Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनपा निवडणुकीत युती फिसकटली, आघाडी जुळली; भाजपा, शिवसेना, काँग्रेसचे उमेदवार जाहीर

नांदेडमध्ये काँग्रेसने मतांचे विभाजन टाळण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा फॉर्म्युला वापरण्यात आला आहे. यामध्ये ६१ जागा लढवत २० जागा वंचित आघाडीला देण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 31, 2025 | 05:31 PM
Political parties extensive preparations for Nanded Waghala Municipal Corporation election 2026

Political parties extensive preparations for Nanded Waghala Municipal Corporation election 2026

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra Local Body Elections : नांदेड : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत.  एकीकडे भाजप शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची युती फिस्कटली असताना दुसरीकडे काँग्रेसने मतांचे विभाजन टाळण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा फॉर्म्युला वापरण्यात आला आहे. यामध्ये ६१ जागा लढवत २० जागा वंचित आघाडीला देण्याचा निर्णय घेतला आहे. युती फिस्कटली… आघाडी जुळली… असे राजकीय चित्र मंगळवारी नांदेडात दिसून आले.

अनेक निष्ठावंतांना भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे या निष्ठावंतांनी आपला मोर्चा शिवसेना, राष्ट्रवादीकडे वळवत आपली उमेदवारी पक्की केली. भाजप, शिवसेना, काँग्रेसच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता, भाजप व शिवसेनेची युती व्हावी, यासाठी दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांच्या अनेक बैठका झाल्या होत्या. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार अमरनाथ राजूरकर हे मनपा निवडणुकीचा किल्ला लढवत असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप, शिवसेनेची युती जागावाटपावरून फिस्कटली.

हे देखील वाचा : आता गुन्हा केल्यावर शिक्षा नाही? दिल्ली सरकारने केले ‘हे’ विधेयक मंजूर; नेमका प्रकार काय?

शिवसेनेला किमान ३० जागा मिळाव्यात अशी मागणी शिवसेनेच्या आमदारांनी केली होती, आ. बालाजी कल्याणकर, आमदार आनंदराव बोंढारकर हे युतीसाठी आग्रही होते, परंतु आमदार हेमंत पाटील यांनी युतीबाबत सकारात्मक भूमिका घेतली नाही, राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती व्हावी, अशी इच्छा शिवसेनेच्या एका गटाची होती. अखेर युती फिस्कटल्यामुळे भाजपचे महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांनी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.

भाजपने उमेदवारांची नावांची घोषणा केल्यानंतर लगेच नांदेड उत्तर भागातील ४१ तर नांदेड दक्षिण भागातील २९
उमेदवारांच्या नावांची घोषणा शिवसेनेने केली आहे. उत्तर भागातील उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आल्याची माहिती आमदार बालाजी कल्याणकर यांनी दिली आहे. काँग्रेसच्या उमदेवारांची यादी जाहीर झाली असून अनेक जुन्या नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये राज ठाकरेंवर अन्याय? आरोप होताच संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

वंचितला फक्त २० जागा

काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत जुळवून घेत ६१ जागा लढविण्याचा निर्णय घेतला असून वंचितला २० जागा दिल्या आहेत, या आघाडीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा मनपा निवडणूक प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी शिक्कामोर्तब केले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची देखील कोण्याच पक्षाशी युती झाली नसून त्यांनीही स्वबळाचा नारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश पोकर्णा यांनी राष्ट्रवादी युतीबाबत अजून आशावादी असल्याचे म्हटले आहे. त्यांनी युती न होण्याचे खापर दक्षिण, उत्तरच्या शिवसेना आमदारांवर फोडले आहे.

Web Title: Political parties extensive preparations for nanded waghala municipal corporation election 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2025 | 05:31 PM

Topics:  

  • Maharashtra Local Body Election
  • nanded news
  • Nanded Politics

संबंधित बातम्या

हिंगोलीच्या बाजारपेठेत हळदीचे भाव घसरले; आखाती युद्धाचे पसरले सावट, शेतकरी चिंतेत
1

हिंगोलीच्या बाजारपेठेत हळदीचे भाव घसरले; आखाती युद्धाचे पसरले सावट, शेतकरी चिंतेत

बंद नंबरवर गॅस बुकिंगचा सल्ला; नांदेडमध्ये ग्राहकांची उडाली धांदल, युद्धाचा बसला फटका
2

बंद नंबरवर गॅस बुकिंगचा सल्ला; नांदेडमध्ये ग्राहकांची उडाली धांदल, युद्धाचा बसला फटका

पंचायत समिती सभापती निवडणुकीत भाजपचा झेंडा; पूर्णामध्ये अपक्षाला मिळाला सभापती पदाचा मान
3

पंचायत समिती सभापती निवडणुकीत भाजपचा झेंडा; पूर्णामध्ये अपक्षाला मिळाला सभापती पदाचा मान

Railway News : नांदेड रेल्वे विभागात ‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’; दोन टू-व्हीलर, शस्त्रे पोलिसांनी केली जप्त
4

Railway News : नांदेड रेल्वे विभागात ‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’; दोन टू-व्हीलर, शस्त्रे पोलिसांनी केली जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.