Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Narendra Modi: “छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राने…”; महायुतीच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींची विरोधकांवर टीका

लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकसभेतील अपयश धुवून काढत फडणवीस यांनी विधानसभेत भाजपला अभूतपूर्व असे यश मिळवून दिले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 23, 2024 | 08:56 PM
PM Narendra Modi: “छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राने…”; महायुतीच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींची विरोधकांवर टीका
Follow Us
Close
Follow Us:

आज राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. महायुतीने राज्यात अभूतपूर्व असे यश संपादन केले आहे. महायुतीने महाविकास आघाडीला क्लीन स्वीप दिल्याचे म्हटले जात आहे. तर आता या आकडेवारीमुळे महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधीपक्ष नेता देखील पाहायला मिळणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान महायुतीच्या नेत्यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जाऊन महाराष्ट्र आणि झारखंडच्या जनतेचे आभार मानले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आज आपण या ठिकाणी एक ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी जमलो आहोत. आज महाराष्ट्रात विकासाचा विजय झाला आहे. तर खोटे राजकरण करणारे पूर्णपणे पराभूत झाले आहेत. आज नकारात्मक राजकरण हरले आहे. आज परिवारवादाचा पराभव झाला आहे. महाराष्ट्राने आज विकसित भारताच्या संकल्पनेला मजबूत केले आहे. मी सर्व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करतो.”

पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, “मी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना शुभेच्छा देतो.  देशात झालेल्या पोटनिवडणुकीत देखील भाजपला यश मिळाले आहे. यावर देशाला विकास हवा आहे हे स्पष्ट झाले आहे. मी महाराष्ट्रातील माता, भगिनी, शेतकरी आणि तरुण यांना आदरपूर्वक नमन करतो. झारखंडच्या जनतेला देखील आम्ही नमन करतो. यावेळी महाराष्ट्राने जुने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. गेल्या 50 वर्षांमधील हा सर्वात मोठा विजय आहे. तुष्टीकरणाचा सामना कसा करायचा हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने आज दाखवून दिले” अशी टीका मोदी यांनी विरोधकांवर केली आहे.

हेही वाचा:  Maharashtra Election 2024: जे ‘वस्तादा’ला जमलं नाही ते ‘पठ्ठ्यानं करून दाखवलं; फडणवीसांची विजयाची हॅट्रिक

देवेंद्र फडणवीस यांनी 2014, 2019 आणि 2024 या काळात भारतीय जनता पक्षाला 100 पेक्षा जास्त जागा जिकवून दिल्या आहेत. 2014 मध्ये भाजपचे 123 उमेदवार जिंकले होते. 2019 मध्ये 105 आमदार निवडून आले होते. तर 2024 च्या विद्यमान निवडणुकीत भाजपचे मागील दोन वेळेपेक्षा जास्त उमेदवार जिंकण्याची शक्यता आहे, आजवर सलग तीन निवडणुकीत एखाद्या पक्षाचे 100 पेक्षा जास्त आमदार निवडून आणणे कोणत्याही नेत्याला शक्य झाले नाही. तर देवेंद्र फडणवीस यांनी हे शक्य करून दखवले आहे. आजच्या विज्यामुळे फडणवीस यांचे राज्याच्या राजकारणातील वजन नक्कीच वाढलेले पाहायला मिळत आहे. तसेच मुख्यमंत्रीपदासाठी प्रबळ उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.

2014 च्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. 2014 ल ते मुख्यमंत्री झाले. 2019 मध्ये ते विरोधी पक्षनेते झाले. तसेच 2022 मध्ये पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आणण्यात त्यान यश आले. राज्याच्या राजकारणात शरद पवार यांना अत्यंत ज्येष्ठ नेता म्हणून ओळखले जाते. तसेच शरद पवार यांना राजकारणातले वस्ताद म्हटले जाते. मात्र शरद पवार यांना तोडीस तोड नेता म्हणून फडणवीस यांच्याकडे पाहिले जाते.

Web Title: Pm narendra modi criticizes to mva about mahayuti victory in maharashtra assembly election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2024 | 08:52 PM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Assembly election 2024
  • Mahayuti
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: महायुतीत मिठाचा खडा? “आरोप सिद्ध करा, नाहीतर…”; भेगडेंचा शेळकेंना इशारा
1

Maharashtra Politics: महायुतीत मिठाचा खडा? “आरोप सिद्ध करा, नाहीतर…”; भेगडेंचा शेळकेंना इशारा

‘मामा’ पुन्हा येणार? आसाममध्ये लवकरच निवडणूक लागणार; BJP गेम करण्याच्या तयारीत; थेट 25 जणांचे…
2

‘मामा’ पुन्हा येणार? आसाममध्ये लवकरच निवडणूक लागणार; BJP गेम करण्याच्या तयारीत; थेट 25 जणांचे…

स्वराज्य म्हणजे काय? हर्षवर्धन सपकाळांच्या लेकीने ट्रोलर्सना शिकवला धडा; वडिलांवरील टीकेला दिले चोख प्रत्युत्तर
3

स्वराज्य म्हणजे काय? हर्षवर्धन सपकाळांच्या लेकीने ट्रोलर्सना शिकवला धडा; वडिलांवरील टीकेला दिले चोख प्रत्युत्तर

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त
4

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.