Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Municipal Election: पालिका निवडणुकीत ‘घराणेशाही’चा कळस; शिंदे सेनेकडून एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी

लोहा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपाने गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, यासोबतच नगरसेवकपदासाठी त्यांच्या कुटुंबातील पाच जणांना तिकीट देऊन भाजपनं घराणेशाहीचीच परंपरा पुढे चालवली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 26, 2025 | 12:13 PM
Maharashtra Municipal Election: पालिका निवडणुकीत ‘घराणेशाही’चा कळस; शिंदे सेनेकडून एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी
Follow Us
Close
Follow Us:
  • पालिका निवडणुकीत घराणेशाहीचा अक्षरशः कळस
  • शिंदेसेनेकडून एकाच कुटुंबातील ६ जणांना उमेदवारी
  • भाजपकडूनही नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील ६ जणांना उमेदवारी
  • स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचा मार्ग बंद होत असल्याची चर्चा
 

Maharashtra Municipal Election:  पालिका निवडणुकीत घराणेशाहीचा अक्षरशः कळस गाठला आहे. सत्ता गाजवणाऱ्या पक्षांच्या अनेक नेत्यांच्या कुटुंबांत एक-दोन नव्हे, तर थेट सहा जणांना उमेदवरी देण्यात आली आहे. कोणत्या पक्षात, कोणत्या नेत्यांच्या घराण्याने हा विक्रम केला, यावरचा हा सविस्तर रिपोर्ट… (Shinde Sena ticket distribution)

महाराष्ट्राच्या राजकारणाता गेल्या अनेक दशकांपासून रुजलेली घराणेशाही आता अधिकच बळकट होऊ लागली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा घराणेशाहीची चर्चा जोर धरू लागली आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे— उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेत एकाच घरातील तब्बल सहा सदस्यांना दिलेली उमेदवारी.

BMC Election: मुंबईतील मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार; निवडणूक आयोगाची कबुली

या घटनामुळे साध्या कार्यकर्त्यांच्या राजकारणातील स्थानावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सामान्य कार्यकर्त्यांची भूमिका फक्त सतरंज्या उचलण्यापुरतीच मर्यादित राहिली आहे का, असा सवाल पुन्हा ऐकू येऊ लागला आहे.

शिंदेसेनेचे बदलापूर शहराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या घरातील तब्बल सहा जणांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. यात वामन म्हात्रे स्वतः, त्यांची पत्नी वीणा म्हात्रे, भाऊ तुकाराम म्हात्रे, मुलगा वरुण म्हात्रे, भावजई उषा म्हात्रे आणि पुतण्या भावेश म्हात्रे यांचा समावेश आहे. एकााच घरातील या सहा सदस्यांना दिलेल्या तिकिटांमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

या घडामोडीनंतर भाजपनं शिंदेसेनेवर थेट घराणेशाहीचा आरोप केला आहे. मात्र, पदाधिकाऱ्यांच्या आग्रहामुळे उमेदवारी दिल्याचा दावा शिंदेसेनेचे शहराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी केला आहे.

दरम्यान, भाजपा (BJP)  स्वतःही अशा वादातून सुटलेली नाही. नांदेडमधील लोहा नगरपरिषदेत भाजपानंही एकाच घरातील सहा जणांना उमेदवारी दिल्याचं उघड झालं होतं. तसेच, महिला आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक ठिकाणी सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी आपल्या घरातील महिलांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीवर सातत्याने घराणेशाहीचे आरोप करणाऱ्या भाजप आणि शिंदेसेनेतही वेगळं चित्र नसल्याचं या पालिका निवडणुकीत स्पष्टपणे समोर आलंय. खरंच उमेदवार न मिळाल्याने नेते अशा प्रकारे कुटुंबियांना उमेदवारी देत असतील, तर लोकशाहीची ही अत्यंत दयनीय अवस्था असल्याची टीका राजकीय वर्तुळातून होत आहे.

Mumbai Terror Attack : आग, धूर आणि रक्ताने माखलेली ती रात्र… ‘या’ देवदूतांमुळे वाचला ताजमध्ये

लोहा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपाने गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, यासोबतच नगरसेवकपदासाठी त्यांच्या कुटुंबातील पाच जणांना तिकीट देऊन भाजपनं घराणेशाहीचीच परंपरा पुढे चालवली असल्याची चर्चा रंगू लागली आहे. गजानन सूर्यवंशी यांच्यासोबत उमेदवारी मिळालेल्या कुटुंबातील सदस्यांमध्ये- पत्नी गोदावरी सूर्यवंशी, भाऊ सचिन सूर्यवंशी, भावाची पत्नी सुप्रिया सूर्यवंशी, मेव्हुणा युवराज वाघमारे, भाच्याची पत्नी रीना अमोल व्यवहारे
यांचा समावेश आहे.

एकाच घरातील या सहा सदस्यांना दिलेल्या उमेदवारीमुळे स्थानिक राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून येथे घराणेशाही चालत नाही, असा दावा करणाऱ्या नेत्यांनीच प्रत्यक्षात एकाच कुटुंबातील सहा व्यक्तींना उमेदवारी दिल्याने तीव्र टीका होत आहे.

या पालिका निवडणुकीत जवळपास सर्वच प्रमुख पक्षांमध्ये घराणेशाहीचं प्रमाण प्रकर्षाने जाणवलं आहे. कुळगाव-बदलापूर आणि लोहा नगरपरिषद ही सर्वाधिक चर्चेत असलेली उदाहरणे ठरली आहेत. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचा मार्ग बंद होतोय का, असा प्रश्न यामुळे अधिक तीव्र झाला आहे.

 

Web Title: Municipal election 2025 dynasty six family members get shinde sena tickets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 12:12 PM

Topics:  

  • BJP
  • Eknath Shinde
  • Maharashtra Political News

संबंधित बातम्या

“…तर मी संपूर्ण भारत हादरवून टाकेन”; ‘त्या’ प्रकरणावरून ममता बॅनर्जींचा भाजपला गर्भित इशारा
1

“…तर मी संपूर्ण भारत हादरवून टाकेन”; ‘त्या’ प्रकरणावरून ममता बॅनर्जींचा भाजपला गर्भित इशारा

Eknath Shinde : “विकास विरोधी प्रवृत्ती हद्दपार करा…”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
2

Eknath Shinde : “विकास विरोधी प्रवृत्ती हद्दपार करा…”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

Maharashtra Politics : महायुतीमध्ये का सुरु आहे नाराजीनाट्य? मुंबईचा महापौर कोणाचा? DCM एकनाथ शिंदेंनी स्पष्टच दिलं उत्तर
3

Maharashtra Politics : महायुतीमध्ये का सुरु आहे नाराजीनाट्य? मुंबईचा महापौर कोणाचा? DCM एकनाथ शिंदेंनी स्पष्टच दिलं उत्तर

“खोट्या शपथा घेऊन राजकारण केले नाही…”, शिंदे सेनेच्या नेत्यांनी नगराध्यक्ष पदाचा शब्द पाळला नसल्याचा सुधीर शिंदेंचा आरोप
4

“खोट्या शपथा घेऊन राजकारण केले नाही…”, शिंदे सेनेच्या नेत्यांनी नगराध्यक्ष पदाचा शब्द पाळला नसल्याचा सुधीर शिंदेंचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.