Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PCMC News: महापौरांसाठी ३० लाख तर आयुक्तांसाठी १९ लाखांची कार; PCMC चा थेट खरेदीचा निर्णय चर्चेत

PCMC News : महापालिकेची विद्यमान वाहने अद्याप सुस्थितीत असल्याचेही नोंदींवरून समोर येत आहे. एप्रिल २०२१ मध्ये तत्कालीन महापौरांसाठी सुमारे १९.९१ लाख रुपये किमतीचे वाहन खरेदी करण्यात आले होते. हे वाहन अद्याप वापरण्यायोग्य आणि चांगल्या स्थितीत असल्याचे सांगितले जाते.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 24, 2026 | 07:10 PM
PCMC News, Pimpri-Chinchwad, Luxury Cars Controversy, Civic Spending, Standing Committee

PCMC News, Pimpri-Chinchwad, Luxury Cars Controversy, Civic Spending, Standing Committee

Follow Us
Follow Us:
  • महापौर रवी लांडगे यांच्यासाठी ३० लाख रुपये आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासाठी १९ लाख रुपयांची अलिशान वाहने
  • महापौरांसाठी वाहन खरेदीची शासकीय मर्यादा २० लाख रुपये असताना, त्यापेक्षा अधिक खर्च केल्याचा आरोप
  • ही दोन्ही महागडी वाहने खरेदी करताना कोणतीही अधिकृत निविदा प्रक्रिया (Tender Process) न राबवता, ‘थेट पद्धतीने’ खरेदी करण्यात आली
PCMC News: सुमारे ४,५०० कोटी रुपयांच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आर्थिक शिस्तीच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब समोर आली आहे. एकीकडे आर्थिक अडचणींचे कारण देत विविध विकासकामे आणि प्रकल्प रखडल्याची चर्चा असताना, दुसरीकडे महापौर आणि आयुक्तांसाठी निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक किमतीची वाहने खरेदी करण्यात आल्याचा आरोप होत आहे.

राज्य शासनाच्या जुलै २०२० मधील आदेशानुसार ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ श्रेणीतील महानगरपालिकांच्या महापौरांसाठी वाहन खरेदीची कमाल मर्यादा २० लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. तसेच १७ सप्टेंबर २०२५ रोजीच्या आदेशानुसार महानगरपालिका आयुक्तांसाठी वाहन खरेदीची आर्थिक मर्यादा १५ लाख रुपये आहे.

पुण्यात मोठी डेटा चोरी; मालमत्ताकराचा डेटा विकला पाच हजारांत; सल्लागार अभियंत्यावर गुन्हा दाखल

मात्र, या नियमांकडे दुर्लक्ष करून महापौरांसाठी सुमारे ३० लाख रुपये किमतीचे वाहन खरेदी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हे वाहन निर्धारित मर्यादेपेक्षा तब्बल १० लाख रुपये अधिक किमतीचे असल्याचे सांगितले जात आहे. तसेच आयुक्तांसाठीही सुमारे १९ लाख रुपये किमतीचे वाहन खरेदी करण्यात आल्याने प्रशासकीय निर्णयावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर खर्चावर प्रश्न

सध्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर अंदाजे ४,५०० कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे सांगितले जात आहे. अनेक विकास प्रकल्पांसाठी निधीची कमतरता भासत असताना आणि नवीन कर्ज उभारण्याचे प्रयत्न सुरू असताना, व्हीआयपी वाहनांवरील खर्चाबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे, महापालिकेची विद्यमान वाहने अद्याप सुस्थितीत असल्याचेही नोंदींवरून समोर येत आहे. एप्रिल २०२१ मध्ये तत्कालीन महापौरांसाठी सुमारे १९.९१ लाख रुपये किमतीचे वाहन खरेदी करण्यात आले होते. हे वाहन अद्याप वापरण्यायोग्य आणि चांगल्या स्थितीत असल्याचे सांगितले जाते.

Baramati News : बारामती नगर परिषदेचा निर्णय; 3.5 एकर जागेत उभारणार अजितदादा पवार स्मारक

काटकसरीच्या धोरणालाच हरताळ?

महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अलीकडेच खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे आणि अनावश्यक खर्च टाळण्याचे निर्देश दिले होते. सर्व विभागप्रमुखांना काटकसरीचे धोरण अवलंबण्याचे आदेशही देण्यात आले होते.

मात्र, त्याच काळात महागड्या वाहनांच्या खरेदीला मंजुरी मिळाल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. आर्थिक शिस्तीचा आग्रह धरणाऱ्या प्रशासनाने स्वतःच्या खर्चाबाबतही त्याच निकषांचे पालन करणे अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणामुळे महापालिकेच्या आर्थिक व्यवस्थापनावर आणि निधीच्या वापराबाबतच्या निर्णयप्रक्रियेवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. नागरिकांच्या कररूपाने जमा होणाऱ्या निधीचा वापर विकासकामांसाठी प्राधान्याने व्हावा, अशी मागणीही यानिमित्ताने पुढे येत आहे.

 

 

Web Title: Pcmc luxury vehicles purchase controversy mayor commissioner new cars

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 07:10 PM

Topics:  

  • PCMC News
  • Pimpri Chinchwad
  • pune news

संबंधित बातम्या

मोशी दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना 55 लाखांची मदत; नोकरी, मोफत शिक्षण अन्…
1

मोशी दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना 55 लाखांची मदत; नोकरी, मोफत शिक्षण अन्…

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती
2

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती

दारु नका बनवू, रोजगार करा! पुणे ग्रामीण पोलीस ‘त्या’ शंभर कुटुंबांना दाखवणार नवी वाट
3

दारु नका बनवू, रोजगार करा! पुणे ग्रामीण पोलीस ‘त्या’ शंभर कुटुंबांना दाखवणार नवी वाट

महाबळेश्वरच्या सहलीला निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला; शिरवळजवळ भीषण अपघातात चौघांचा मृत्यू
4

महाबळेश्वरच्या सहलीला निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला; शिरवळजवळ भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.