Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साखर आयुक्तालयाचा सहकारी साखर कारखान्यांना दणका; केवळ ऊस पुरवठ्यावर सभासदत्व देता येणार नाही

सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्राबाहेर राहून ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ कारखान्याला ऊस पुरवठा करतात म्हणून सभासदत्व देता येणार नाही, असे साखर आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 19, 2026 | 06:22 PM
साखर आयुक्तालयाचा सहकारी साखर कारखान्यांना दणका; केवळ ऊस पुरवठ्यावर सभासदत्व देता येणार नाही

साखर आयुक्तालयाचा सहकारी साखर कारखान्यांना दणका; केवळ ऊस पुरवठ्यावर सभासदत्व देता येणार नाही

Follow Us
Follow Us:

पुणे : सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्राबाहेर राहून ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ कारखान्याला ऊस पुरवठा करतात म्हणून सभासदत्व देता येणार नाही, असे साखर आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम २२ नुसार सहकारी साखर कारखान्याचा सभासद हा संबंधित कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी असणे बंधनकारक असल्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी जारी केलेल्या परिपत्रकातून स्पष्ट झाले आहे.

 

कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील पात्र व्यक्तीने सभासदत्वासाठी अर्ज केल्यानंतर विहित मुदतीत त्यावर निर्णय घेणे कारखान्याला बंधनकारक राहणार आहे. अर्जदार पात्र नसल्यास अर्ज कारणासहित नाकारावा, असे निर्देशही देण्यात आले आहेत. सभासदत्वाचा अर्ज नाकारल्यास संबंधित व्यक्तीला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील कलम २३ नुसार प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्याकडे अपील करता येणार आहे. दरम्यान, सभासदत्वाचे अर्ज आणि शेअर अनामत रक्कम निर्णयाविना प्रलंबित ठेवणाऱ्या कारखान्यांनाही साखर आयुक्तालयाने चपराक दिली आहे. प्रलंबित अर्जांचा तातडीने निपटारा करावा, तसेच नामंजूर अर्जांची शेअर अनामत रक्कम संबंधितांना परत करावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

कारखान्याला ऊस पुरवठा करण्यास कोणतीही मनाई नाही

या निर्णयाचा परिणाम जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांवर होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांना सभासद करून घेण्यासाठी काही कारखान्यांकडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना या परिपत्रकामुळे मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांना सभासद करून घेण्याचा मार्ग जवळपास बंद झाला आहे. मात्र, कार्यक्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांना कारखान्याला ऊस पुरवठा करण्यास कोणतीही मनाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे सभासदत्वाचा अधिकार आणि ऊस पुरवठा या दोन्ही बाबी स्वतंत्र असल्याचे आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.

हे सुद्धा वाचा : अचानक आलेल्या डुलकीने केला गेम! पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर विचित्र अपघात, 2 जखमी तर…

प्रस्तावाला मर्यादा

साखर आयुक्तांच्या परिपत्रकामुळे कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांना सभासद करून घेण्याच्या प्रस्तावाला मर्यादा आल्या आहेत. मात्र, अशा शेतकऱ्यांना कारखान्याला ऊस पुरवठा करण्यास कोणताही अडथळा नसल्याने ऊस खरेदी-विक्रीची प्रक्रिया सुरू राहू शकणार आहे.

हे सुद्धा वाचा : सोनोरीत रस्त्याला २० लाख खर्च तरीही खड्डेच; बांधकाम अभियंत्यावर कारवाईची ग्रामस्थांची मागणी

Web Title: The sugar commissionerate has taken a major decision regarding membership

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 06:22 PM

Topics:  

  • Farmers
  • maharashtra
  • Sugar Factory

संबंधित बातम्या

गणेशम फेज २ सोसायटीत आग, दोन चिमुरड्यांची सुखरूप सुटका; मोठा अनर्थ टळला
1

गणेशम फेज २ सोसायटीत आग, दोन चिमुरड्यांची सुखरूप सुटका; मोठा अनर्थ टळला

Water Storage Crisis: पाणीटंचाईचे संकट गडद! धरणे-तलाव कोरडे; २२६ पैकी केवळ ५ प्रकल्पांत ५० टक्क्यांहून अधिक साठा
2

Water Storage Crisis: पाणीटंचाईचे संकट गडद! धरणे-तलाव कोरडे; २२६ पैकी केवळ ५ प्रकल्पांत ५० टक्क्यांहून अधिक साठा

विसर्जनप्रसंगी विद्यार्थ्यांवर काळाने घातला घाला; दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
3

विसर्जनप्रसंगी विद्यार्थ्यांवर काळाने घातला घाला; दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

Nashik Farmers: बळीराजाची चिंता वाढली! शेतीपिकांवर संकट, ५४ कृषी मंडळांत तीन आठवड्यांहून अधिक पाऊस गायब
4

Nashik Farmers: बळीराजाची चिंता वाढली! शेतीपिकांवर संकट, ५४ कृषी मंडळांत तीन आठवड्यांहून अधिक पाऊस गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.