Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पंतप्रधान मोदींनी संविधान दिन देशभर साजरा करण्याचा निर्णय घेतला, पण…’; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान

लाडकी बहिण योजना मी मुख्यमंत्री असताना सुरू केली आणि महायुती सरकारने ती पुढे नेली. ही योजना लागू करताना अनेक अडथळे आले. हे आमच्या बहिणींना चांगलेच ठाऊक आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 26, 2025 | 03:12 PM
'पंतप्रधान मोदींनी संविधान दिन देशभर साजरा करण्याचा निर्णय घेतला पण...'; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान

'पंतप्रधान मोदींनी संविधान दिन देशभर साजरा करण्याचा निर्णय घेतला पण...'; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या आधारे आपला देश चालतो. त्यामुळे संविधान दिनाला अत्यंत महत्त्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान दिन देशभर साजरा करण्याचा निर्णय घेतला. पण काही लोक फक्त संविधानाचं लाल रिकामे पुस्तक हातात धरून फिरण्यातच स्वतःचं कर्तव्य संपलं असं समजतात, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या विरोधकांवर हल्लाबोल केला.

नागपूर येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, 26/11 हा मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा काळा दिवस होता. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आणि मृत्युमुखी पडलेल्या सर्व नागरिकांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच ते पुढे म्हणाले, गेल्या दोन दिवसांपासून मी विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये जाऊन सभा घेत आहे. विविध नगरपालिकांमध्ये झालेल्या या सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नगराध्यक्षपदाचे आमचे उमेदवार, तसेच नगरसेवकपदाचे उमेदवार सर्वांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. विकासाचा मुद्दा घेऊनच आम्ही जनतेसमोर जात आहोत.

हेदेखील वाचा : Maharashtra Politics : महायुतीमध्ये का सुरु आहे नाराजीनाट्य? मुंबईचा महापौर कोणाचा? DCM एकनाथ शिंदेंनी स्पष्टच दिलं उत्तर

तसेच नगरपालिका आणि नगरपंचायती या नगरविकास खात्याच्या अखत्यारीत येतात. मुख्यमंत्री आणि नंतर नगरविकास मंत्री म्हणून, ज्या ठिकाणी आमचे नगराध्यक्ष नव्हते किंवा सत्ता नव्हती, अशा ठिकाणीही रस्ते, भुयारी गटार, उद्याने, आरोग्यविषयक सुविधा यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक नगरपरिषदेला ‘नमो उद्यान’साठी एक कोटी रुपये दिले आहेत. विकास हा आमचा मुख्य अजेंडा आहे.

मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरु

ते पुढे म्हणाले, लाडकी बहिण योजना मी मुख्यमंत्री असताना सुरू केली आणि महायुती सरकारने ती पुढे नेली. ही योजना लागू करताना अनेक अडथळे आले. हे आमच्या बहिणींना चांगलेच ठाऊक आहे. पण एकदा निर्णय घेतला की ही योजना काटेकोरपणे अंमलात आणली जाईल, हे आम्ही ठामपणे सांगितले. कितीही कोणी काही म्हटलं तरी लाडकी बहिण योजना आम्ही कधीही बंद करणार नाही, याचा विश्वास आम्ही बहिणींना दिला आहे.

हेदेखील वाचा : Maharashtra Municipal Election: पालिका निवडणुकीत ‘घराणेशाही’चा कळस; शिंदे सेनेकडून एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी

Web Title: Pm narendra modi decided to celebrate constitution day across the country says dcm eknath shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 03:12 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

PM Narendra Modi News: पंतप्रधान मोदींकडून सफ्रान एअरक्राफ्ट सेवा केंद्राचे उद्घाटन; LEAP इंजिनसाठी भारत बनेल मोठे मेंटेनन्स हब
1

PM Narendra Modi News: पंतप्रधान मोदींकडून सफ्रान एअरक्राफ्ट सेवा केंद्राचे उद्घाटन; LEAP इंजिनसाठी भारत बनेल मोठे मेंटेनन्स हब

“माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला …”; Constitution Day निमित्त पंतप्रधान मोदींचे देशवासियांना पत्र
2

“माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला …”; Constitution Day निमित्त पंतप्रधान मोदींचे देशवासियांना पत्र

Maharashtra Municipal Election: पालिका निवडणुकीत ‘घराणेशाही’चा कळस; शिंदे सेनेकडून एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी
3

Maharashtra Municipal Election: पालिका निवडणुकीत ‘घराणेशाही’चा कळस; शिंदे सेनेकडून एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी

Ayodhya Ram Mandir: अयोध्या राममंदिरात फडकला भगवा; पाहून पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या, पुन्हा भारतावर केले बिनबुडाचे आरोप
4

Ayodhya Ram Mandir: अयोध्या राममंदिरात फडकला भगवा; पाहून पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या, पुन्हा भारतावर केले बिनबुडाचे आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.