
नवले पुलावरील अपघात रोेखण्यासाठी मोठा निर्णय; पोलीस उपायुक्तांनी दिले 'हे' महत्वाचे आदेश
सदर रस्त्यावरील वाहनांचा वेग मर्यादीत ठेवण्यासाठी, रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण व वाहतुक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासन गृह विभाग मोटार वाहन कायदयानुसार पोलीस उप-आयुक्त, वाहतुक शाखा पुणे यांनी शहर वाहतुक विभागातील रस्त्यावर अत्यावश्यक सेवेतील वाहने उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहीका वगळून इतर सर्व वाहनांना आदेश लागू करण्यात आले आहेत. वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले की, चालकांनी आपल्या वाहनाचे स्पीडोमीटर नियमित तपासावे व बोर्डिंग व चिन्हांकडे लक्ष द्यावे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्ही व स्पीड गन प्रणालीद्वारे नियमांनुसार कारवाई करण्यात येणार आहे.
वाहतूक चालक मालक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे या संदर्भात म्हणाले, पोलीस उपयुक्त यांनी कात्रज नवीन बोगदा ते नवलेब्रिज येथील अतिउतार असलेल्या रस्त्यासाठी प्रतितास तीस वेगमर्यादाचे आदेश सर्व प्रकारच्या वाहनांसाठी काढले असून, आमच्या वाहतूकदारांचे एवढेच म्हणणे आहे की, या नऊ किलोमीटर दरम्यान चालवली जाणारी लो गियर मधील गाडी त्यामुळे इंजिनवर येणारा लोड त्यांचे घर्षण होऊन पुन्हा ब्रेकमध्ये तांत्रिक बिघाड होऊ शकते. याबाबत चर्चा करण्यासाठी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट, ऑटोमोटो रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया, पुणे शहरातील वाहतूक तज्ञ, रोड इंजिनियर तज्ञ, एनएचए , शहरातील वाहतूक संघटना प्रतिनिधी यांची संयुक्तिक बैठक घेऊन याबाबत सर्वांचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली.