Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Modi Baramati Visit Cancel : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा रद्द, पण कारण काय? शरद पवार स्वतः करणार उद्घाटन

PM Narendra Modi Baramati visit cancel : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बारामती दौरा रद्द झाला आहे. याची माहिती शरद पवार यांनी दिली असून ते स्वतः प्रेरणास्थानाचे उद्घाटन करणार आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 20, 2026 | 03:00 PM
pm Narendra-modi-baramati-visit-cancelled-sharad-pawar

pm Narendra-modi-baramati-visit-cancelled-sharad-pawar

Follow Us
Follow Us:
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा रद्द
  • शरद पवार स्वतः करणार प्रेरणास्थानाचे उद्घाटन
  • शरद पवारांनी स्वतः दिली माहिती
PM Narendra Modi Baramati visit cancel : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बारामती दौरा रद्द झाला आहे. याची माहिती ज्येष्ठ नेते व खासदार शरद पवार यांनी स्वतः दिली आहे. बारामतीमध्ये उभारण्यात आलेल्या प्रेरणास्थानचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात येणार होते. यासाठी स्वतः शरद पवारांनी त्यांना आमंत्रण पाठवले होते. पण आता पंतप्रधान मोदींचा बारामती दौरा रद्द झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लवकरच बारामती दौऱ्यावर येणार असल्याच्या चर्चा होत्या. सुरुवातीला ३ नोव्हेंबर किंवा १६ नोव्हेंबर या तारखांची चर्चा होती. मात्र नंतर शरद पवारांची तब्येत बिघडल्याने हा दौरा पुढे ढकलण्यात आला. आता पंतप्रधान मोदींच्या बारामती दौऱ्याला स्थगिती मिळाली असून याची माहिती शरद पवार यांनीच दिली आहे. तुर्तास तरी शरद पवारांचा दौरा रद्द झाल्याचे शरद पवारांनी नमूद केले आहे.

बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात उभारण्यात आलेल्या प्रेरणास्थळाचे उद्घाटन हे आता शरद पवार स्वतः करणार आहेत. त्यांच्याच वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे १२ डिसेंबरला हे उद्घाटन करण्यात येणार आहे. याचबरोबर भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे.

Yogi Adityanath mother passed away : CM योगी आदित्यनाथ यांच्या आईचे उत्तराखंडमध्ये निधन; भाषण सुरू असताना मिळाला निरोप

सध्या राज्याच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट व अजित पवार गट यांच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू आहेत. दोन्ही पक्षातील नेत्यांनी केलेल्या सूचक वक्तव्यांमुळे चर्चांना उधाण आले होते. यामध्ये शरद पवारांनी थेट पंतप्रधान मोदींनाच बारामतीमध्ये येण्याचे आमंत्रण दिल्याने, मोदींच्या या बारामती दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र या दौरा तुर्तास रद्द झाला असून याबद्दल शरद पवारांनी स्वतः माहिती दिली.

‘सोनिया व राहुल यांच्या फोटोला जोडे मारण्याची हिंमत उबाठाने दाखवावी…’; शिवसेना प्रवक्ते आनंद परांजपे यांची मागणी

शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार आणि जय पवार हे विद्याप्रतिष्ठानच्या कार्यालयात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द झाल्याची माहिती दिल्यानंतर शरद पवार हे पुन्हा आपल्या गोविंदबाग या निवासस्थानी रवाना झाले. दुसरीकडे विद्या प्रतिष्ठानच्या सेंट्रल बिल्डिंगमध्ये खासदार सुप्रिया सुळे,युगेंद्र पवार आणि जय पवार यांची अजूनही बैठक सुरू आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा का रद्द झाला?

    Ans: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा तूर्तास रद्द झाल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे.

  • Que: बारामतीतील प्रेरणास्थळाचे उद्घाटन आता कोण करणार?

    Ans: बारामतीतील विद्या प्रतिष्ठान परिसरात उभारण्यात आलेल्या प्रेरणास्थळाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

  • Que: प्रेरणास्थळाचे उद्घाटन कधी होणार आहे?

    Ans: शरद पवार यांच्या वाढदिवशी म्हणजेच १२ डिसेंबरला प्रेरणास्थळाचे उद्घाटन होणार आहे. याच वेळी भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याचेही अनावरण करण्यात येणार आहे.

Web Title: Pm narendra modi baramati visit cancelled sharad pawar prerna sthal opening on 12th december nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 02:59 PM

Topics:  

  • Baramati Politics
  • MP Sharad pawar
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

PM Modi: मनिलात पंतप्रधान मोदी पाकिस्तानी ई-रिक्षात बसले? व्हायरल दाव्यामागे बजाजच्या एका फुटेजने फिरवली चक्रे
1

PM Modi: मनिलात पंतप्रधान मोदी पाकिस्तानी ई-रिक्षात बसले? व्हायरल दाव्यामागे बजाजच्या एका फुटेजने फिरवली चक्रे

PM Modi: मनिलामध्ये मोदींची अनोखी ‘गिफ्ट डिप्लोमसी’; अमेरिकेपासून जपानपर्यंत जागतिक नेत्यांना दिल्या अनोख्या भेटवस्तू
2

PM Modi: मनिलामध्ये मोदींची अनोखी ‘गिफ्ट डिप्लोमसी’; अमेरिकेपासून जपानपर्यंत जागतिक नेत्यांना दिल्या अनोख्या भेटवस्तू

Sachin Tendulkar : सचिनच्या पहिल्या बॅटपासून अखेरच्या कसोटीपर्यंतचा प्रवास! वानखेडेवर ‘बॅटोग्राफी’तून ऐतिहासिक बॅट पाहण्याची संधी
3

Sachin Tendulkar : सचिनच्या पहिल्या बॅटपासून अखेरच्या कसोटीपर्यंतचा प्रवास! वानखेडेवर ‘बॅटोग्राफी’तून ऐतिहासिक बॅट पाहण्याची संधी

Rohit Pawar : पुणे रिंग रोडला अजित पवारांचे नाव द्या; रोहित पवारांची मागणी
4

Rohit Pawar : पुणे रिंग रोडला अजित पवारांचे नाव द्या; रोहित पवारांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.