Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महापालिका प्रशासकीय भवनाच्या कामात ‘अजित सृष्टी’चा समावेश करा; भाजप आमदाराची आयुक्तांकडे मागणी

पिंपरी- चिंचवड महापालिकेचे नवीन प्रशासकीय भवन आणि 'अजितसृष्टी' या दोन्ही प्रकल्पांचे काम पूर्ण करून त्यांचे एकत्रित लोकार्पण व्हावे, अशी अपेक्षा महेश लांडगे यांनी व्यक्त केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 23, 2026 | 02:48 PM
महापालिका प्रशासकीय भवनाच्या कामात ‘अजित सृष्टी’चा समावेश करा; भाजप आमदाराची आयुक्तांकडे मागणी

महापालिका प्रशासकीय भवनाच्या कामात ‘अजित सृष्टी’चा समावेश करा; भाजप आमदाराची आयुक्तांकडे मागणी

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन मुख्य प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या टप्प्यातील कामामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणाऱ्या ‘अजितसृष्टी’ या प्रकल्पाचा समावेश करावा, अशी आग्रही मागणी भोसरीचे भाजपा आमदार महेश लांडगे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. नवीन प्रशासकीय भवन आणि ‘अजितसृष्टी’ या दोन्ही प्रकल्पांचे काम पूर्ण करून त्यांचे एकत्रित लोकार्पण व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

 

भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना यासंदर्भात एक सविस्तर पत्र दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, सध्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे काम प्रगतीपथावर आहे. याच इमारतीच्या आवारात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्याची स्मृती जपणारी ‘अजित सृष्टी’ उभारण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. मात्र, आता प्रशासकीय भवनाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाची निविदा प्रसिद्ध करताना त्यात ‘अजित सृष्टी’ प्रकल्पाचाही समावेश करणे अपेक्षित असल्याचे आमदार लांडगे यांनी निदर्शनास आणून दिले आहे. मुख्य प्रशासकीय इमारतीच्या आवारातच हा प्रकल्प उभारला जाणार असल्याने दोन्ही कामे एकाच वेळी पूर्ण होणे आवश्यक आहे.

लोकनेते अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र आणि विशेषतः पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात दिलेले योगदान बहुमोल आहे. शहराच्या विकासाचा हा इतिहास आणि अजितदादांच्या कार्याचा गौरव भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘अजितसृष्टी’ हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, अशी भावना आमदार लांडगे यांनी पत्रात व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा : हक्कसोड पत्र दिलेल्या बहिणींच्या नव्याने आलेल्या हरकती फेटाळणार; जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टच सांगितलं

प्रशासकीय कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याची मागणी

‘अजितसृष्टी’चे काम नवीन प्रशासकीय इमारतीच्या मूळ प्रकल्पामध्ये समाविष्ट करून, त्यासाठी आवश्यक असणारी प्रशासकीय, तांत्रिक आणि आर्थिक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, अशी सूचना आमदार लांडगे यांनी केली आहे. नवीन प्रशासकीय इमारत ही शहराच्या भविष्यातील विकासाचे प्रतीक असणार आहे. त्यामुळे ‘अजितसृष्टी’चे काम प्राधान्याने पूर्ण करून सर्वसाधारण सभेच्या निर्णयाला योग्य न्याय द्यावा आणि दोन्ही प्रकल्प एकाच वेळी शहरवासीयांच्या सेवेत दाखल करावेत, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

“पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासात लोकनेते अजितदादा पवार यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या कार्याचा गौरव आणि शहराच्या विकासाची वाटचाल पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी नव्या प्रशासकीय इमारतीसोबतच ‘अजितसृष्टी’चे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. या दोन्ही वास्तूंचे एकत्रित लोकार्पण व्हावे, ही तमाम पिंपरी-चिंचवडकरांची लोकभावना आहे. यासाठी प्रशासकीय पातळीवर सर्वतोपरी पाठपुरावा करून हा प्रकल्प लवकरात लवकर शहरवासीयांच्या सेवेत रुजू करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” — महेश लांडगे, आमदार, भाजपा.

Web Title: Mahesh landge has made a major demand to the pimpri chinchwad municipal commissioner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 02:48 PM

Topics:  

  • mahesh landge
  • PCMC News
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

PCMC मध्ये ‘स्वच्छता सेवा’ मोहिमेचा एल्गार; लोकसहभागातून शहर चकाचक करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट
1

PCMC मध्ये ‘स्वच्छता सेवा’ मोहिमेचा एल्गार; लोकसहभागातून शहर चकाचक करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट

Pavana River Pollution : पवना नदी पुन्हा फेसाळली, रासायनिक सांडपाण्यामुळे जलचर धोक्यात; प्रशासनाचे दुर्लक्ष
2

Pavana River Pollution : पवना नदी पुन्हा फेसाळली, रासायनिक सांडपाण्यामुळे जलचर धोक्यात; प्रशासनाचे दुर्लक्ष

शालेय खेळाडू मैदानात घालणार धुमाकूळ! PCMC मध्ये Basketball स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन
3

शालेय खेळाडू मैदानात घालणार धुमाकूळ! PCMC मध्ये Basketball स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन

PCMC DP Plan News: थेरगावमध्ये रिंगरोड तर मोशीत आरक्षणांना तीव्र विरोध; आकुर्डीत DP आराखड्यावर सुनावणीचा धडाका
4

PCMC DP Plan News: थेरगावमध्ये रिंगरोड तर मोशीत आरक्षणांना तीव्र विरोध; आकुर्डीत DP आराखड्यावर सुनावणीचा धडाका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.