रायगड : राज्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथ होऊन महाविकास आघाडीचे सरकार सत्तेतून पायउतार झाले, तर महाविकास आघाडीमधील तत्कालीन नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शिंदे गट व भाजप असे संयुक्तिक सरकार सत्तास्थानी विराजमान झाले. आता शिवसेना पेण तालुकाप्रमुख तुषार मानकवळे सहकाऱ्यांसह शिंदे गटात सामील झाले आहेत. आमदार महेंद्र दळवी व युवा नेते राजा केणी यांनी सर्वांचे स्वागत केले.
[read_also content=”अजिंक्य रहाणे दुसऱ्यांदा होणार बाबा, राधिकाने शेअर केली गोड बातमी https://www.navarashtra.com/sports/ajinkya-rahane-and-radhika-dhopavkar-expecting-second-baby-in-october-nrsr-307234.html”]
शिवसेनेचे 40 आमदार व 12 खासदार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. रायगड जिल्ह्यात देखील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात सामील होत आहेत. शिंदे गट संघटनात्मकदृष्ट्या अधिक बलाढ्य व्हावा यासाठी आमदार महेंद्र दळवी, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे हे तिन्ही आमदार जोमाने सरसावले आहेत. यावेळी महेंद्र दळवी म्हणाले की रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते येत्या काही दिवसात शिंदे गटात सामील होतील, तुषार मानकवळे हा कट्टर समर्थक व हृदयातील कार्यकर्ता आहे, त्यांनी आज सहकाऱ्यांसह शिंदे गटात प्रवेश केला, येत्या काळात अधिक समाधानकारक चित्र पहावयास मिळेल असा विश्वास आमदार दळवी यांनी व्यक्त केला.
आमदार महेंद्र दळवींच्या नेतृत्वात शिवसेना पक्ष वाढीसाठी तन, मन, धनाने झोकून काम केले, मात्र आजमितीस पेण तालुक्यात मोठी गटबाजी उफाळून आली. त्यामुळे काम करणे कठीण झाले, शिवसेनेचा प्रशासन दरबारी वचक राहिला नाही, म्हणून पक्ष संघटना मजबुतीसाठी व विकासात्मक दृष्ट्या आमदार महेंद्र दळवी यांच्याशिवाय पर्याय नाही, त्यामुळे आम्ही शिंदे गटात सामील झालो आहोत. असे मानकवळे यांनी यावेळी सांगितले.
[read_also content=”महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम भागातील जनतेचा वाली कोण?; नागरिकांचा प्रश्न https://www.navarashtra.com/maharashtra/who-is-caretaker-of-mahabaleshwar-questions-of-people-nrka-307238.html”]