Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आमदार शंकर जगताप ‘ॲक्शन मोडवर, भुजबळ चौक ते भूमकर चौकातील कामं करणार ‘फास्ट ट्रॅक’वर

Pune News : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी पुन्हा एकदा भूमकर चौक ते भुजबळ चौक परिसरात ऑन ग्राऊंड पाहणी करून कामांना वेग देण्याचे आदेश दिले.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 30, 2025 | 06:01 PM
PCMC MLA Shankar Jagtap on action mode work from Bhujbal Chowk to Bhumkar Chowk Pune News

PCMC MLA Shankar Jagtap on action mode work from Bhujbal Chowk to Bhumkar Chowk Pune News

Follow Us
Close
Follow Us:

Pune News : पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी पुन्हा एकदा भूमकर चौक ते भुजबळ चौक परिसरात ऑन ग्राऊंड पाहणी करून कामांना वेग देण्याचे आदेश दिले. त्यांच्या सततच्या पाठपुरावामुळे  भागातील नागरिकांना वाहतूक कोंडीतून थोड्याफार प्रमाणावर दिलासा मिळाला आहे. रस्त्याची कामे अतिक्रमणे रस्त्यावरील खड्डे बुजवणे सर्विस लाईन शिफ्ट करणे इत्यादी कामांमुळे वाहतूक सुरळीत होण्यास हातभार लागला आहे. सदर परिसरातील उर्वरित ५०%उर्वरित कामांनाही फास्ट ट्रॅकवर घेण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच नागरिकांना वाहतूक कोंडीच्या त्रासातून पूर्ण दिलासा मिळणार आहे.

गेल्या वर्षभरापासून वाकड-भूमकर चौक परिसरात वाढत्या वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला होता. या संदर्भात आमदार शंकर जगताप यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA), पिंपरी-चिंचवड महापालिका (PCMC), महावितरण, वाहतूक पोलीस, आरटीओ ,यांसह विविध शासकीय यंत्रणांशी सतत समन्वय साधून उपाययोजना राबवल्या. या पाठपुराव्याला आता ठोस परिणाम दिसू लागले आहेत. वीज कंपनीचे डीपी व ट्रान्सफॉर्मर शिफ्ट करणे, रस्त्यांची आखणी, खड्डे बुजविणे, अतिक्रमण हटविणे आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ताब्यातील सर्व्हिस रोडवर प्रत्यक्ष काम सुरू करणे अशा अनेक महत्त्वाच्या टप्प्यांची अंमलबजावणी झाली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

आजच्या पाहणीत आमदार जगताप यांनी रस्त्यावरील झाडांची छाटणी व पुनर्रोपण, शोरूमसमोरील जागा ताब्यात घेणे, अतिक्रमण हटवणे, शिवनेरी एसटी बसस्टॉप शिफ्ट करणे, पीएमपीएमएलचे थांबे  मागील बाजूस योग्य ठिकाणी हलवणे, नवीन सर्विस रस्त्याच्या कामात मध्ये टीप टॉप इंटरनॅशनल हॉटेल जवळील कंटेनर हटवणे, एमएसईबीच्या सर्विस लाईन शिफ्ट करणे, ड्रेनेज लाईन  स्थलांतरित करून जोडणे , वाहन चालकांकरता नवीन कॅरेज वे तयार करणे,यासारख्या तातडीच्या सूचनादेखील दिल्या.

याशिवाय त्यांनी भुजबळ चौकात हिंजवडीकडे वळताना फ्री लेफ्ट देणे, हॉटेल सोनम जवळील अतिक्रमण काढणे, ४५ मीटर रस्त्याचा ताबा घेणे, चौकातील आयलंड कमी करणे, पीएमपीएमएल बस स्टॅन्ड मागे घेणे, महावितरणचा डीपी शिफ्ट करून केबल डक्टमध्ये टाकणे, रांजाई हॉटेलजवळील होर्डिंग काढणे, संयुक्त पाहणी करून डांबरीकरण करणे अशा महत्त्वाच्या सूचना केल्या. तसेच महामार्ग प्राधिकरणाने वाहतूक विभागाला काँक्रीट बॅरिकेड्स द्यावेत, खड्ड्यांमध्ये ब्लॉक बसवावेत, दोन बारा मीटर कॅरेज वे शनिवारपर्यंत क्लिअर करावेत, नगररचना विभागाने टप्प्याटप्प्याने जागा ताब्यात घ्यावी आणि संयुक्त अतिक्रमण कारवाई करावी, असे निर्देश दिले.

भुजबळ चौकातील ट्रान्सफॉर्मर मागे घेतल्यानंतर तातडीने रस्ता तयार करण्याचे आदेशही त्यांनी दिले. टू-व्हीलर वाहनचालक चुकीच्या बाजूने रस्ता ओलांडू नयेत यासाठी प्रतिबंधक उपाय करण्यास सांगितले. शिवनेरी बस रस्त्यावर उभी न करता आत थांबवणे, बस थांबा मागे शिफ्ट करणे, दुसऱ्या बाजूस हलवणे, पीएमपीएमएल बस स्टॅन्डवरच बस थांबवणे, महामार्ग प्राधिकरणाकडून पुशबॅकसाठी पत्र घेणे, असे सूचना देण्यात आल्या.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

टीप टॉप इंटरनॅशनल हॉटेलकडील लेफ्ट फ्रीसाठी झाडे काढून पुनर्रोपण करणे, कंटेनर हटवणे, वृक्ष प्राधिकरणाची परवानगी घेऊन आठ-दहा दिवसांत योग्य ती कारवाई करावी, माने वस्ती एमजी शोरूमसमोरील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या गाड्या क्रेन लावून उचलणे, मारुती सुझुकी शोरूमजवळील बॉटलनेक दूर करणे, झाडे-झुडपे हटवणे, महानगरपालिकेच्या डक्ट मधील मधील वीज कंपनीच्या केबल सोडून इतर केबल काढून टाकणे,  वाहतूक विभागाच्या समन्वयाने अतिक्रमण दूर करणे वआठवडे बाजारास परवानगी न देणे, अशा अनेक सूचना आमदार शंकर जगताप यांनी दिल्या.आमदार शंकर जगताप यांनी स्पष्ट केले की, “सध्या ५०% दिलासा नागरिकांना मिळत आहे. येत्या पंधरा-वीस दिवसांत उर्वरित कामे पूर्ण होऊन शंभर टक्के वाहतूक कोंडीतून मुक्तता मिळेल.”

 

Web Title: Pcmc mla shankar jagtap on action mode work from bhujbal chowk to bhumkar chowk pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2025 | 06:01 PM

Topics:  

  • BJP city president Shankar Jagtap
  • PCMC News
  • PMRDA

संबंधित बातम्या

PMRDA: राज्य सरकराचा मोठा निर्णय; PMRDA चा वादग्रस्त प्रारुप विकास आराखडा रद्द
1

PMRDA: राज्य सरकराचा मोठा निर्णय; PMRDA चा वादग्रस्त प्रारुप विकास आराखडा रद्द

Crime News: AI चा असाही गैरवापर! तरूणीला थेट फोटो अश्लील पद्धतीने एडिट करण्याची धमकी दिली अन्…
2

Crime News: AI चा असाही गैरवापर! तरूणीला थेट फोटो अश्लील पद्धतीने एडिट करण्याची धमकी दिली अन्…

Indrayani : वारकऱ्यांच्या पवित्र इंद्रायणीला मिळणार नवे रुप; नदी सुधार प्रकल्पाला मिळाली मंजूरी
3

Indrayani : वारकऱ्यांच्या पवित्र इंद्रायणीला मिळणार नवे रुप; नदी सुधार प्रकल्पाला मिळाली मंजूरी

आसमंती भिनला, दाही दिशा घुमला…’शंभुराजे शंभुराजे’ जयघोष! जगातील सर्वांत उंच शिल्प ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’
4

आसमंती भिनला, दाही दिशा घुमला…’शंभुराजे शंभुराजे’ जयघोष! जगातील सर्वांत उंच शिल्प ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.