Pimpri- Nigdi Metroसाठी आनंदाची बातमी! टिळक चौकात चौथे स्टेशन मंजूर; ५५ टक्के काम पूर्ण
प्रकल्पाचा सुधारित खर्च आणि आराखडा
सुरुवातीला ४.४१३ किलोमीटर अंतराच्या या मार्गासाठी ९१० कोटी १८ लाख रुपये खर्च अपेक्षित होता. यामध्ये चिंचवड स्टेशन, आकुर्डी (खंडोबा माळ चौक) आणि निगडी (भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक) अशी तीन स्थानके प्रस्तावित होती. मात्र, १० मार्च २०२६ रोजी टिळक चौकातील चौथ्या स्टेशनच्या ५० कोटींच्या वाढीव खर्चाला मान्यता मिळाल्याने प्रकल्पाचा एकूण खर्च आता ९६० कोटी १८ लाख रुपये झाला आहे. या अतिरिक्त ५० कोटींच्या खर्चापैकी निम्मा वाटा (२५ कोटी) राज्य सरकार, तर उर्वरित २५ कोटींचा भार महानगरपालिका उचलणार आहे.
आहे.
निधीचा तपशील आणि महापालिकेचा वाटा
या प्रकल्पासाठी केंद्र सरकार ६७.०२ कोटी आणि राज्य सरकार ७९.०८ कोटींचे अनुदान देणार आहे. या तुलनेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा एकूण आर्थिक वाटा सर्वाधिक आहे.
महामेट्रोने नुकतीच ६० कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती. त्यापैकी ५० कोटी रुपये महापालिकेने २०२५-२६ च्या अर्थसंकल्पातून दिले आहेत.उर्वरित ४७ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी देण्याबाबतचा प्रस्ताव सध्या महानगरपालिकेच्या स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.
कामाची सद्यस्थिती
या मार्गावरील बहुतांश पिलर उभारणीचे काम पूर्ण झाले असून, सध्या व्हायडक्ट (उड्डाणपूल) टाकण्याचे काम वेगाने सुरू आहे. निगडीपर्यंतचा हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील प्रवाशांना जलद आणि सुखकर प्रवासाचा मोठा दिलासा मिळणार आहे.
तपशील,रक्कम (कोटी रुपयांत)
प्रकल्पाचा एकूण सुधारित खर्च,९६०.१८
महानगरपालिकेचा एकूण हिस्सा,१४६.९७
जागा व पुनर्वसन खर्च,१३७.८७
आतापर्यंत दिलेली रक्कम,९९.००
उर्वरित देणे असलेली रक्कम,४७.९७






