Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महापालिका कर्मचारी भरती प्रक्रिया रखडली; तब्बल ‘इतक्या’ जागा रिक्त

पिंपरी- चिंचवड महापालिकेत गेल्या काही वर्षांपासून तब्बल ४ हजार ६४८ रिक्त पदे आहेत. वारंवार मागणी करूनही ही पदे अद्यापपर्यंत भरण्यात आली नाहीत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 19, 2024 | 12:48 PM
महापालिका कर्मचारी भरती प्रक्रिया रखडली; तब्बल 'इतक्या' जागा रिक्त

महापालिका कर्मचारी भरती प्रक्रिया रखडली; तब्बल 'इतक्या' जागा रिक्त

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : पिंपरी- चिंचवड महापालिकेत गेल्या काही वर्षांपासून तब्बल ४ हजार ६४८ रिक्त पदे आहेत. वारंवार मागणी करूनही ही पदे अद्यापपर्यंत भरण्यात आली नाहीत. या जागा अनेक वर्षांपासून रिक्त असल्याने याचा परिणाम महापालिकेच्या दैनंदिन कामावर होत आहे.

शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून, सध्यस्थितीत ३० लाखांच्या घरात गेली आहे. या लोकसंख्येला नागरी सुविधा पुरविताना महापालिकेची दमछाक होत आहे. उपलब्ध मनुष्यबळ कमी असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. महापालिकेच्या नवीन आकृतीबंधानुसार एकूण ११ हजार ५१५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ ६ हजार ८६७ पदांवर अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. दर महिन्यास किमान २० ते २५ अधिकारी व कर्मचारी निवृत्त होत आहेत.

त्या जागेवर नोकरी भरती होत नसल्याने अनेक महत्वाची पदे रिक्त आहेत. आतापर्यंत तब्बल ४ हजार ६४८ जागा रिक्त आहेत. त्यामुळे एकाच अधिकाऱ्यांकडे अनेक विभागांची जबाबदारी टाकली जात आहे. परिणामी, नियमित दैनंदिन कामकाज त्यात अतिरिक्त जबाबदारी त्यामुळे महापालिका कामकाजाचा खोळंबा होता. या सर्व विलंबामुळे करदात्या नागरिकांना वेळेत नागरी सुविधा उपलब्ध होत नाहीत. कामाचा दर्जा ढासळत आहे. विकासकामे रखडण्याचे प्रकार वाढत आहेत.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तथा नगरसचिव उल्हास जगताप हे ३० जून २०२४ ला सेवानिवृत्त झाले. त्यापूर्वी किमान तीन महिने अगोदर नगरसचिव पद भरणे आवश्यक होते. नव्या नगरसचिवाला ते कामकाज समजून घेता आले असते. मात्र, तसे न झाल्याने महापालिकेत सध्या नगरसचिव तसेच, उपनगरसचिव नाहीत.

अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्याकडे नगरसचिव पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. वरिष्ठ पदावरील अधिकारी सेवानिवृत्त होण्यापूर्वी त्या जागी पात्र अधिकाऱ्यांची किमान एक ते दोन महिने अगोदर नियुक्ती होणे आवश्यक आहे. त्या अधिकाऱ्यांना योग्य ते प्रशिक्षण दिले गेले पाहिजे. त्या पदावर अधिकारी उपलब्ध नसल्यासे जाहिरात देऊन त्या जागा तातडीने भरणे गरजेचे आहे. मात्र, त्याबाबत तातडीने हालचाल होत नसल्याचे दिसून येत आहे.

हे सुद्धा वाचा : गृहमंत्री अमित शाहांच्या वक्तव्यावरुन काँग्रेस आक्रमक; ‘या’ नेत्याने केली राजीनाम्याची मागणी

महापालिकेच्या सुरुवातीपासून कार्यरत असलेले अनेक अधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत, तसेच, काही अधिकारी निवृत्तीच्या टप्प्यात आहेत. २००० पासून महापालिकेतून वर्ग एक ते वर्ग चारमधील तब्बल ६ हजार १६३ अधिकारी सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त, राजीनामा, निधन, शासन सेवेत गेले आहेत.

महापालिकेकडून ३६० पदांची नोकरभरती काही महिन्यापूर्वीच पूर्ण झाली आहे. लिपिक व अभियंता पदावर रूजू झालेल्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. अग्रिशमन विभागाचे विविध पदे भरली जात आहेत. – विठ्ठल जोशी, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग.

Web Title: Pimpri chinchwad municipal corporation employee recruitment process is stalled nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2024 | 12:48 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • maharashtra
  • Pimpri

संबंधित बातम्या

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप
1

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप

Dharashiv Airport : धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
2

Dharashiv Airport : धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

जिल्हा परिषद निवडणूक कधी? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
3

जिल्हा परिषद निवडणूक कधी? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Local Body Election :  ‘Gen-Z’ लादेखील राजकारणाचे आकर्षण! नोकरी सोडून राजकारणात प्रवेश
4

Maharashtra Local Body Election : ‘Gen-Z’ लादेखील राजकारणाचे आकर्षण! नोकरी सोडून राजकारणात प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.