Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीचा ‘ई-गर्व्हनन्स अँड इकोनॉमी’ पुरस्काराने गौरव

पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना वेळेत व सातत्यपूर्ण माहिती मिळण्यासाठी महापालिकेच्या वतीने पीसीएमसी स्मार्ट सारथी ऍप उपलब्ध करून देण्यात आले आहे. या माध्यमातून, युटिलिटी अपडेट्स, ऑनलाइन कर भरणे, ऑनलाइन प्रमाणपत्रे तसेच ऑनलाईन तक्रार निवारण सेवा देण्यात येते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 25, 2022 | 06:40 PM
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीचा ‘ई-गर्व्हनन्स अँड इकोनॉमी’ पुरस्काराने गौरव
Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत भारत सरकारचे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय निर्माण भवन, नवी दिल्ली यांच्या वतीने आयोजित ‘७ व्या स्मार्ट सिटीज इंडिया २०२२’ आणि ‘२९ व्या कन्व्हर्जन्स इंडिया २०२२’ एक्स्पोमध्ये पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पीसीएमसी स्मार्ट सारथी उपक्रमाला “ई- गर्व्हनन्स अँड इकोनॉमी” पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

बिहार राज्याचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री जिबेश कुमार, वीज मंत्रालयाचे सहसचिव अंजु भल्ला यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील यांनी हा पुरस्कार स्विकारला. या पुरस्काराने पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकीकात भर पडली आहे.

२३ ते २५ मार्च २०२२ या दरम्यान प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन (ITPO) द्वारे देशातील १०० स्मार्ट सिटींसाठी एक्सो भरविण्यात आला होता. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी प्रकल्प, उपक्रम आणि उपलब्धी दाखवण्यासाठी डिस्प्ले स्टॉल लावण्यात आला आहे. स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण यांच्या नेतृत्वाखाली स्मार्ट सिटीचे विवेक पाटील, सीटीओ टीमच्या ऋतुजा करकरे यांनी सहभाग नोंदविला होता.

कोविड काळात प्रशासनाची महत्त्वाची भूमिका, माहिती गोळा करण्यासाठी अनेक नवकल्पनांचा आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा केलेला वापर, द्वि-मार्गी संप्रेषणाची तरतूद, व्यवस्थापन आणि समन्वय, भविष्य सूचक मॉडेलिंग आणि सज्जता, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तसेच कॉर्पोरेट क्षेत्रांना होणारा तंत्रज्ञानाचा फायदा, स्टार्टअप्स मिळणारे प्राधान्य, नागरिकांना राहण्यायोग्य आणि शाश्वत शहरे निर्माण करण्यासाठी योग्य उपाययोजना, स्मार्ट शहराची संकल्पना, तसेच, सिटी लीडर्स कॉन्क्लेव्हमध्ये शहरी स्मार्ट सिटी सोल्यूशन्स व स्मार्ट सिटीज इन्फ्रास्ट्रक्चर, स्मार्ट सिटी फ्रेमवर्कसह स्मार्ट आयसीटी, स्मार्ट एनर्जी, बिल्डिंग्स, ट्रान्सपोर्ट, वॉटर आणि क्लीन इंडिया इ. इंडस्ट्री यासह शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य बनवून प्रभाव पाडणाऱ्या प्रकल्पांचे व्हिडिओद्वारे या तीन दिवसीय एक्स्पोमध्ये सादरीकरण करण्यात आले होते.

तसेच, पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना वेळेत व सातत्यपूर्ण माहिती मिळण्यासाठी महापालिकेच्या वतीने पीसीएमसी स्मार्ट सारथी ऍप उपलब्ध करून देण्यात आले आहे. या माध्यमातून, युटिलिटी अपडेट्स, ऑनलाइन कर भरणे, ऑनलाइन प्रमाणपत्रे तसेच ऑनलाईन तक्रार निवारण सेवा देण्यात येते. नागरिक पीसीएमसी कार्यालयात न जाता तक्रारीची स्थिती जाणून घेऊ शकतात.

Web Title: Pimpri chinchwad smart city honored with e governance and economy award nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2022 | 06:40 PM

Topics:  

  • Pimpri Chinchwad
  • Smart City

संबंधित बातम्या

Pimpri Chinchwad crime news: पिंपरी – चिंचवडमध्ये बेकायदा पिस्तुलांचा वापर, पाच जण वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक
1

Pimpri Chinchwad crime news: पिंपरी – चिंचवडमध्ये बेकायदा पिस्तुलांचा वापर, पाच जण वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक

पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठा सक्षमीकरणासाठी आता…; आमदार लांडगेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
2

पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठा सक्षमीकरणासाठी आता…; आमदार लांडगेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

पिंपरीत जिम ट्रेनर तरुण आणि तरुणीने केली युवकाची हत्या; हत्येनंतर दोघेही आरोपी पोलीस स्टेशला झाले हजर, आणि…
3

पिंपरीत जिम ट्रेनर तरुण आणि तरुणीने केली युवकाची हत्या; हत्येनंतर दोघेही आरोपी पोलीस स्टेशला झाले हजर, आणि…

Pimpari- Chinchwad : जिममध्ये व्यायाम करण्यासाठी गेला अन्…; पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना
4

Pimpari- Chinchwad : जिममध्ये व्यायाम करण्यासाठी गेला अन्…; पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.