Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ध्वनी प्रदुषण तक्रार आली तर गुन्हे दाखल करणार: पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता

पुणे पोलिसांनी गणेश विसर्जन मिरवणूकीनिमित्ताने शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. सकाळी दहा वाजता बंदोबस्ताला सुरूवात होणार आहे. सीपी टू कॉन्स्टेबल असणारा यंदाचा बंदोबस्त तगडा असून, सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बंदोबस्ताची माहिती (ब्रिफींग) देण्यात आले आहे. शहरात आठ हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. तर, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Sep 08, 2022 | 05:23 PM
ध्वनी प्रदुषण तक्रार आली तर गुन्हे दाखल करणार: पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : कोरोनामुक्त, शासनाच्या निर्बंध शिथील आणि पुणे पोलिसांची कोणतीही नियमावली नसताना होऊ घातलेल्या पुण्यातील वैभवाशाली गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणूकीची सांगता शुक्रवारी (दि. ९) होत असताना ध्वनी प्रदुषणाची कोणाकडून तक्रार आली तर गुन्हे दाखल करू, अशी भूमिका पुणे पोलिसांनी घेतली असून, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी न्यायालयाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. दरम्यान, दुसरीकडे शहरात पाचव्या आणि नवव्या दिवशी विसर्जन मिरवणूकीत डीजेंचा आवाज मोठाच राहिला आहे. त्यामुळे यंदा मिरवणूकीत डीजे दणदणाट अन् ढोल-ताशांचा कडकडाटच पुणेकरांना पाहिला मिळणार असल्याचे दिसत आहे.

पुणे पोलिसांनी गणेश विसर्जन मिरवणूकीनिमित्ताने शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. सकाळी दहा वाजता बंदोबस्ताला सुरूवात होणार आहे. सीपी टू कॉन्स्टेबल असणारा यंदाचा बंदोबस्त तगडा असून, सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बंदोबस्ताची माहिती (ब्रिफींग) देण्यात आले आहे. शहरात आठ हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. तर, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी केली आहे. विसर्जन मिरवणुकीची सांगता होईपर्यंत शहर व उपनगर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ), गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्तास राहणार आहेत. यासोबतच विसर्जनासाठी आलेल्या भाविकांचे दागिने, मोबाइल हिसकावणे तसेच महिलांची छेडछाड या घटना रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलीस गस्त घालणार आहेत. चौकाचौकात निरीक्षण मनोरे उभे करण्यात येणार आहेत.

विसर्जनानिमित्त वाहतूकीत बदल
शहराच्या मध्यभागातील प्रमुख रस्ते तसेच उपरस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहेत. आपत्कालिन परिस्थितीत रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहचण्यासाठी त्वरीत मार्ग उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. नागरिकांना त्वरीत वैद्यकीय मदत उपलब्ध करुन देण्यासाठी रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणुकीत संशयित व्यक्ती किंवा बेवारस वस्तू आढळल्यास त्वरीत पोलीस नियंत्रण कक्षात किंवा बंदोबस्तावरील पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे.

Web Title: Police commissioner amitabh gupta will file a case if there is a complaint of noise pollution

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2022 | 05:23 PM

Topics:  

  • Amitabh Gupta
  • pune ganpati

संबंधित बातम्या

गणेशमूर्तींचा बदलता साजशृंगार; बालगणेश, वारकरी अन् फेटे-पगड्यांनी सजलेल्या मूर्तींना वाढती मागणी
1

गणेशमूर्तींचा बदलता साजशृंगार; बालगणेश, वारकरी अन् फेटे-पगड्यांनी सजलेल्या मूर्तींना वाढती मागणी

कसबा गणपती मंडळाची यंदा आगळीवेगळी संकल्पना; अष्टविनायकांतील बल्लाळेश्वर मंदिराची भव्य प्रतिकृती उभारणार
2

कसबा गणपती मंडळाची यंदा आगळीवेगळी संकल्पना; अष्टविनायकांतील बल्लाळेश्वर मंदिराची भव्य प्रतिकृती उभारणार

संपूर्ण पाण्याने भरलेले तळघर; ‘या’ मंदिराचे वर्षातून केवळ एकदाच उघडतात समाधी दर्शनाचे दरवाजे
3

संपूर्ण पाण्याने भरलेले तळघर; ‘या’ मंदिराचे वर्षातून केवळ एकदाच उघडतात समाधी दर्शनाचे दरवाजे

Punit Balan Banned DJ : पुण्यातील गणेशोत्सव मंडळांसाठी महत्त्वाची बातमी; यापुढे DJ लावाल तर पुनीत बालन यांची ओढवाल नाराजी
4

Punit Balan Banned DJ : पुण्यातील गणेशोत्सव मंडळांसाठी महत्त्वाची बातमी; यापुढे DJ लावाल तर पुनीत बालन यांची ओढवाल नाराजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.