Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PCMC News: पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठ्याचा ‘मास्टर प्लॅन’; रवि लांडगेंकडून जलशुद्धीकरण केंद्रांची पाहणी

सध्या हे केंद्र ५५० एमएलडी क्षमतेने कार्यरत असून पवना नदीतील पाण्यावर प्रक्रिया करून तसेच पंपिंग व्यवस्थेच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सुमारे ७५ टक्के क्षेत्राला पाणीपुरवठा केला जात आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 09, 2026 | 10:01 AM
PCMC News: पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठ्याचा ‘मास्टर प्लॅन’;  रवि लांडगेंकडून जलशुद्धीकरण केंद्रांची पाहणी
Follow Us
Close
Follow Us:
  • रवि लांडगे यांची आज निगडी व चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रांना भेट
  • निगडी सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी
  • पवना नदीतून पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सुमारे ७५ टक्के क्षेत्राला पाणीपुरवठा
PCMC Water Supply: पिंपरी चिंचवड शहराच्या झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा यंत्रणा अधिक सक्षम व सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने महापौर रवि लांडगे यांनी आज निगडी व चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान शहराला लागणारी एकूण पाण्याची गरज, महापालिकेच्या वतीने सध्या करण्यात येणारा पाणीपुरवठा, तसेच भविष्यातील वाढती मागणी लक्षात घेता राबविण्यात येत असलेल्या व प्रस्तावित उपाययोजनांबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली.

Election Result : राज्यातील 12 जिल्हा परिषदांसह 125 पंचायत समितींचे निकाल आज; मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

चिखली परिसरासाठी सध्या इंद्रायणी नदीवरील निगोजे बंधाऱ्यातून दररोज ९० एमएलडी पाणी घेण्यात येते. हे पाणी चिखली येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात शुद्ध करून परिसरातील नागरिकांना वितरित करण्यात येते. याशिवाय भविष्यातील वाढती पाण्याची गरज लक्षात घेता भामा आसखेड धरणातून येणाऱ्या पाण्यासाठी २०० एमएलडी क्षमतेचा स्वतंत्र जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. याबाबत महापौर रवि लांडगे यांनी पाहणी करून सविस्तर माहिती घेतली. तसेच निगोजे येथील सध्याची पंपिंग व्यवस्था ही आंद्रा धरणातून थेट जलवाहिनी कार्यान्वित होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात वापरण्यात येत आहे, याबाबतही त्यांनी सविस्तर आढावा घेतला.

यानंतर निगडी येथील सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्राची महापौर रवि लांडगे यांनी पाहणी केली. यावेळी संगणकीय सादरीकरणाद्वारे त्यांनी केंद्राबाबत सविस्तर आढावा घेतला. हे जलशुद्धीकरण केंद्र सुरुवातीला ११४ एमएलडी क्षमतेने कार्यान्वित करण्यात आले होते. मात्र शहराचा विस्तार, नवीन निवासी व औद्योगिक क्षेत्रांची वाढ आणि पाण्याच्या मागणीत झालेली लक्षणीय वाढ लक्षात घेता या केंद्राचा टप्प्याटप्प्याने विस्तार करण्यात आला आहे.

अतिशहाणपणा त्याचा बैल रिकामा! फोनची बॅटरी तोंडात टाकताच झाला भीषण स्फोट, तरुण जखमी; घटनेचा Video

सध्या हे केंद्र ५५० एमएलडी क्षमतेने कार्यरत असून पवना नदीतील पाण्यावर प्रक्रिया करून तसेच पंपिंग व्यवस्थेच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सुमारे ७५ टक्के क्षेत्राला पाणीपुरवठा केला जात आहे. पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया, गुणवत्ता तपासणीचे निकष आणि वितरण व्यवस्थेची माहितीही यावेळी महापौर यांना देण्यात आली.

या पाहणीदरम्यान भामा आसखेड जलवाहिनी प्रकल्प, पवना बंद जलवाहिनी प्रकल्प, पाणी उचल, शुद्धीकरण व वितरणाची साखळी, पाण्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी प्रक्रिया तसेच शहरातील विविध भागांतील पाण्याच्या टाक्यांची क्षमता व स्थिती याबाबत मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे व सहशहर अभियंता अजय सुर्यवंशी यांनी माहिती दिली.

यावेळी महापौर रवि लांडगे यांनी शहरातील नागरिकांना भविष्यातही नियमित, पुरेशा दाबाने आणि दर्जेदार पाणीपुरवठा होण्यासाठी पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले आणि त्यासाठी अधिकाधिक दर्जेदार उपाययोजना राबविण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे सांगितले.

Web Title: Pcmc news pimpri chinchwads water supply master plan ravi landge inspects water treatment plants

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 10:01 AM

Topics:  

  • PCMC News
  • Pune Water News
  • Ravi Landge

संबंधित बातम्या

PCMC News: पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा! महापौरांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; पावसाळी समस्यांवर त्रिसूत्री नियोजनाचे आदेश
1

PCMC News: पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा! महापौरांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; पावसाळी समस्यांवर त्रिसूत्री नियोजनाचे आदेश

चिखलमय रस्ते आणि वाहतूक कोंडी; पिंपरी-चिंचवडकरांना अवकाळी पावसाचा मोठा तडाखा
2

चिखलमय रस्ते आणि वाहतूक कोंडी; पिंपरी-चिंचवडकरांना अवकाळी पावसाचा मोठा तडाखा

पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा ‘बूस्टर डोस’; स्थायी समितीकडून कोट्यवधींच्या विकासकामांना ‘ग्रीन सिग्नल’
3

पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा ‘बूस्टर डोस’; स्थायी समितीकडून कोट्यवधींच्या विकासकामांना ‘ग्रीन सिग्नल’

Pimpri News : अभय योजनेला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद; 29 दिवसांत 157 कोटींची विक्रमी वसुली
4

Pimpri News : अभय योजनेला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद; 29 दिवसांत 157 कोटींची विक्रमी वसुली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.