Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pimpri-Nigdi Metro विस्ताराला मोठा वेग! अखेर चौथ्या स्थानकाला मंजुरी; महापालिकेकडून २५ कोटींची तरतूद

Pimpri-Nigdi Metro: पिंपरी ते निगडी या भागात मेट्रोच्या कामामुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. रजोपर्यंत महामेट्रो या भागातील खराब झालेले रस्ते दुरुस्त करत नाही, तोपर्यंत अतिरिक्त अनुदान मंजूर केले जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका स्थायी समितीने घेतली होती.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 27, 2026 | 04:57 PM
Pune Metro, PCMC Extension, Nigdi Metro, Maha Metro, Infrastructure News, Urban Mobility, Pimpri-Chinchwad,

Pune Metro, PCMC Extension, Nigdi Metro, Maha Metro, Infrastructure News, Urban Mobility, Pimpri-Chinchwad,

Follow Us
Follow Us:
  • मेट्रोच्या कामांमुळे पिंपरी ते निगडी दरम्यानच्या मुख्य रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली होती.
  • याच रस्त्यांच्या वादामुळे मे महिन्यात स्थायी समितीने ही मंजुरी दोन वेळा तातडीने तहकूब केली होती.
  • अखेर महापालिका प्रशासन आणि महामेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील सकारात्मक समन्वयानंतर रस्त्यांच्या दुरुस्तीचे आश्वासन
 

Pimpri-Nigdi Metro Update: महामेट्रोच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या पिंपरी ते निगडी या विस्तारित मेट्रो मार्गावरील अतिरिक्त चौथ्या स्थानकाचा (स्टेशन) मार्ग अखेर मोकळा झाला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या बुधवारी (ता. २४) झालेल्या सभेमध्ये या स्थानकासाठी आवश्यक असलेल्या आर्थिक तरतुदीला अंतिम मंजुरी देण्यात आली. यामुळे गेल्या काही काळापासून रखडलेल्या या विषयावर अखेर पडदा पडला असून, निगडी परिसरातील नागरिकांना आता मेट्रो सेवेचा अधिक कार्यक्षम लाभ घेता येणार आहे.

पिंपरी ते निगडी या भागात मेट्रोच्या कामामुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. रजोपर्यंत महामेट्रो या भागातील खराब झालेले रस्ते दुरुस्त करत नाही, तोपर्यंत अतिरिक्त अनुदान मंजूर केले जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका स्थायी समितीने घेतली होती. याच वादामुळे मे महिन्यात ही मंजुरी दोन वेळा तहकूब करण्यात आली होती. मात्र, महापालिका प्रशासन आणि महामेट्रो यांच्यातील समन्वयानंतर अखेर बुधवारी या खर्चास मान्यता देण्यात आली.

PCMC News: पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गिका वेग घेणार; पिंपरी-चिंचवड स्थायी समितीचे मोठे निर्णय

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (महामेट्रो) वतीने पुणे मेट्रो फेज-१ चे विस्तारीकरण निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत केले जात आहे.

मूळ मार्गिकाः साडेचार किलोमीटरची उन्नत (उंचावलेले) मार्गिका.

नियोजित स्थानके: चिंचवड, आकुर्डी आणि भक्ती-शक्ती.

चौथे स्थानक का?: निगडी परिसरातील प्रवाशांची वाढती संख्या आणि मागणी विचारात घेऊन केंद्र सरकारने चौथ्या स्थानकास मंजुरी दिली होती.

खर्चाचे गणितः या प्रकल्पाचा मूळ खर्च ९१० कोटी रुपये इतका होता. मात्र, या अतिरिक्त स्थानकामुळे प्रकल्पाचा खर्च ५० कोटी रुपयांनी वाढला असून, आता एकूण प्रकल्प खर्च ९६०.१८ कोटीवर पोहोचला आहे. या वाढीव ५० कोटीपैकी रुपये २५ कोटी रुपये राज्य सरकारच्या नागरी परिवहन निधीतून, तर उर्वरित २५ कोटी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून अनुदान म्हणून दिले जाणार आहेत.

युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध; ‘सारथी’च्या कार्याचे मुख्यमंत्री फडणवीसांकडून कौतुक

प्रकल्पाचा आतापर्यंतचा प्रवास आणि – निधीचा गोषवारा; काम युद्धपातळीवर सुरू

पिंपरी ते स्वारगेट या पहिल्या टप्प्यातील मेट्रोचा विस्तार निगडीपर्यंत करण्याच्या प्रस्तावाला ऑक्टोबर २०२३ मध्ये मान्यता मिळाली होती. सध्या हे काम युद्धपातळीवर सुरू असून, या प्रकल्पासाठी विविध स्तरांतून – मिळालेला निधी खालीलप्रमाणे आहे:

निधीचा स्त्रोत मिळालेले अनुदान/तरतूद

केंद्र सरकार ६७ कोटी
राज्य सरकार ७९ कोटी
अतिरिक्त स्थानक (राज्य नागरी परिवहन निधी) २५ कोटी
अतिरिक्त स्थानक (पिंपरी-चिंचवड महापालिका) २५ कोटी
प्रकल्पाचा एकूण सुधारित खर्च ९६०.१८ कोटी

स्थानकाच्या प्रत्यक्ष कामाला मोठी मिळणार गती

स्थायी समितीकडून २५ कोटी रुपयांच्या महापालिकेच्या वाट्याला मंजुरी मिळाल्याने आता या चौथ्या स्थानकाच्या प्रत्यक्ष कामाला मोठी गती मिळणार आहे. निगडी आणि परिसरातील नोकरदार, विद्यार्थी आणि नियमित प्रवाशांसाठी हे चौथे स्टेशन वाहतूक कोंडीतून सुटका करणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

 

 

Web Title: Pimpri nigdi metro extension pcmc approves 25 crore for fourth station bhakti shakti chowk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 04:57 PM

Topics:  

  • metro news
  • PCMC News
  • Pune Metro

संबंधित बातम्या

तुडुंब, तुडुंब नुसती गच्च भरली! गणेशोत्सवात Pune Metro मालामाल; 12 दिवसांत तब्बल 7 कोटी…
1

तुडुंब, तुडुंब नुसती गच्च भरली! गणेशोत्सवात Pune Metro मालामाल; 12 दिवसांत तब्बल 7 कोटी…

PCMC मध्ये ‘स्वच्छता सेवा’ मोहिमेचा एल्गार; लोकसहभागातून शहर चकाचक करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट
2

PCMC मध्ये ‘स्वच्छता सेवा’ मोहिमेचा एल्गार; लोकसहभागातून शहर चकाचक करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट

Thane Ring Metro: ठाणे रिंग मेट्रो थेट मुंबई, भिवंडी आणि कल्याणला जोडली जाणार; प्रवास होणार वेगवान
3

Thane Ring Metro: ठाणे रिंग मेट्रो थेट मुंबई, भिवंडी आणि कल्याणला जोडली जाणार; प्रवास होणार वेगवान

Pavana River Pollution : पवना नदी पुन्हा फेसाळली, रासायनिक सांडपाण्यामुळे जलचर धोक्यात; प्रशासनाचे दुर्लक्ष
4

Pavana River Pollution : पवना नदी पुन्हा फेसाळली, रासायनिक सांडपाण्यामुळे जलचर धोक्यात; प्रशासनाचे दुर्लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.