
Gokul Milk
कोल्हापूर : राज्यभरात गोकुळ निवडणुकीवरून मोठ्या प्रमाण चर्चा रंगल्या होत्या. गोकुळवर शासननियुक्त चार संचालकांची नियुक्ती झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. शासननियुक्त संचालकांनी महायुतीच्या उमेदवाराला मतदान केल्यामुळे महायुतीचा अध्यक्ष निवडून आला. अश्यातच आता मोठी बातमी समोर येत आहे. (Gokul News)
महायुतीच्या नेतृत्वाखाली गोकुळ दूध संघाच्या नव्या संचालक मंडळाची सूत्रे हाती आल्यानंतर पहिल्याच बैठकीत दूध दरवाढीचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळने म्हशीच्या दूध विक्री दरात प्रति लिटर ६ रुपयांची वाढ केली आहे. तर गाईच्या दुधाच्या खरेदी आणि विक्री दरातही प्रत्येकी २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला आता आणखी कात्री लागणार आहे.
गोकुळच्या संचालक मंडळाच्या बैठकीत म्हशीच्या दूध दरवाढीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. म्हशीच्या दूध विक्री दरात ६ रुपये, तर दूध खरेदी दरात ३ रुपये प्रति लिटर वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आता प्रत्येक लिटरमागे तीन रुपये अधिक मिळणार आहेत. दुसरीकडे गाईच्या दूध खरेदी दरात २ रुपये आणि विक्री दरातही २ रुपये वाढ करण्यात आली आहे. नवीन दर शनिवारपासून लागू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
गोकुळ दूध संघावर सुमारे ७० कोटी रुपयांची तूट असल्याचे सांगितले जात आहे. ही आर्थिक तूट भरून काढण्यासोबतच दूध उत्पादकांना वाढीव दर देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे.
दुष्काळी परिस्थिती, जनावरांचा चारा आणि पशुखाद्याचा वाढलेला खर्च यामुळे दूध उत्पादक शेतकरी आधीच अडचणीत आहेत. त्यामुळे खरेदी दर वाढवण्याची मागणी समविचारी आघाडीकडून केली जात होती.
गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या पॅनेलने १३ जागा जिंकल्या होत्या. तर महायुतीच्या पॅनेलला १२ जागा मिळाल्या होत्या. मात्र, शासननियुक्त चार सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्याच्या निर्णयामुळे चेअरमन निवडीचे राजकीय समीकरण बदलले. त्यानंतर महायुतीच्या नेतृत्वाखाली माजी आमदार शिवाजी पाटील यांची चेअरमनपदी निवड झाली.
सध्या झालेल्या दरवाढीने ग्राहकांचे बजेट बिघडण्याची शक्यता आहे. दरम्यान, जानेवारी महिन्यात दुधाची उपलब्धता आणि परिस्थिती पाहून पुन्हा दरवाढीचा विचार होऊ शकतो, अशी चर्चा आहे. त्यामुळे गोकुळच्या पुढील निर्णयाकडे दूध उत्पादकांसह ग्राहकांचेही लक्ष लागले आहे.
सर्वसामान्यांना फटका ! दुधाच्या दरात चार रुपयांची वाढ; पशुखाद्याचे दर वाढल्याने दुधाला ‘भाव’
Ans: म्हशीच्या दूध विक्री दरात प्रति लिटर ६ रुपयांची, तर खरेदी दरात ३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
Ans: गाईच्या दूध खरेदी दरात प्रति लिटर २ रुपये आणि विक्री दरात २ रुपये वाढ करण्यात आली आहे.
Ans: उपलब्ध माहितीनुसार, नवीन दूध दर शनिवारपासून लागू होणार आहेत. मात्र, ग्राहकांना लागू होणारा अंतिम दर दूध प्रकार आणि पॅकिंगनुसार तपासावा.