Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी शैक्षणिक संस्था वापराबाबत दिले ‘हे’ आदेश

महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शैक्षणिक वापरासाठी वापरण्यात येत असलेल्या इमारती, वर्गखोल्या आणि सभागृह शैक्षणिक वापराव्यतिरिक्त तसेच निवडणूक कामकाज वगळून इतर कोणत्याही कामकाजासाठी वापरण्यात येऊ नये.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 23, 2022 | 05:47 PM
महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी शैक्षणिक संस्था वापराबाबत दिले ‘हे’ आदेश
Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शैक्षणिक वापरासाठी वापरण्यात येत असलेल्या इमारती, वर्गखोल्या आणि सभागृह शैक्षणिक वापराव्यतिरिक्त तसेच निवडणूक कामकाज वगळून इतर कोणत्याही कामकाजासाठी वापरण्यात येऊ नये. तसेच विनामूल्य व भाडे तत्वावर देण्यात येऊ नयेत, असे आदेश आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील (Rajesh Patil) यांनी दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत प्राथमिक शिक्षण विभाग व माध्यमिक शिक्षण विभाग कार्यरत आहे. महानगरपालिकेमार्फत इयत्ता १ ली ते १० वी पर्यंत शहरातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येते. शैक्षणिक वापरासाठी असलेल्या इमारतीमध्ये अनेक ठिकाणी आधारकार्ड केंद्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र तसेच काही इमारती खाजगी वापराकरीता देण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्त पाटील यांनी त्याबाबतचे स्वतंत्र आदेश निर्गमित केले आहे.

महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत १०५ शाळा आणि माध्यमिक शिक्षण विभागाअंतर्गत १८ शाळा तसेच आकांक्षा फाऊंडेशन व महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने ५ शाळा कार्यरत आहेत. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या शाळांचा आढावा घेतला असता, बहुतांशी शाळामध्ये विद्यार्थ्यांसाठी वर्ग खोल्या कमी पडत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी दोन वर्ग एका वर्गात बसवावे लागत आहे. शाळेच्या इमारती इतर वापरासाठी महापालिकेच्या विविध विभागाकडून देण्यात आल्याने त्यांचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर व गुणवत्तेवर होत असल्याचे दिसून येत आहे.

काही ठिकाणी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा अपुरी असल्याने, विद्यार्थ्यांची मोठया प्रमाणावर गळती होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. ही बाब महानगरपालिकेच्या शैक्षणिकदृष्टीने गंभीर स्वरूपाची आहे. त्यामुळे महापालिकेच्या शाळांच्या इमारती, वर्गखोल्या आणि सभागृहे शैक्षणिक कामाव्यतिरिक्त इतर कोणत्याही कामासाठी यापुढे वापरण्यास देण्यात येणार नाहीत.

Web Title: Pcmc commissioner rajesh patil gives instruction about education institute use nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2022 | 05:47 PM

Topics:  

  • Pimpri
  • Rajesh Patil

संबंधित बातम्या

Pimpari- Chinchwad : जिममध्ये व्यायाम करण्यासाठी गेला अन्…; पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना
1

Pimpari- Chinchwad : जिममध्ये व्यायाम करण्यासाठी गेला अन्…; पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना

PCMC: वादग्रस्त विकास आराखड्यावर ४० हजारांवर हरकती; नगरसेवकांच्या चर्चेविना आराखडा मंजुरीकडे?
2

PCMC: वादग्रस्त विकास आराखड्यावर ४० हजारांवर हरकती; नगरसेवकांच्या चर्चेविना आराखडा मंजुरीकडे?

PCMC News: पवना-मुळशीमधून पाण्याचा विसर्ग वाढवला; नागरिकांना सतर्कतेचा इशारा, सध्याची स्थिती काय?
3

PCMC News: पवना-मुळशीमधून पाण्याचा विसर्ग वाढवला; नागरिकांना सतर्कतेचा इशारा, सध्याची स्थिती काय?

मस्करीने केला गेम! गालावर मारल्याचा राग आल्याने पार्लरमध्ये गेला, कात्री घेतली अन्…; पिंपरीतील धक्कादायक घटना
4

मस्करीने केला गेम! गालावर मारल्याचा राग आल्याने पार्लरमध्ये गेला, कात्री घेतली अन्…; पिंपरीतील धक्कादायक घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.