Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महापालिका सार्वत्रिक निवडणूक तयारीला वेग; प्रभागनिहाय मतदार याद्यांच्या विभाजनाच्या कामाची सुरुवात

पिंपरी, चिंचवड, भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघांतील तसेच भोर मतदारसंघातील अंशतः भागांच्या याद्यांचा या प्रक्रियेत समावेश करण्यात आला आहे. एकूण ३२ प्रभागांसाठी स्वतंत्र मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 18, 2025 | 11:59 AM
महापालिका सार्वत्रिक निवडणूक तयारीला वेग; प्रभागनिहाय मतदार याद्यांच्या विभाजनाच्या कामाची सुरुवात

महापालिका सार्वत्रिक निवडणूक तयारीला वेग; प्रभागनिहाय मतदार याद्यांच्या विभाजनाच्या कामाची सुरुवात

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीला आता वेग आला आहे. निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे प्रभागनिहाय मतदार यादी विभाजनाचे काम शनिवार (दि.१८) सुरू करण्यात आले. या कामासाठी नियुक्त प्रगणक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) आणि पर्यवेक्षक यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. या प्रक्रियेसाठी नागरिकांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या या प्रशिक्षण सत्रात निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी मतदार यादी विभाजनाच्या संगणकीय प्रक्रियेचे सादरीकरण करून सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, नगररचना सहाय्यक संचालक प्रशांत शिंपी, विशेष अधिकारी किरण गायकवाड आदी अधिकारी उपस्थित होते.

अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील म्हणाले, ‘राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रभागनिहाय मतदार यादी विभाजित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. १ जुलै २०२५ ची विधानसभा मतदार यादी यासाठी आधारभूत मानण्यात आली आहे. हे काम जबाबदारीचे असून, ठरवलेल्या वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे’. त्यांनी स्पष्ट केले की, निवडणूक कामकाजात कोणतीही कसूर झाल्यास संबंधितांविरुद्ध नियमांनुसार कारवाई होईल आणि या कालावधीत कुणालाही रजा मंजूर केली जाणार नाही.

शिंदे यांनी सांगितले की, पिंपरी, चिंचवड, भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघांतील तसेच भोर मतदारसंघातील अंशतः भागांच्या याद्यांचा या प्रक्रियेत समावेश करण्यात आला आहे. एकूण ३२ प्रभागांसाठी स्वतंत्र मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. प्रशिक्षण सत्रात मतदार यादी विभाजनाची प्रक्रिया, माहिती विवरणपत्र भरण्याची पद्धत आणि विविध तांत्रिक बाबींचे स्पष्टीकरण देण्यात आले. प्रशिक्षणार्थींनी विचारलेल्या शंकांचे निरसन करून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.

Web Title: Pimpri chinchwad municipal corporation election preparations started

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2025 | 11:59 AM

Topics:  

  • Election Comission
  • Pimpri Chinchwad
  • Pimpri News

संबंधित बातम्या

PCMC News: पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा! महापौरांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; पावसाळी समस्यांवर त्रिसूत्री नियोजनाचे आदेश
1

PCMC News: पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा! महापौरांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; पावसाळी समस्यांवर त्रिसूत्री नियोजनाचे आदेश

पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा ‘बूस्टर डोस’; स्थायी समितीकडून कोट्यवधींच्या विकासकामांना ‘ग्रीन सिग्नल’
2

पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा ‘बूस्टर डोस’; स्थायी समितीकडून कोट्यवधींच्या विकासकामांना ‘ग्रीन सिग्नल’

Pimpri News : अभय योजनेला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद; 29 दिवसांत 157 कोटींची विक्रमी वसुली
3

Pimpri News : अभय योजनेला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद; 29 दिवसांत 157 कोटींची विक्रमी वसुली

पिंपरी-चिंचवडला अवकाळीचा तडाखा; कडाक्याच्या उन्हात कोसळल्या पावसाच्या सरी
4

पिंपरी-चिंचवडला अवकाळीचा तडाखा; कडाक्याच्या उन्हात कोसळल्या पावसाच्या सरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.