Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Election 2024 : PM मोदी, गडकरी अन् योगी आदित्यनाथ… राज्यात तब्बल १३३ सभा; भाजपची मोठी रणनीती

महाष्ट्राच्या विधानसभा निवडणूक काळात राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह नितीन गडकरी, योगी आदित्य नाथ, देवेंद्र फडणवीस याच्या १३३ सभा होणार आहेत. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मुंबई-कोकण, मराठवाड्यात या सभा होतील

  • By संदीप गावडे
Updated On: Oct 30, 2024 | 09:40 PM
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक काळात राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप नेत्यांच्या १३३ सभा होणार आहेत.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक काळात राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप नेत्यांच्या १३३ सभा होणार आहेत.

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची धामधून सुरू असून काही ठिकाणी प्रचारालाही सुरुवात झाली आहे. सोमवारनंतर राज्यात प्रचाराचा खऱ्या अर्थाने धुरळा उडणार आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीत जसा फटका बसला तसा विधानसभेतही बसू नये यासाठी भाजप आणि महायुतीने जोरदार तयारी केली आहे. प्रंतप्रधान मोंदींसह देशातील मोठ्या नेत्यांना प्रचारात उतरवलं आहे. त्यात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि योगी आदित्यनाथ यांचाही समावेश आहे. क

निवडणूक काळात राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मुंबई-कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ८ रॅली होणार आहेत. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याही सभा होणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्रात एकूण १५ सभा होणार आहेत.

हेही वाचा-शाकाहारी थाळी-80 रुपये, मांसाहारी थाळी-200 रुपये ! निवडणूक आयोगाकडून जारी केले गेले आले उमेदवारांकडून केल्या जाणाऱ्या खर्चाचे दर

भाजपचे ज्येष्ठ नेते उडवणार प्रचाराचा धुरळा

पंतप्रधान मोदी – ८

नितीन गडकरी – ४०

अमित शहा – २०

योगी आदित्यनाथ – १५

देवेंद्र फडणवीस – ५०

हेही वाचा-Heena Gavit : ऐन निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का; हिना गावीत यांची बंडखोरी

प्रचारात भाजपच्या नेत्यांची फौज

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीला मोठं अपयश आलं. तसाच फटका विधानसभा निवडणुकीत बसू नये यासाठी भाजपने राज्यात मोठी रणनीती आखली आहे. राज्यातील जवळपास सर्वच मतदारसंघांमध्ये पोहोचण्याचा मानस आहे. त्यामुळे यावेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची आणि राज्यातील नेत्यांची मोठी फौज यावेळी प्रचारात उतरणार आहे.

प्रतिमा सुधारण्याचा असेल प्रयत्न

लोकसभा निवडणुकीत महायुतीत सर्वात जास्त फटका भाजपला बसला होता. कारण पूर्वीच्या जागाही भाजपला राखता आल्या नाहीत. केवळ ९ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. त्यामानाने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ७ जागा मिळाल्या. अजित पवार गटालाही मोठा फटका बसला. महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं. त्यामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वासही दांडगा आहे. त्यात कॉंग्रेसला नवसंजीवनी मिळाली आहे. त्याचा प्रभाव या निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे.

मराठा आंदोलन, फोडाफोडीचं राजकारण आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना पक्षात सामावून घेतलेल्यामुळे पक्षाला टीकेला सामोरं जावं लागलं आहे. तसंच संविधान बदण्याच्या भाषेमुळे अल्पसंख्याक समाजही दुखावला गेला.  त्यामुळे या सर्व मुद्द्यावर दूषित झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी भाजपचा प्रयत्न असेल. त्यासाठीच राज्यात प्रचाराची मोठी तयारी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकी आधी आणि विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी मनोज जरांगें पाटील यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर मराठा समाज भाजपवर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ज्या मतदारसंघात मराठा समाजाच्या प्राबल्य आहे. त्या मतदारघातील मराठा समाजाच्या भावना जाणून घेण्याच्या सूचना मागे भाजपने दिल्या होत्या.

 

Web Title: Pm modi yogi adityanath nitin gadkari 133 campaign public meeting and rally held all over maharashtra in assembly election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2024 | 07:10 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Mahayuti
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

ध्वजारोहणाचा मान मिळाला, आता पालकमंत्रीपद कधी? भरत गोगावलेंचा मोठा दावा
1

ध्वजारोहणाचा मान मिळाला, आता पालकमंत्रीपद कधी? भरत गोगावलेंचा मोठा दावा

मागील 12 वर्षापासून लाल किल्ल्यावरून खोटी आश्वासने देण्याचा सपाटा, आतापर्यंत केलेल्या घोषणांचे काय झाले? सपकाळांचा सवाल
2

मागील 12 वर्षापासून लाल किल्ल्यावरून खोटी आश्वासने देण्याचा सपाटा, आतापर्यंत केलेल्या घोषणांचे काय झाले? सपकाळांचा सवाल

Independence Day 2026 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण; अनेक मान्यवरांची उपस्थिती
3

Independence Day 2026 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण; अनेक मान्यवरांची उपस्थिती

India-Bangladesh : शेख हसीनांच्या प्रत्यार्पणावर होणार मोठा निर्णय? पंतप्रधान मोदी आणि तारिक रहमान यांच्या भेटीकडे जगाचे लक्ष
4

India-Bangladesh : शेख हसीनांच्या प्रत्यार्पणावर होणार मोठा निर्णय? पंतप्रधान मोदी आणि तारिक रहमान यांच्या भेटीकडे जगाचे लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.