Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Farmers: बळीराजाची चिंता वाढली! शेतीपिकांवर संकट, ५४ कृषी मंडळांत तीन आठवड्यांहून अधिक पाऊस गायब

Nashik Farmers: नाशिक जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट अधिक गडद होत असून तब्बल ५४ कृषी मंडळांमध्ये २१ दिवसांपेक्षा अधिक काळ पावसाचा खंड पडला आहे. दीर्घकाळ पाऊस नसल्याने खरीप पिकांवर परिणाम होण्याची भीती वाढली असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 19, 2026 | 11:23 AM
बळीराजाची चिंता वाढली! शेतीपिकांवर संकट, ५४ कृषी मंडळांत तीन आठवड्यांहून अधिक पाऊस गायब

बळीराजाची चिंता वाढली! शेतीपिकांवर संकट, ५४ कृषी मंडळांत तीन आठवड्यांहून अधिक पाऊस गायब

Follow Us
Follow Us:
  • नाशिकवर दुष्काळाचे संकट गडद!
  • ५४ कृषी मंडळांत २१ दिवसांहून अधिक काळ पावसाचा खंड
  • नाशिकच्या ५४ कृषी मंडळांत दीर्घ खंड
भरत घोटेकर, सिन्नर : पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने नाशिक जिल्ह्यातील खरीप हंगाम संकटात सापडला आहे. १५ सप्टेंबरपर्यंतच्या मंडळनिहाय आकडेवारीनुसार जिल्ह्यातील ११ तालुक्यांमधील ५४ कृषी मंडळांत २१ दिवस किंवा त्यापेक्षा अधिक पावसाचा खंड पडला आहे. त्यापैकी १५ मंडळांत ४० दिवसांपेक्षा अधिक काळ पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप पिकांना मोठा ताण बसला असून, अनेक भागांत पिके जळण्याच्या स्थितीत आहेत. उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता शासनाच्या मदतीची आस लागली आहे. (Nashik Farmers)

पूर्ण खरीप हातातून जाण्याची शक्यता

पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे २१ दिवसांपेक्षा अधिक खंड असलेल्या मंडळांमध्ये पूर्ण खरीप हातातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुरुवातीच्या पावसावर उगवलेली पिके आता पाण्याअभावी करपण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाया जाण्याची भीती आहे. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळ स्तरावर दुष्काळी परिस्थितीबाबत चर्चा सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा शासनाकडून मिळणाऱ्या मदतीकडे लागल्या आहेत.

Ganesh Visarjan Traffic: गणेशोत्सवात वाहतुकीत मोठे बदल; देखावे-विसर्जन मार्गांवर वाहनांना ‘नो एन्ट्री’

पिकांचे पंचनामे, नुकसानभरपाई आणि दुष्काळी मदतीबाबत शासन काय निर्णय घेते, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दीर्घ खंडाची सर्वाधिक तीव्रता काही मंडळांत दिसून येत आहे. देवळा तालुक्यातील उमराणे येथे ४५ दिवस, कळवण तालुक्यातील मोकभणगी येथे ४०, मालेगाव तालुक्यातील कौळाणे, सौंदाणे, निमगाव येथे ४५ दिवस, दाभाडी येथे ४४ दिवस, तर नांदगाव तालुक्यातील जातेगाव, हिसवळ बु. आणि भर्डी येथे प्रत्येकी ४५ दिवसांचा पावसाचा खंड आहे.

पावसाच्या दडीचा परिणाम

येवला तालुक्यातील येवला व सावरगांव येथे ४२, पाटोदा व जळगाव येथे ४१ दिवस, तर सिन्नर तालुक्यातील सिन्नर मंडळात ४०, शहा मंडळात ४२ दिवसांचा खंड नोंदवला आहे. सिन्नर तालुक्यात सिन्नर, शहा, नांदूरशिंगोटे, सोनांबे, डुबेरे, वावी, वडांगळी आणि गोंदे या आठ मंडळांत २१ दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड पडला आहे. यामध्ये शहा ४२, सिन्नर ४०, सोनांबे ३७, वडांगळी २७, नांदूरशिंगोटे, डुबेरे व वावी प्रत्येकी २५ आणि गोंदे २३ दिवस असा खंड आहे. त्यामुळे तालुक्यातील खरीप पिकांवरही पावसाच्या दडीचा परिणाम जाणवत आहे.

शेती उत्पादनात ५० ते ७० टक्के घट शक्यतेचा अंदाज

सिन्नर तालुक्यातील १२ पैकी ८ कृषी मंडळांमध्ये २१ ते ४० दिवसांपर्यंत पावसाचा दीर्घ खंड पडला आहे. त्यामुळे येथील पिके जवळपास हातातून गेली आहेत. ज्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात पाणी आहे. तिथेही अपुऱ्या पावसामुळे ४० ते ५० टक्के पर्यंत उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे, सिन्नर तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नाठे यांनी माहिती दिली.

तालुकानिहाय पाहता मालेगाव, सिन्नर आणि येवला येथे प्रत्येकी ८ कृषी मंडळे २१ दिवसांपेक्षा अधिक खंडाच्या कक्षेत आहेत. नांदगावमध्ये ७, बागलाण व कळवणमध्ये प्रत्येकी ६, तर चांदवड, देवळा व नाशिकमध्ये प्रत्येकी ३ मंडळांचा समावेश आहे. दिंडोरी व निफाडमध्ये प्रत्येकी एका मंडळात दीर्घ खंड नोंदला आहे,  मालेगाव, सिन्नर, येवला आघाडीवर यांनी माहिती दिली.

Nashik Crime: गणरायाच्या स्थापनेसाठी कंपनीत गेले; अन् पुन्हा कधीच परतले नाही!, ३३ वर्षीय इंजिनिअर…

Web Title: Nashik drought crisis deepens rainfall gap over 21 days in 54 agriculture circles

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 11:23 AM

Topics:  

  • agriculture
  • Farmers
  • Nashik

संबंधित बातम्या

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
1

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

तीन एकर डाळिंब बागेतून लाखोंचे उत्पन्न; माळेगाव येथील जाधव बंधूंनी शेतीतून साधली आर्थिक प्रगती
2

तीन एकर डाळिंब बागेतून लाखोंचे उत्पन्न; माळेगाव येथील जाधव बंधूंनी शेतीतून साधली आर्थिक प्रगती

शेंगा भरण्याच्या काळातच पावसाने फिरवली पाठ, सोयाबीनची वाढ खुंटली; उत्पादन घटण्याची शक्यता
3

शेंगा भरण्याच्या काळातच पावसाने फिरवली पाठ, सोयाबीनची वाढ खुंटली; उत्पादन घटण्याची शक्यता

FDA Seizes Suspected Food Items : नाशिकमध्ये एफडीएचा धडक कारवाईचा बडगा; १० दिवसांत ५.४० कोटींचा भेसळयुक्त माल जप्त!
4

FDA Seizes Suspected Food Items : नाशिकमध्ये एफडीएचा धडक कारवाईचा बडगा; १० दिवसांत ५.४० कोटींचा भेसळयुक्त माल जप्त!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.