Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान मोदींचा मुंबईच्या घाटकोपर एलबीएस मार्गावर ‘रोड शो’; गुजराती-मराठी मतांचे गणित ठेवून रॅली, थेट पाच मतदारसंघावर पडणार प्रभाव

Narendra Modi Mumbai Road Show : पूर्व उपनगरं आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा दुवा म्हणून घाटकोपरकडे बघितलं जात असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घाटकोपरमध्ये रोड शो आयोजित करण्यात आला आहे. एलबीएस मार्गावर हा मोठा रोड शो सुरू आहे. हा घाटकोपरच्या पार्श्वनाथ मंदिरासमोर थांबणार आहे.

  • By युवराज भगत
Updated On: May 15, 2024 | 08:07 PM
PM Modi's 'road show' on Mumbai's Ghatkopar LBS route; By counting Gujarati-Marathi votes,

PM Modi's 'road show' on Mumbai's Ghatkopar LBS route; By counting Gujarati-Marathi votes,

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मुंबईच्या घाटकोपर रोडवर पंतप्रधान मोदींचा मोठा रोड शो करण्यात आला आहे. हा रोड शो एलबीएस मार्गावरून थेट घाटकोपरच्या पार्श्वनाथ मंदिरासमोर थांबणार आहे. हा रोड शो निवडण्यामागे मोठे गणित आहे. कारण मोदींना पसंद करणारा गुजराती समाज सर्वाधिक या मतदारसंघात राहतात त्याचबरोबर मराठी समाजाला आकर्षित करण्याचा हा मोठा प्रयत्न असणार आहे. या रोड शो मुळे 5 मतदारसंघावर प्रभाव पडणार आहे.

#WATCH | Prime Minister Narendra Modi conducts a roadshow in Mumbai's Ghatkopar area.

Maharashtra CM Eknath Shinde, Deputy CM Devendra Fadnavis are also present. pic.twitter.com/0gQWnPySv0

— ANI (@ANI) May 15, 2024

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संध्याकाळी पावणे सात वाजता मुंबईतल्या घाटकोपरमध्ये रोड शो (Narendra Modi Mumbai Ghatkopar Road Show) होणार आहे. भाजपचे ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचारासाठी हा रोड शो होणार आहे. घाटकोपरच्या अशोक सिल्क मिल जवळून मोदींच्या रोड शोला सुरुवात होणार असून घाटकोपर पूर्वेकडील पार्श्वनाथ जैन मंदिराजवळ त्याचा समारोप होईल. यामुळे ईशान्य मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शोसाठी घाटकोपरच का निवडण्यात आलं याला महत्त्वाचं राजकीय कारण आहे. मोदींच्या रोड शोचा परिणाम हा मुंबईतील सातपैकी पाच लोकसभा मतदारसंघांवर थेट पडणार आहे.

#WATCH | Prime Minister Narendra Modi's roadshow underway in Mumbai's Ghatkopar area.

Maharashtra CM Eknath Shinde, Deputy CM Devendra Fadnavis are also present.#LokSabhaelection pic.twitter.com/BEZgeA5XCw

— ANI (@ANI) May 15, 2024

मोदींचा रोडशो घाटकोपरमधेच का?
पंतप्रधान मोदी यांनी मुंबईत याच भागात रोड शो घेण्याचे अनेक कारणं आहेत. घाटकोपर हा साधारणपणे मध्यवर्ती मतदारसंघ आहे. पूर्व उपनगरं आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा दुवा म्हणून घाटकोपरकडे बघितलं जातं. इथल्या गुजराती आणि मराठीबहुल भागातील मतदारांना प्रभावित करणं हा सुद्धा एक उद्देश आहे.

या रोड शोमुळे मिहिर कोटेचा यांच्या उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघासहीत मुंबईतील पाच मतदारसंघ जोडले जातात. पियुष गोयल लढत असलेल्या उत्तर मुंबईतील दहिसर, रविंद्र वायकरांच्या उत्तर पश्चिम मुंबईतील जोगेश्वरी, आणि उज्वल निकम यांच्या उत्तर मध्य मुंबईतील साकिनाका-अंधेरी आणि दक्षिण मध्य मुंबईतील राहुल शेवाळे यांच्या मतदारसंघातील चेंबूर, गोवंडी हा भाग जोडला जातोय. या परिसरावर मोदींच्या रोड शोचा प्रभाव राहील अशी भाजपची अपेक्षा असेल.

कशी आहे घाटकोपरची रचना?
सर्वाधिक मतदार गुजराती.
गुजराती आणि मराठी मतदारांना प्रभावित.
साधारण मध्यवर्ती मतदारसंघ.
पूर्व उपनगरं आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा दुवा असं सध्या घाटकोपरला मानलं जातं.
घाटकोपरला पाच लोकसभा मतदारसंघ जोडले जातात – उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मध्य मुंबई आणि दक्षिण मध्य मुबई.
घाटकोपरशी जोडले गेलेले मतदारसंघ –
– पियुष गोयल (उत्तर) – दहिसर
– रविंद्र वायकर (उत्तर पश्चिम) – जोगेश्वरी (वाया जेव्हीएलआर)
– मिहिर कोटेचा (उत्तर पूर्व) – मुख्य मतदारसंघ
– उज्ज्वल निकम (उत्तर मध्य) – साकीनाका/अंधेरी
– राहुल शेवाळे (दक्षिण मध्य) – चेंबूर, गोवंडी.
घाटकोपरमध्ये उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीय दोन्ही प्रकारचे लोक राहतात. तसेच या भागात मोठ्या प्रमाणात हिंदू वोटर्स आहेत.

Web Title: Pm modis road show on mumbais ghatkopar lbs road route by counting gujarati marathi votes rally will directly affect five constituencies nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2024 | 08:01 PM

Topics:  

  • BJP
  • PM Narendra Modi
  • Prime Minister Narendra Modi

संबंधित बातम्या

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी
1

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी

सी पी राधाकृष्णन यांनी केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल; PM मोदी बनले प्रस्तावक
2

सी पी राधाकृष्णन यांनी केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल; PM मोदी बनले प्रस्तावक

Online Gaming Bill: ऑनलाइन सट्टेबाजीवर केंद्र सरकारचा मोठा प्रहार! ‘या’ नवीन कायद्यामुळे खेळाडू आणि सेलिब्रेटींनाही बसेल चाप
3

Online Gaming Bill: ऑनलाइन सट्टेबाजीवर केंद्र सरकारचा मोठा प्रहार! ‘या’ नवीन कायद्यामुळे खेळाडू आणि सेलिब्रेटींनाही बसेल चाप

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
4

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.