Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Moshi Garbage Depot Accident: मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगाराच्या पत्नीने घेतले टोकाचे पाऊल

सहायक पोलीस आयुक्त सुधाकर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली बुधवारी सायंकाळी घरी एकट्याच होत्या. सायंकाळी सातच्या सुमारास त्यांनी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला

  • By anuradha sagar
Updated On: Aug 14, 2026 | 01:03 PM
Moshi Garbage Depot Accident: मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगाराच्या पत्नीने घेतले टोकाचे पाऊल
Follow Us
Follow Us:
  • मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कर्मचाऱ्याच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या
  • ८ जुलै रोजी मोशी कचरा डेपोतील ढिगारा कोसळून ९ जणांचा झाला होता मृत्यू
  • पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू; वायसीएम (YCM) रुग्णालयात शवविच्छेदन
Moshi Garbage Depot Accident Tragedy News:  एक महिन्यापूर्वी मोशी येथील कचरा डेपोमध्ये झालेल्या दुर्घटनेत नागेश गायकवाड यांचा मृत्यू झाला होत. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी सोनाली गायकवाड मानसिक तणावात होत्या. पतीच्या अपघाती निधनानंतर मानसिक तणावात असलेल्या सोनाली गायकवाड यांनी अवघ्या महिनाभरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

८ जुलै रोजी मोशी कचरा डेपोमध्ये कचऱ्याचा मोठा ढिगारा कोसळून झालेल्या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये सोनाली गायकवाड यांचे पती नागेश गायकवाड यांचाही मृत्यू झाला होता. पतीच्या निधनानंतर सोनाली मानसिक तणावात असल्याचे सांगितले जात होते.

Pune News: स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळात रस्त्यासाठी संघर्ष; आजारी रुग्णाला झोळीतून नेण्याची वेळ

राहत्या घरात घेतला गळफास

बुधवारी रात्री सोनाली यांनी राहत्या घरातील एका खोलीत गळफास घेतल्याचे आढळून आले. त्यावेळी त्यांच्या दोन मुली दुसऱ्या खोलीत होत्या. मुली रडत असल्याचे लक्षात आल्यानंतर सोनाली यांचे दीर त्यांना पाहण्यासाठी गेले. आवाज देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी खोलीचा दरवाजा तोडला असता सोनाली यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. कुटुंबियांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले,पण उपचारापुर्वीच त्यांन मृत घोषित करण्यात आले. वायसीएम रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येत आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

या घटनेची भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केल्याची माहिती आहे. सोनाली यांनी हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणामुळे उचलले, याचा तपास पोलीस करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, पतीच्या निधनानंतर त्या मानसिक तणावात होत्या. सोनाली यांच्या पश्चात दोन मुली आहेत. मोशी कचरा डेपो दुर्घटनेनंतर अवघ्या महिनाभरात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Lonavala Tiger Point Road News: लोणावळ्यातील वाहतूक कोंडी फुटणार; कुमार चौक ते टायगर पॉईंट रस्त्याला मिळणार गती!

सहायक पोलीस आयुक्त सुधाकर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली बुधवारी सायंकाळी घरी एकट्याच होत्या. सायंकाळी सातच्या सुमारास त्यांनी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. त्यानंतर कुटुंबातील सदस्य घरी परतल्यानंतर त्यांनी सोनाली यांच्या खोलीचा दरवाजा वाजवला. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

त्यानंतर दरवाजा तोडून पाहिल्यानंतर सोनाली लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्या. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार असून, भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आत्महत्येमागील नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

 

Web Title: Pimpri chinchwad moshi garbage depot accident victim wife commits suicide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 03:49 PM

Topics:  

  • Moshi Building
  • PCMC News
  • suicide news

संबंधित बातम्या

पोलिस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून आत्महत्या; निगडीतील बस डेपोमध्ये आढळला मृतदेह
1

पोलिस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून आत्महत्या; निगडीतील बस डेपोमध्ये आढळला मृतदेह

बीड हादरलं! शिंदे गटाचे बडे नेते शिवाजीराव शिंदे यांची आत्महत्या; 4 महिन्यांपूर्वी झाला होता प्राणघातक हल्ला
2

बीड हादरलं! शिंदे गटाचे बडे नेते शिवाजीराव शिंदे यांची आत्महत्या; 4 महिन्यांपूर्वी झाला होता प्राणघातक हल्ला

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
3

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

PCMC मध्ये ‘स्वच्छता सेवा’ मोहिमेचा एल्गार; लोकसहभागातून शहर चकाचक करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट
4

PCMC मध्ये ‘स्वच्छता सेवा’ मोहिमेचा एल्गार; लोकसहभागातून शहर चकाचक करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.