Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तीन एकर डाळिंब बागेतून लाखोंचे उत्पन्न; माळेगाव येथील जाधव बंधूंनी शेतीतून साधली आर्थिक प्रगती

बारामती तालुक्यातील माळेगाव येथील अनिल जाधव आणि अशोक जाधव या बंधूंनी तीन ते चार एकर क्षेत्रात डाळिंबाची बाग फुलवून शेतीतून आर्थिक प्रगती साधली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 18, 2026 | 06:25 PM
तीन एकर डाळिंब बागेतून लाखोंचे उत्पन्न; माळेगाव येथील जाधव बंधूंनी शेतीतून साधली आर्थिक प्रगती

तीन एकर डाळिंब बागेतून लाखोंचे उत्पन्न; माळेगाव येथील जाधव बंधूंनी शेतीतून साधली आर्थिक प्रगती

Follow Us
Follow Us:

माळेगाव :  शेती करताना शेतकऱ्यांना अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करावा लागतो. नैसर्गिक आपत्ती, रोगराई, पाण्याचे नियोजन आणि बाजारभावातील चढ-उतार अशा विविध आव्हानांवर मात करून काही शेतकरी नियोजनबद्ध शेतीच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधत आहेत. बारामती तालुक्यातील माळेगाव येथील अनिल जाधव आणि अशोक जाधव या बंधूंनी तीन ते चार एकर क्षेत्रात डाळिंबाची बाग फुलवून शेतीतून आर्थिक प्रगती साधली आहे.

 

जाधव कुटुंबीयांनी डाळिंबाच्या बागेचे काटेकोर नियोजन केले आहे. दोन एकर क्षेत्रात सुमारे १४०० डाळिंबाच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. या बागेतून यंदा सुमारे ३० + टन डाळिंबाचे उत्पादन मिळाले. डाळिंबाला सरासरी प्रतिकिलो ११५ रुपये दर मिळाल्याने या उत्पादनातून लाखोंची लाख रुपयांची उलाढाल झाली. उत्पादन खर्च वजा केल्यानंतर मिळणारा निव्वळ नफा वेगळा असून, बागेने कुटुंबाच्या उत्पन्नात चांगली भर घातली आहे.

डाळिंबाच्या बागेसाठी जाधव बंधूंनी खत-पाणी व्यवस्थापनाला विशेष महत्त्व दिले. रासायनिक खतांसोबतच जैविक खते आणि शेणखताचा वापर करण्यात आला. बागेची वेळेवर छाटणी, पाण्याचे सूक्ष्म नियोजन आणि ठिबक सिंचनाच्या माध्यमातून झाडांना पाणी देण्यात आले. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करून बागेची वाढ आणि उत्पादन टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

बागेची विशेष काळजी घेतली

डाळिंब बागांसाठी तेल्या रोगाचा प्रादुर्भाव हे मोठे आव्हान मानले जाते. या पार्श्वभूमीवर जाधव कुटुंबीयांनी बागेची विशेष काळजी घेतली. दोन एकर क्षेत्रातील बागेवर कापडाचे आच्छादन केल्यामुळे कडक उन्हापासून फळबागेचे संरक्षण होण्यास मदत झाली. तसेच वातावरणातील प्रतिकूल परिणाम आणि रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठीही या उपायाचा उपयोग झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा : जुन्या गाडीच्या वादातून तरुणावर हल्ला, चाकूने सपासप वार; नांदेडमधील घटनेनं खळबळ

मेहनतीची परंपरा पुढील पिढीनेही कायम ठेवली

अनिल आणि अशोक जाधव यांनी आयुष्यभर जपलेली शेतीची आवड आणि मेहनतीची परंपरा पुढील पिढीनेही कायम ठेवली आहे. शुभम अशोक जाधव, वैभव अनिल जाधव आणि सूरज अनिल जाधव हे तरुण आपापले व्यवसाय सांभाळत डाळिंब शेतीतही लक्ष देत आहेत. एकत्र कुटुंबपद्धती जपत आधुनिक शेतीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन परिसरातील शेतकऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. “आजच्या काळात एकत्र कुटुंबपद्धत टिकवून ठेवत व्यवसाय सांभाळून तरुणांनी शेतीकडे लक्ष दिले, तर शेती केवळ पारंपरिक व्यवसाय न राहता नियोजनबद्ध आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम उद्योग बनू शकतो,” असा संदेश जाधव परिवाराच्या शेती प्रयोगातून मिळत आहे.

Web Title: The jadhav brothers from malegaon have earned a good financial return from their pomegranate crop

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 06:25 PM

Topics:  

  • baramati
  • Farmers
  • maharashtra

संबंधित बातम्या

शेंगा भरण्याच्या काळातच पावसाने फिरवली पाठ, सोयाबीनची वाढ खुंटली; उत्पादन घटण्याची शक्यता
1

शेंगा भरण्याच्या काळातच पावसाने फिरवली पाठ, सोयाबीनची वाढ खुंटली; उत्पादन घटण्याची शक्यता

‘आपले सरकार’ केंद्रातून स्वावलंबनाची नवी वाट; पालकमंत्री सरनाईकांच्या हस्ते तीन अनाथ बालकांना मंजुरी प्रमाणपत्र
2

‘आपले सरकार’ केंद्रातून स्वावलंबनाची नवी वाट; पालकमंत्री सरनाईकांच्या हस्ते तीन अनाथ बालकांना मंजुरी प्रमाणपत्र

बेशिस्त वाहनचालकांना चाकण पोलिसांचा दणका; दीड महिन्यात तब्बल 9777 वाहनांवर कारवाई
3

बेशिस्त वाहनचालकांना चाकण पोलिसांचा दणका; दीड महिन्यात तब्बल 9777 वाहनांवर कारवाई

जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला, कुकरीने डोक्यावर वार; दापोडीतील घटनेनं खळबळ
4

जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला, कुकरीने डोक्यावर वार; दापोडीतील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.