महापालिका स्वतः सर्व ठिकाणी टँकर पुरवठा करत नाही. त्यामुळे खासगी टँकरवाले आणि ठेकेदार जास्त दराने पाणी पुरवून आर्थिक फायदा घेत आहेत. याचा फटका नागरिकांना आर्थिकदृष्ट्या बसत आहे.
संडास आणि मुताऱ्यांमध्ये पूर्वीचा नळजोड आहे. अनेक स्वच्छता गृहांतील नळ तोडण्यात आले आहेत किंवा चोरीस गेले आहेत. त्यामुळे २४ तास पाणी वाहून जाऊन नासाडी होते.
उन्हाळ्यापूर्वी पाण्यासाठीची कोणतीच तजवीज नसल्याने पाणीटंचाईचे सावट भीषण होण्याची शक्यता आहे. जनावरांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विभागातील गावांत यंदाही भीषण पाणीटंचाई आहे.
पुणे महापालिका व पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी जिल्ह्यातील काही धरणांमधील पाणी आरक्षित आहे. असे असले तरी, त्यांच्याकडून हद्दीलगत पाणीपुरवठा करण्यास उदासीनता दिसून येते.
वडगावशेरीसह खराडी भागात अनेक भागात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. कमी दाबाने तसेच काही ठिकाणी नळाला पाणीच येत नाही. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
वडगावशेरीसह खराडी भागात अनेक भागात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. कमी दाबाने तसेच काही ठिकाणी नळाला पाणीच येत नाही. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे विमानतळावर महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांची बैठक घेतली आणि त्यांना सूचना देखील दिल्या.
पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर विधानसभाध्यक्षांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पाण्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.
टँकरद्वारे वर्षाला 40 कोटींहून अधिक खर्च होतोशहरातील विविध भागांतील पाणीपुरवठा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून केला जातो. अनेक भागात पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा केला जातो.
पाण्याची गळती शाेधण्यासाठी महापािलकेच्या पाणी पुरवठा विभागाला जलवाहीन्यांत १.५ बार या प्रमाणात प्रेशरने पाणी साेडावे लागेल, हे पाणी पुण्याच्या दैंनदिन गरजेच्या तिप्पट पाणी महापािलकेला उचलावे लागेल.
महापालिकेने खडकवासला येथील जलसंपदाच्या जागेवर जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. यासाठीचे पूर्वगणनपत्रक (एस्टिमेट) तयार करण्याचे काम सुरू आहे.
एकीकडे पाणी टंचाई निर्माण होत असताना दुसरीकेडे उन्हाळ्याचे चटके बसण्यास सुरुवात झाल्यानंतर पाण्याची मागणी वाढली आहे. ज्या भागात पाणी पुरवठा होतो, तेथे जास्त पाणी वापरले जात आहे.
जानेवारी महीन्यात जीबीएस आजार हा अशुद्ध पाण्यामुळे हाेत असल्याचे आढळून आले हाेते. त्यानंतर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून महापालिकेकडून या भागातील आरओ प्रकल्पांच्या पाण्याची तपासणी केली होती.
शहराच्या उपनगरांत आर ओ प्लांट व्यावसाियकांकडून पाणी पुरवठा केला जात आहे. या आर ओ प्लांटमधून हाेणारा पाणी पुरवठाही शुद्ध नसल्याने त्यांच्याकरीता नियमावली केली हाेती.
कोथरुड विधानसभा मतदारसंघातील समान पाणी पुरवठा योजनेची कामे जलदगतीने पूर्ण करावीत, असे निर्देश मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. तसेच, पाणी गळती रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.