
मुंबई – राज्यात जून २०२२ मध्ये शिंदे गटाने शिवसेनेतून बंड केल्यानंतर राजकीय घडामोडी अत्यंत वेगाने घडत आहेत. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर २ जूलै रोजी राष्ट्रवादी काँग्रसमधून अजित पवारांनी (Ajit pawar) बंड करत भाजपासोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यामुळं विरोधी पक्षच कमकुवत झाला आहे. मात्र रविवारी मविआचे प्रमुख तीन नेते शदर पवार, उद्धव ठाकरे व बाळासाहेब थोरात हे एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी शरद पवारांनी (Sharad Pawar) सूचक वक्तव्य केल्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे. (political earthquake again if i thackeray and thorat decide sharad pawar indicative statement what did they say)
कदाचित महाराष्ट्रात….
दरम्यान, या ठिकाणी उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि मी असून, आम्ही तिघांनी ठरवलं तर महाराष्ट्रात कदाचित काही होईल आणि याच्यामध्ये वेगळं सांगायची गरज नाही, असंही शरद पवार म्हणाले. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळ, धुळे आयोजित ६ ऐतिहासिक ग्रंथांच्या प्रकाशन सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात उपस्थित आहेत. मुंबईतील वाय.बी. चव्हाण सेंटर येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना शरद पवारांनी हे मोठं वक्तव्य केल्यानं पुन्हा राजकीय वर्तुळाच चर्चांना उधाण आलं आहे.
प्रोत्साहन देण्याची गरज
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, बाळासाहेब थोरात आणि मी इथं असून आम्ही तिघांनी ठरवलं तर महाराष्ट्रात कदाचित काहीही होऊ शकतं. सध्याच्या स्थितीतून आज किंवा उद्या काही तरी मार्ग निघतील आणि जेव्हा हे घडलं त्यावेळी सरकारला मदत करायला भाग पाडणं अडचणीचं ठरणार नाही, असेही शरद पवार म्हणाले. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळ, धुळे यासारख्या संस्थांना आपल्याकडून प्रोत्साहन देण्याची गरज आहे. असं शरद पवार म्हणाले.