फोटो सौजन्य सोशल मिडिया
Parbhani Suicide News : परभणी तालुक्यात झरी येथे एका शेतकऱ्याच्या मुलाने आत्महत्या केली आहे; सहलीसाठी नवीन कपडे न मिळाल्यामुळे ही आत्महत्या करण्यात आली आहे. सोयाबीनचे पैसे आल्यानंतर शेतकरी बापाचे मुलाला आश्वासन दिले होते. मुलाने टोकाचे पाऊल उचलले आणि आत्महत्या केली आहे. युवराज मुंजाजी मुधवर असे मृत मुलाचे नाव आहे.
सोयाबीणचे पैसे मिळाल्यावर नवीन कपडे घेण्याचे आश्वासन युवराज च्या वडिलांनी दिले होते. पण सोयाबीणचे पैसे मिळाले नसल्याने शेतकऱ्याच्या (मुंजाजी) मुलाने टोकाचे पाऊल उचले आणि आत्महत्या केली. ग्रामिण पोलिस ठाण्यात युवराज मुंजाजी मुधवर याला मृत घोषित केले; आणि आकस्मत मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली.
युवराजला सहलीसाठी नवीन कपडे हवे होते. मात्र, घरात आर्थिक चणचण असल्याने शेतकरी वडिलांनी सोयाबीनची विक्री झाल्या नंतर पैसे मिळतील त्यानंतर कपडे घेऊ असे आश्वासन दिले होते. युवराजच्या वडिलांना सोयाबीन विकून सुद्धा वेळेवर पैसे मिळाले नाही. या नैराश्यातून युवराजने मोठे टोकाचे पाऊल घेतेले; आणि आपला जिव गमावला.
ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. पण युवराजला मृत घोषित करून आकस्मिक मृत्यूची झाल्याची नोंद केली गेली आहे. ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून, ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांमधील आर्थिक विवंचना आणि शेतीमालाला वेळेवर भाव न मिळण्याचे गंभीर वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.
राज्यात सध्या दुष्काळ परिस्थिती निर्णाण झाली आहे. या अपूऱ्या पावसामुळे आणि पावसाने दिलेल्या मोठ्या ओढी मुळे राज्यात बहुतेक ठिकाणी पाण्याचा आणि शेतीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांना या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.
राज्यात 265 तालुक्यात दुष्काळ जाहिर केला असून 358 तालुक्यांपैकी 265 तालुक्यांमध्ये राज्यसरकारने दुष्काळ जाहिर केला आहे. सध्या महाराष्ट्रात 74 ट्क्के भाग हा दुष्काळाग्रस्त आहे. या मध्ये मराठवाडा, विर्दभ, उत्तर महाराष्ट्र आणि पुणे विभागातील जिल्ह्यांना या दुष्काळाचा फटका बसला आहे.
मराठवाड्यात 8 जिल्ह्यांमध्ये सरासरी 38 टक्के पावसाची नोंद आहे. तर विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये सरासरी 27 टक्के पावसाची नोंद आहे. यवतमाळ, जळगाव, अहिल्यानगर , नागपूर, अमरावती आणि नांदेड या जिल्ह्यांमधील परिस्थिती अधिक चिंताजनक आहे. धरणांमध्ये आणि भूगर्भातील पाणीपातळी वेगाने खालावत चालली आहे. काही भागामध्ये उपलब्ध पाणी साठा अत्यंत कमी आहे. येत्या काळात पिण्याच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न सुद्धा तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Yavatmal News: झाडाखाली बसून शिक्षणाचे धडे! गडचिरोलीतील नेमडा येथील प्रकार; जीर्ण इमारतीचा फटका






