Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: ‘थ्री स्टार’ पार्किंग हब उभारण्याची योजना! वाहतूककोंडी फोडण्यासाठी मुंबई महापालिकेचा मास्टर प्लान

मुंबईत दररोज देशभरातून हजारो खाजगी ट्रॅव्हल्स बसेस आणि अवजड वाहने येतात. या गाड्यांमुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी होते आणि मुंबईकरांचा खोळंबा होतो.

  • By सुरुची कदम
Updated On: May 20, 2026 | 10:45 AM
Mumbai News: 'थ्री स्टार' पार्किंग हब उभारण्याची योजना! वाहतूककोंडी फोडण्यासाठी मुंबई महापालिकेचा मास्टर प्लान

Mumbai News: 'थ्री स्टार' पार्किंग हब उभारण्याची योजना! वाहतूककोंडी फोडण्यासाठी मुंबई महापालिकेचा मास्टर प्लान

Follow Us
Follow Us:

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. २०१७ मध्ये जकात कर रद्द झाल्यानंतर ओस पडलेल्या दहिसर आणि मानखुर्द जकात नाक्यांच्या विस्तीर्ण भूखंडांवर आता आधुनिक पार्किंग हब साकारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी पालिका तब्बल १५०० कोटी रुपये खर्च करणार असून, यामुळे मुंबईच्या वेशीवरच वाहतूक कोंडीला ‘ब्रेक’ लावणे शक्य होणार आहे.(फोटो सौजन्य – AI)

Railway Mega Block : रविवारच्या मेगाब्लॉकची मोठी अपडेट! लोकलने प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या वेळापत्रक

मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी या प्रकल्पाबाबत पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती दिली. दहिसर जकात नाक्यावर या प्रकल्पाच्या कामाला आधीच सुरुवात झाली असून, लवकरच मानखुर्द जकात नाक्यावरही सर्व अत्याधुनिक सोयीसुविधांसह पार्किंग हब उभारले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईत दररोज देशभरातून हजारो खाजगी ट्रॅव्हल्स बसेस आणि अवजड वाहने येतात. या गाड्यांमुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी होते आणि मुंबईकरांचा खोळंबा होतो. या समस्येवर तोडगा म्हणून आता देशभरातून येणाऱ्या या पॅसेंजर गाड्यांना मुंबई शहरात प्रवेश न देता दहिसर आणि मानखुर्द चेक नाक्यांवरच रोखले जाईल या गाड्या याच पार्किंग हबमध्ये थांबतील. आणि तिथूनच प्रवाशांना उतरवून पुन्हा परतीच्या प्रवासाला निघतील.

प्रवाशांना मिळणार उत्तम कनेक्टिव्हिटी

लांबच्या प्रवासामुळे थकलेल्या प्रवाशांसाठी विश्रांतीची उत्तम सोय व्हावी म्हणून येथे थ्री स्टार हॉटल आणि खरेदीसाठी शॉपिंग सेंटर उभारण्यात येईल.दुचाकी, चारचाकी गाड्यांसह शेकडो बस आणि ट्रक्ससाठी येथे भव्य पार्किंगची व्यवस्था असेल.ट्रॅव्हल्समधून उतरलेल्या प्रवाशांना मुंबईत त्यांच्या इच्छित स्थळी सुखरूप आणि वेगाने पोहोचता यावे, यासाठी या पार्किंग हबला बेस्ट बसेस, मेट्रो, ऑटो रिक्षा आणि टॅक्सी सेवांची थेट कनेक्टिव्हिटी जोडली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा पुढील प्रवास अधिक सुकर होईल.

Kokan Farmers Protest Mumbai : काजू-आंबा उत्पादकांचे मुंबईत आंदोलन; राजू शेट्टींसह नेते पोलिसांच्या ताब्यात

मुंबईतील वाहतूककोंडी कमी करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरेल. दहिसरमध्ये काम सुरू झाले असून, मानखुर्दचा प्रकल्पही लवकरच मार्गी लागेल. प्रवाशांना सर्व सोयी एकाच ठिकाणी मिळतील, यादृष्टीने नियोजन केले आहे, असे मत अश्विनी भिडे, आयुक्त, मुंबई महानगरपालिका यांनी मांडले आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Plans to set up a three star parking hub master plan of mumbai municipal corporation to break the traffic jam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 10:45 AM

Topics:  

  • Ashwini Bhide
  • Maharashtra Road Transport
  • Mumabi

संबंधित बातम्या

Mumbai Politics: एसआरएमुळे पालिकेचा कोट्यवधींचा महसूल बुडाला; अश्विनी भिडेंच्या पत्राने मंत्रालयात खळबळ
1

Mumbai Politics: एसआरएमुळे पालिकेचा कोट्यवधींचा महसूल बुडाला; अश्विनी भिडेंच्या पत्राने मंत्रालयात खळबळ

Rohit Pawar on Chakan MIDC: आवाज उठवणाऱ्या उद्योजकांना धमक्या;  रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप
2

Rohit Pawar on Chakan MIDC: आवाज उठवणाऱ्या उद्योजकांना धमक्या; रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.