Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ravindra Chavan : राहुल गांधींवर रविंद्र चव्हाण संतापले! 2014 पूर्वीचा आणि नंतरचा भारत दाखवत दिलं प्रत्युत्तर

Ravindra Chavan : राहुल गांधींच्या टीकेनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सोशल मीडियावर दोन G20 फोटोंची तुलना करत प्रत्युत्तर दिलं आहे. 'सत्तेच्या भुकेपोटी भारताची बदनामी करू नका', अशा शब्दांत त्यांनी राहुल गांधींना सुनावलं.

  • By विवेक
Updated On: Nov 20, 2026 | 07:42 PM
Ravindra Chavan

Ravindra Chavan

Follow Us
Follow Us:
  • राहुल गांधींच्या टीकेवर रविंद्र चव्हाणांचा पलटवार
  • 2014 पूर्वीचा आणि नंतरचा भारत दाखवत फोटो शेअर
  • भारताच्या जागतिक प्रतिमेवरून राजकीय संघर्ष
 

मुंबई : देशाच्या जागतिक प्रतिमेवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारताच्या स्थानावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. दोन वेगवेगळ्या G20 परिषदांतील छायाचित्रांची तुलना करत त्यांनी राहुल गांधी यांच्या भूमिकेवर निशाणा साधला. (Ravindra Chavan)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या एकत्रित छायाचित्राचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी भारताच्या जागतिक भूमिकेबाबत टीका केली होती.

या टीकेला उत्तर देताना रविंद्र चव्हाण यांनी सोशल मीडियावर दोन छायाचित्रे शेअर केली. 2011 मध्ये फ्रान्समध्ये झालेल्या G20 परिषदेत तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं छायाचित्र आणि 2024 मध्ये रिओ दि जानेरो येथे झालेल्या G20 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं छायाचित्र त्यांनी समोर ठेवलं.

TMC Standing Committee : शिंदेंचा एक निर्णय अन् ठाण्यात मोठे फेरबदल! दिग्गज नगरसेवकांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी

2014 पूर्वीचा आणि नंतरचा भारत दाखवत तुलना

रविंद्र चव्हाण यांनी या दोन्ही फोटोंना ‘2014 पूर्वीचा भारत’ आणि ‘2014 नंतरचा भारत’ अशी शीर्षकं दिली. या माध्यमातून मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा बदलल्याचा दावा त्यांनी केला.

‘दूध का दूध, पानी का पानी’ असं म्हणत त्यांनी राहुल गांधींच्या टीकेवर प्रश्न उपस्थित केले. दोन्ही कालखंडांतील छायाचित्रांची तुलना करत भारताच्या जागतिक स्थानाबाबत आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न चव्हाण यांनी केला.

‘सत्तेच्या भुकेपोटी भारताची बदनामी करू नका’

रविंद्र चव्हाण यांनी राहुल गांधींवर टीका करताना सत्तेच्या राजकारणावरही निशाणा साधला. “भूक सहन होईनाशी झाली की आपल्याला त्यापुढे काहीही दिसेनासं होतं. सत्तेच्या भुकेपुढे राहुलजींचीही हीच अवस्था झालीय,” अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला.

तसंच, “या भुकेपोटी जर भारताची बदनामी करत सुटाल, तर याद राखा! कोणताही सच्चा भारतीय हे कधीही खपवून घेणार नाही!” असंही त्यांनी म्हटलं.

एकूणच, भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवरून सुरू झालेला हा वाद आता भाजप आणि काँग्रेसमधील राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा विषय बनला आहे. राहुल गांधींच्या टीकेनंतर रविंद्र चव्हाण यांनी दिलेल्या या उत्तराची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

Rohit Pawar reply on Narco test : ‘आजच्या आज माझी नार्को टेस्ट करा…!’ रोहित पवारांची एक्स पोस्ट चर्चेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: राहुल गांधींच्या टीकेला प्रत्युत्तर कोणी दिलं?

    Ans: भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी राहुल गांधी यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.

  • Que: रविंद्र चव्हाण यांनी कोणत्या फोटोंची तुलना केली?

    Ans: त्यांनी 2011 मधील फ्रान्स येथे झालेल्या G20 परिषदेत तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं छायाचित्र आणि 2024 मधील रिओ दि जानेरो G20 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं छायाचित्र शेअर केलं.

  • Que: रविंद्र चव्हाण यांनी राहुल गांधींना काय सुनावलं?

    Ans: 'सत्तेच्या भुकेपोटी भारताची बदनामी करू नका', असं म्हणत त्यांनी राहुल गांधींवर टीका केली. भारताची बदनामी कोणताही सच्चा भारतीय खपवून घेणार नाही, असंही ते म्हणाले.

Web Title: Ravindra chavan reply rahul gandhi india global image

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 07:42 PM

Topics:  

  • PM Narendra Modi
  • Rahul Gandhi
  • Ravindra Chavan

संबंधित बातम्या

PM Modi Baramati Visit Cancel : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा रद्द, पण कारण काय? शरद पवार स्वतः करणार उद्घाटन
1

PM Modi Baramati Visit Cancel : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा रद्द, पण कारण काय? शरद पवार स्वतः करणार उद्घाटन

Rahul Gandhi Chicago Speech: “मोदी सरकारमधील काही मंत्री आमच्या संपर्कात…; राहुल गांधींच्या दाव्याने खळबळ
2

Rahul Gandhi Chicago Speech: “मोदी सरकारमधील काही मंत्री आमच्या संपर्कात…; राहुल गांधींच्या दाव्याने खळबळ

PM Modi: मनिलात पंतप्रधान मोदी पाकिस्तानी ई-रिक्षात बसले? व्हायरल दाव्यामागे बजाजच्या एका फुटेजने फिरवली चक्रे
3

PM Modi: मनिलात पंतप्रधान मोदी पाकिस्तानी ई-रिक्षात बसले? व्हायरल दाव्यामागे बजाजच्या एका फुटेजने फिरवली चक्रे

PM Modi: मनिलामध्ये मोदींची अनोखी ‘गिफ्ट डिप्लोमसी’; अमेरिकेपासून जपानपर्यंत जागतिक नेत्यांना दिल्या अनोख्या भेटवस्तू
4

PM Modi: मनिलामध्ये मोदींची अनोखी ‘गिफ्ट डिप्लोमसी’; अमेरिकेपासून जपानपर्यंत जागतिक नेत्यांना दिल्या अनोख्या भेटवस्तू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.