंत्रणा सज्ज

चंद्रभागा नदीतील प्रवासी होड्‌यांसाठी १,०४५ लाईफ जॅकेट उपलब्ध करून देण्यात आली असून, त्याचे नियोजन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे. वारीदरम्यान बचावकार्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील ११, पुणे जिल्ह्यातील २ आणि एनडीआरएफच्या ४ अशा एकूण १७ रेस्क्यू बोटी तैनात करण्यात आल्या आहेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 22, 2026 | 11:30 AM
चंद्रभागेच्या तिरावर सुरक्षेसाठी हायॲलर्ट! आराखडा तयार; वारीसाठी १७ रेस्क्यू बोटींसह यंत्रणा सज्ज

चंद्रभागेच्या तिरावर सुरक्षेसाठी हायॲलर्ट! आराखडा तयार; वारीसाठी १७ रेस्क्यू बोटींसह यंत्रणा सज्ज

Follow Us
Follow Us:

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर चंद्रभागा नदी आणि पालखी मार्गावरील भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने व्यापक आपत्कालीन यंत्रणा सज्ज केली आहे. यंदा प्रथमच सोलापूर जिल्ह्याचे स्वतःचे महिलांचे बचाव पथक वारीत तैनात करण्यात येणार असून, आपत्कालीन प्रतिसादासाठी अत्याधुनिक साधनसामग्री आणि प्रशिक्षित पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. आपत्कालीन व्यवस्थेसाठी सहा अग्निशमन वाहने आणि एक रेस्क्यू व्हॅन तैनात करण्यात आली आहे. रेस्क्यू व्हॅनची जबाबदारी पंढरपूर नगरपालिकेचे अग्निशमन अधिकारी संभाजी कारले यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.(फोटो सौजन्य – AI)

‘कानडा राजा पंढरीचा’तून भक्तीचा जागर! आषाढी एकादशीनिमित्त मुंबईत विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन

चंद्रभागा नदीतील प्रवासी होड्‌यांसाठी १,०४५ लाईफ जॅकेट उपलब्ध करून देण्यात आली असून, त्याचे नियोजन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे. वारीदरम्यान बचावकार्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील ११, पुणे जिल्ह्यातील २ आणि एनडीआरएफच्या ४ अशा एकूण १७ रेस्क्यू बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, वॉकी-टॉकी, मेगाफोन, इन्फ्लेटेबल टेंट, रेस्क्यू रोप, टॉर्च, लेझर पॉइंटर आणि लाईट बॅटनसह आवश्यक साहित्य सज्ज ठेवण्यात आले आहे. या संपूर्ण यंत्रणेचे समन्वयक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले आहेत.

जिल्ह्याचे प्रथमच महिलांचे बचाव पथक

यंदाच्या आषाढी वारीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सोलापूर जिल्ह्याचे स्वतंत्र महिलांचे बचाव पथक प्रथमच कार्यरत राहणार आहे. या पथकाने यापूर्वी सीना नदीच्या पुरात सुमारे ३०० नागरिकांचे प्राण वाचविण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. तसेच कार्तिकी, चैत्र आणि माघ वारीतही या पथकाने प्रभावी बचावकार्य केले आहे. बोट ॲम्ब्युलन्सचीही तयारीरेड क्रॉसच्या माध्यमातून वैद्यकीय पथक उपलब्ध झाल्यास बोट अॅम्ब्युलन्स सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. चंद्रभागा नदीपात्र आणि घाट परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी संपूर्ण आपत्कालीन यंत्रणा २४ तास सतर्क राहणार असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांनी दिली.

तेजोत्सवात न्हाले विठ्ठल मंदिर! संपू्र्ण परिसर झाला प्रकाशमय; पंढरीचे आध्यात्मिक वैभव खुलले

चंद्रभागा नदीत गस्त आणि बचाव कार्यासाठी १८० प्रशिक्षित बचावकर्मी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये एनडीआरएफ, विविध जिल्ह्यांतील आपदा मित्र, स्वयंसेवी बचाव संस्था, स्थानिक होडीवाले, महिला रेस्क्यू पथक आणि पोलिस पाटील यांचा समावेश आहे. वारीच्या काळात रेस्क्यू बोटीची तत्काळ दुरुस्ती करता यावी, यासाठी दोन मेकॅनिकही पंढरपूरमध्ये तैनात करण्यात आले आहेत.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Pandharpur wari 2026 17 rescue boats deployed as safety measures intensify on chandrabhaga river

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • aashadhi ekadashi
  • Ashadhi Wari 2026
  • Chandrabhaga river

संबंधित बातम्या

आजीच्या स्वरांचा वारसा नातीने जपला! प्रियांका बर्वे घेऊन आली विदुषी मालती पांडे बर्वे यांची अप्रकाशित रचना ‘विठ्ठलाचे भेटी’
1

आजीच्या स्वरांचा वारसा नातीने जपला! प्रियांका बर्वे घेऊन आली विदुषी मालती पांडे बर्वे यांची अप्रकाशित रचना ‘विठ्ठलाचे भेटी’

‘सन मराठी’चा अनोखा पुढाकार, ‘इच्छा कलश’मधून विठुरायाच्या चरणी पोहोचणार भक्तांच्या मनोकामना
2

‘सन मराठी’चा अनोखा पुढाकार, ‘इच्छा कलश’मधून विठुरायाच्या चरणी पोहोचणार भक्तांच्या मनोकामना

Marathi Serial: ‘सावळ्याची जणू सावली’ टीम पंढरपुरात; ‘स्वर पंढरी’च्या माध्यमातून साजरा केला यशाचा खास सोहळा
3

Marathi Serial: ‘सावळ्याची जणू सावली’ टीम पंढरपुरात; ‘स्वर पंढरी’च्या माध्यमातून साजरा केला यशाचा खास सोहळा

‘कानडा राजा पंढरीचा’तून भक्तीचा जागर! आषाढी एकादशीनिमित्त मुंबईत विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन
4

‘कानडा राजा पंढरीचा’तून भक्तीचा जागर! आषाढी एकादशीनिमित्त मुंबईत विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.