Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राहुल गांधींवर विश्वास असल्यानेच पदयात्रेला लोकांचा मोठा प्रतिसाद !: कन्हैया कुमार

शेतकऱ्यांच्या ऊसाला भाव मिळत नाही, शेतमालाला भाव मिळत नाही, उच्च शिक्षण घेऊनही नोकरी लागत नाही अशी तरुणांची अवस्था आहे मात्र अमित शाह यांच्या मुलाला मात्र नोकरी लागते तेही नियम बदलून याचा संताप तरुणांमध्ये आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: Nov 11, 2022 | 07:03 PM
राहुल गांधींवर विश्वास असल्यानेच पदयात्रेला लोकांचा मोठा प्रतिसाद !: कन्हैया कुमार
Follow Us
Close
Follow Us:

नांदेड : विविधतेत एकता (Unity in diversity) ही या देशाची ओळख असताना ही ओळख पुसण्याचे काम मागील काही वर्षांपासून केले जात आहे. द्वेषाचे बीज पेरून समाजा-समाजाला, जाती-धर्माला एकमेकांविरोधात लढवून भाजपा आपली राजकीय पोळी भाजत आहे. देशात महागाई, बेरोजगारीची समस्या मोठी असताना केंद्रातील भाजपा सरकार त्याकडे लक्ष देत नाही.

जनतेला त्यांनी वाऱ्यावर सोडून दिले आहे. अशा विपरीत परिस्थितीत भारत जोडो यात्रेच्या (Bharat Jodo Yatra) माध्यमातून देश जोडण्यास निघालेल्या राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याकडून लोकांच्या आशा, अपेक्षा व विश्वास असल्याने प्रचंड मोठ्या संख्येने लोक सहभागी होत आहेत, असे काँग्रेस नेते कन्हैयाकुमार (Congress leader Kanhaiya Kumar) यांनी सांगितले.

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर (Ardhapur in Nanded District) येथे पत्रकारांशी संवाद साधताना कन्हैयाकुमार यांनी भारत जोडो यात्रेचा उद्देश स्पष्ट केला व देशातील सद्य परिस्थितीवर भाष्य केले. ते पुढे म्हणाले की, पदयात्रेत सहभागी झालेले लोक त्यांना भेडसावणाऱ्या दैनंदिन जिवनातील समस्यांवर बोलत आहेत. शेतकऱ्यांच्या ऊसाला भाव मिळत नाही, शेतमालाला भाव मिळत नाही, उच्च शिक्षण घेऊनही नोकरी लागत नाही अशी तरुणांची अवस्था आहे मात्र अमित शाह यांच्या मुलाला मात्र नोकरी लागते तेही नियम बदलून याचा संताप तरुणांमध्ये आहे. आपली स्वप्नं भाजपा सरकार धुळीस मिळवत आहे हे त्यांचे दुःख आहे. महागाईने महिलांचे स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले आहे. जिवघेण्या महागाईत जगणे मुश्कील झाले आहे. जनतेच्या या समस्या असताना केंद्रातील भाजपा सरकार मात्र या मुळ मुद्द्यांना हात घालत नाही. जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी ते इतर मुद्द्यांना महत्व देत आहेत. सरकार जनतेचे ऐकत नाही पण राहुलजी गांधी मात्र जनतेच्या समस्या, वेदना, दुःख ऐकून घेत आहेत. आपले दुःख ऐकण्यासाठी आपल्याकडे कोणीतरी आले आहे ही भावनाच जनतेला आपलीशी वाटत आहे.

[read_also content=”रेरा घोटाळ्याप्रकरणी बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचे कंडोमपा महापालिका आयुक्तांचे आदेश https://www.navarashtra.com/maharashtra/kdmc-municipal-commissioners-order-to-take-action-against-illegal-constructions-in-the-case-of-rera-scam-nrvb-343735.html”]

भारत जोडो यात्रेचा उद्देश पवित्र व स्वच्छ असून देश तोडणाऱ्या शक्तींना देश जोडण्यातून उत्तर दिले जात आहे आणि याकामी जनतेचे मोठे समर्थन लाभत आहे. या पदयात्रेचा उद्देश केवळ निवडणुका जिंकणे नाही तर जनतेला विश्वास देण्याचा आहे, देशातील एकोपा कायम ठेवणे आहे. आपापसात भांडण्यापेक्षा महागाई, बेरोजगारीसह आपल्याला भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्याची लढाई लढली पाहिजे हे जनतेला आता समजले आहे, असेही कन्हैयाकुमार म्हणाले.

या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.

Web Title: Peoples response to bharat jodo padayatra is huge because they believe in rahul gandhi kanhaiya kumar nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2022 | 07:03 PM

Topics:  

  • Bharat Jodo Yatra
  • Kanhaiya Kumar

संबंधित बातम्या

Bihar CM : बिहार निवडणुकीत महाआघाडी जिंकली तर कोण होणार CM? कॉंग्रेसचे युवा नेते कन्हैया कुमार यांनी थेट नावच जाहीर केलं
1

Bihar CM : बिहार निवडणुकीत महाआघाडी जिंकली तर कोण होणार CM? कॉंग्रेसचे युवा नेते कन्हैया कुमार यांनी थेट नावच जाहीर केलं

Kanhaiya Kumar Arrest : काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांना अटक; ३० हून अधिक कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी घेतलं ताब्यात
2

Kanhaiya Kumar Arrest : काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांना अटक; ३० हून अधिक कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी घेतलं ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.