सहायक पोलीस आयुक्त सुधाकर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली बुधवारी सायंकाळी घरी एकट्याच होत्या. सायंकाळी सातच्या सुमारास त्यांनी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोतील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पात प्रशासकीय इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील नऊ मृत कामगारांच्या वारसांना आर्थिक मदत व पुनर्वसनाचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.
मोशी येथील कचरा डेपोमध्ये कचऱ्याचा डोंगर वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या इमारतीवर कोसळून नऊ कामगारांचा मृत्यू झालेल्या दुर्घटनेचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांचे विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे.
मोशी कचरा डेपो दुर्घटनेत नऊ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी प्रशासनावर तीव्र टीका केली. भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप करत त्यांनी कठोर कारवाईची मागणी केली.
इमारत कोसळून नऊ कामगारांचा मृत्यू झाल्याच्या भीषण दुर्घटनेप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी तत्कालीन उप अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सोमवारी (दि. १३) पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त सूर्यवंशी यांना एक सविस्तर पत्र सादर केले. मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी…
मोशी येथील कचरा डेपो परिसरात झालेल्या भीषण दुर्घटनेप्रकरणी अँटोनी लारा रिन्युएबल एनर्जी प्रा. लि. कंपनीचे प्रकल्प प्रमुख आणि सुरक्षा अधिकाऱ्याविरुद्ध सदोष मनुष्यवधासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी…
मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नऊ जणांच्या कुटुंबीयांना पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील भीषण दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. इमारतीतील बचावकार्य पूर्ण झाले असले तरी बाहेरील कचऱ्याखाली अडकलेल्या एका व्यक्तीचा शोध सुरू असून निष्काळजीपणाच्या आरोपांनी प्रकरण अधिक गंभीर…
मोशी इमारत दुर्घटनेतील बचावकार्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. 'कामगार अजूनही ढिगाऱ्याखाली आणि मुख्यमंत्री पंचतारांकित हॉटेलमध्ये' अशी टीका त्यांनी केली.
पिंपरी-चिंचवडच्या मोशी येथील इमारत दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या बचावकार्यावरून आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली. 'गरीबांच्या जीवाची किंमत नाही का?' असा सवाल करत त्यांनी ठेकेदारांवर कठोर कारवाईची मागणी केली.
Pune Moshi Building Collapse Marathi :पुण्यातील मोशी येथील इमारत दुर्घटनेला 64 तास उलटूनही बचावकार्य सुरू आहे. दुसऱ्या मजल्याचा स्लॅब हटवल्यानंतर आता पहिल्या मजल्याचे पाडकाम सुरू असून आठ कामगार अजूनही ढिगाऱ्याखाली…